फोटो – ट्विटर / @StarsBBL

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League 2020-21) मेलबर्न स्टार्सचा कॅप्टन (Melbourne Stars) ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने आणखी एक आक्रमक सेंच्युरी झळकावली. त्याच्या हाफ सेंच्युरीनंतरही सिडनी सिक्सर्सनं (Sydney Sixers) स्टार्सचा चार विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये सिक्सर्सनं अतिरिक्त बोनस पॉईंट्ससाठी असलेल्या बॅश बुस्टसह (Bash Bosst) सर्व चार पॉईंट्सची कमाई केली. त्यामुळे सिक्सर्सनं पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. तर मेलबर्न स्टार्सची टीम या स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच पात्रता फेरीपूर्वी आऊट झाली आहे.

मेलबर्नची संथ सुरुवात!

ब्रिस्बेन हीट (Bresbane Heat) आणि मेलबर्न रेनगेड्स (Melbourne Renegades) यांनी अनपेक्षित विजय मिळावल्यानं स्टार्सच्या पात्रता फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यासाठी त्यांना बॅश बुस्टसह सर्व चार पॉईंट्स मिळवणे आवश्यक होते.

( वाचा : Big Bash League: ड्रग्ज घेतल्यामुळे वर्ल्ड कप टीममधून झाली होती हकालपट्टी, आता ठोकली 51 बॉलमध्ये सेंच्युरी! )

स्टार्सचा ओपनर मार्कस स्टॉईनिस (Marcus Stoinis) 12 रन काढून आऊट झाला. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये सिक्सर्सच्या बॉलर्सनी टिच्चून मारा केला. त्यामुळे आठव्या ओव्हरमध्ये स्टार्सची अवस्था 3 आऊट 46 झाली होती. ग्लेन मॅक्सवेलनं 10 व्या ओव्हरमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सर खेचत टीमचा स्कोअर 72 वर पोहचवला.

द मॅक्सवेल शो!

किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KIXP) आठवडाभरापूर्वीच रिलीज केलेल्या मॅक्सवेलनं लीग स्पर्धेतील शेवटच्या मॅचमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने पॉवर सर्जमध्ये (Power Surge) पाच फोर लगावले. तसंच कॉर्लस ब्रॅथवेटला दोन मॅक्सवेल शैलीतील अपारंपारिक शैलीत रिव्हर्स स्विपही लगावले. धोकादायक मॅक्सवेल 18 व्या ओव्हरमध्ये 41 बॉलमध्ये 66 रनची खेळी करुन आऊट झाला. मॅक्सवेलला या खेळीचा पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल ऑक्शनमध्ये नक्की फायदा होणार आहे.

सिक्सर्स ऑन टॉप

सिक्सर्सला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 72 चा स्कोअर पार करणे हे पहिलं टार्गेट होतं. त्यांची सुरुवातील 2 आऊट 9 अशी अवस्था होती. पण जेम्स विन्सी (James Vince) आणि मोईसेस हेनरिक्स (Moises Henriques) या जोडीनं त्याचं दडपण घेतलं नाही. त्यांनी आठव्या ओव्हरमध्येच ते टार्गेट पूर्ण केलं आणि स्टार्सला स्पर्धेतून बाहेर काढलं.

ही जोडी आऊट झाल्यानंतर जॉर्डन सिल्क आणि या स्पर्धेत जोरदार फॉर्मात असलेला डॅन ख्रिस्टीयन (Dan Christian) या जोडीनं सिक्सर्सला विजय मिळवून दिलाय ख्रिस्टीयननं 23 बॉलमध्ये नाबाद 49 रन काढले. तर सिल्क 35 रनवर नाबाद राहिला.

( वाचा : Big Bash League: ऑस्ट्रेलियन बॅट्समन्स केली 15 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी, ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला! )

आता सिक्सर्सची क्वालीफायरमधील पुढची मॅच पर्थ स्क्रॉचर्सशी (Perth Scorchers) होणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: