फोटो – ट्विटर – @RenegadesBBL

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) टेस्ट सीरिज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन टीममचे दोन ओपनर जखमी झाले. ओपनिंगच्या दोन जागा रिकाम्या असल्यानं अनुभवी खेळाडू शॉन मार्शला (Shaun Marsh) टीममध्ये निवड होण्याची अपेक्षा होती. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाने’ (Cricket Australia) त्याचा अपेक्षा भंग केला.

शॉन मार्शनं या अपेक्षाभंगाचा राग बिग बॅश लीग (Big Bash League 2020-21) च्या चौथ्या मॅचमध्ये काढला. मार्शच्या दमदार हाफ सेंच्युरीमुळे मेलबर्न रेनगेड्सनं (Melbourne Renegades) पर्थ स्कॉचर्सचा (Perth Scorchers) सात विकेट्सनं पराभव करत स्पर्धेची दणदणीत सुरुवात केली.

(वाचा – Big Bash League: मॅक्सवेलचा फॉर्म कायम, कुल्टर नाईलही चमकला, मेलबर्न स्टार्सचा पहिला विजय)

पर्थचा कॅप्टन अ‍ॅश्टन टर्नरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. त्यांना मोठा स्कोअर करण्यात अपयशी आलं. पर्थची टीम 19.1 ओव्हर्समध्ये 130  रन्सवर ऑल आऊट झाली. पर्थकडून एरॉन हार्डीनं सर्वात जास्त 33 रन काढले. टर्नरनं 24 , मिचेल मार्शन 17 रनचं योगदान दिलं. न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोला भोपळाही फोडता आला नाही. मेलबर्नकडून केन रिचर्डसननं 20 रन देत 3 विकेट्स घेतल्या.

(वाचा – Big Bash League – गतविजेत्या सिडनीचा पराभव करत होबार्टची विजयी सुरुवात )

131 रन्सच्या सोप्या टार्गेटचा पाठलाग करता मेलबर्ननं दमदार सुरुवात केली. शॉन मार्श आणि कॅप्टन आरोन फिंच या ओपनिंग जोडीनं 70 रन्सची पार्टनरशिप केली. फिंच 35 रन्स काढून आऊट झाला. मार्शनं 47 बॉल्समध्ये 62 रन्स काढले. या खेळीत त्याने 7 फोर आणि 1 सिक्स लगावला. पर्थकडून झाए रिचर्डसननं 2 तर फवाद अहमदनं 1 विकेट घेतली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: