
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगचा (Big Bash League) दहावा सीझन हा खराब अंपायरिंगसाठी ओळखला जाणार आहे. या स्पर्धेत DRS वापरलं जात नाही. त्यामुळे अंपायर रोज खराब निर्णयाचे विक्रम मोडत आहेत. सिडनी थंडर (Sydney Thunder) विरुद्ध पर्थ स्क्रॉचर्स (Perth Scorchers) यांच्यात झालेल्या स्पर्धेच्या 12 व्या मॅचमध्ये थंडरच्या उस्मान ख्वाजाला (Usman Khawaja) आऊट न देण्याचा निर्णय अंपायरनी घेतला होता. आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका बॅट्समनला आऊट देण्याचा चुकीचा निर्णय त्यांनी दिला आहे. मंगळवारी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचं बुधवारी आणखी एक चुकीचा निर्णय घेऊन प्रायाश्चित करण्याची ही ऑस्ट्रेलियन पद्धत असावी.
( वाचा : Big Bash League – ख्वाजा आऊट होता, अंपायरला नाही वाटला! DRS नसल्यानं क्रिकेटची थट्टा )
नेमके काय झाले?
ब्रिस्बेन हिट (Brisbane Heats) विरुद्ध अॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) या स्पर्धेच्या 13 व्या मॅचमध्ये ब्रिस्बेनच्या टॉम कुपरचा (Tom Cooper) अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे ‘बळी’ गेला. त्यामुळे या स्पर्धेत DRS नसण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ब्रिस्बेनची इनिंग सुरु असताना 12 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर स्ट्राईकर्सचा स्पिनर डॅनी ब्रिग्सच्या (Danny Briggs) बॉलवर रिव्हर्स स्विप करण्याचा कुपरचा प्रयत्न फसला. कुपरच्या उजव्या पायाला बॉल लागला. बॉल पायाला लागताच बॉलिंग टीमने प्रथेप्रमाणे जोरदार अपील केले. ते अपील बरोबर आहे की चूक याचा क्षणाचाही विचार न करता अंपायरने कुपरला आऊट दिले.
कुपरला अंपायरच्या या निर्णयावरची नाराजी लपवता आली नाही. या मॅचची कॉमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आणि अॅण्ड्यू सायमंड्स (Andrew Symonds) यांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली. बिग बॅश स्पर्धेत DRS तातडीनं सुरु करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
( वाचा : ‘टेस्ट क्रिकेट कसं खेळायचं?’, शेन वॉर्न आणि स्टीव्हन स्मिथ यांची परस्पर विरोधी मतं )
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.