फोटो – सोशल मीडिया

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell)  28 बॉल्समधील धडाकेबाज हाफ सेंच्युरी मेलबर्न स्टार्सला (Melbourne Stars) विजय मिळवून देण्यात कमी पडली. होबार्ट हुरिकेन्स (Hobart Hurricanes) विरुद्ध झालेल्या लढतीमध्ये स्टार्सचा 21 रन्सनं पराभव झाला.

मॅक्सवेलचा झंझावात

होबार्टनं ठेवलेल्या 165 रन्सचा पाठलाग करताना स्टार्सची सुरुवात खराब झाली. त्यानंतर कॅप्टन मॅक्सवेलची वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनशी (Nichols Pooran) जोडी जमली. मॅक्सवेलची फटकेबाजी सुरु असताना पूरन शांतपणे दुसऱ्या बाजूनं त्याला साथ देण्याची भूमिका बजावत होता. मॅक्सवेलनं संपूर्ण रंगात फटकेबाजी करत अवघ्या 37 बॉल्समध्ये 6 फोर आणि 5 सिक्सरच्या मदतीनं 70 रन काढले.

स्टार्सची टीम 13 व्या ओव्हरमध्येच 112 पर्यंत पोहचली होती. त्यानंतर चार बॉलच्या फरकानं आधी पूरन आणि नंतर मॅक्सवेल आऊट झाला. मॅक्सवेलला रिटायरमेंटनंतर परत आलेला दक्षिण आफ्रिकेचा बॉलर जोहान बोथानं (Johan Botha) आऊट केलं. मॅक्सवेल आऊट झाल्यानंतर होबार्टनं मॅचमध्ये कमबॅक केलं. नेपाळच्या संदीप लामिछानेची (Sandeep Lamichhane) या सिझनमधली पहिलीच मॅच होती. त्यानं त्याच्या जुन्या टीमच्या विरुद्ध खेळताना 2 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत सातत्यानं चांगली बॉलिंग करणाऱ्या स्कॉट बोलंडनं तीन विकेट्स घेतल्यानं स्टार्सला विजयासाठी अखेर 21 रन्स कमी पडले.

( वाचा : IPL 2020 मधील खराब कामगिरीचे मॅक्सवेलने सांगितले कारण… )

वर्ल्ड नंबर 1 बॅट्समनचा धडाका

त्यापूर्वी पहिल्यांदा बॅटिंग करताना T20 क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेला इंग्लंडचा बॅट्समन डेव्हिड मलाननं (Dawid Malan) होबार्ट कडून 56 बॉलमध्ये 75 रन्सची खेळी केली. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी कॉलीन इंग्रामनं (Colin Ingram) 26 रन्स काढत साथ दिली.

( वाचा : Big Bash League: ऑस्ट्रेलियन बॅट्समन्स केली 15 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी, ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला! )

होबार्टचा हा या स्पर्धेतील पाचवा विजय असून ते आता पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. तर स्टार्सची टीम 2 विजय आणि 3 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर आहे. होबार्टकडून 22 रन्समध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या स्कॉट बोलंडला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: