फोटो – ट्विटर/@BBL

पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers ) वि. मेलबर्न रेनगेड्स (Melbourne Renegades) या सध्याच्या सिझनमध्ये तळाशी असलेल्या दोन टीमच्या लढतीमध्ये पर्थनं मोठा विजय मिळवत एक पाऊल पुढे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत ओव्हर्सचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रेनगेड्सचा हा स्पर्धेतील सलग सहावा पराभव आहे. त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत फक्त 1 मॅच जिंकली असून ते सध्या सर्वात तळाला आहेत. पर्थविरुद्धच्या लढतीमध्ये त्यांची सर्व टीम 89 रन्सवर ‘ऑल ऑऊट’ झाली. या सिझनमध्ये 100 च्या आत ‘ऑल आऊट’ होण्याची ही तिसरी वेळ आहे.

कॉलिन मुन्रोची दमदार खेळी

घरच्या मैदानावर पर्थची ही पहिलीच मॅच होती. पर्थकडून पहिल्यांदा बॅटिंग करताना जोश इंग्लिस (Josh Inglis) आणि कॉलिन मुन्रो (Colin Munro) यांनी हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांचीही या स्पर्धेतील ही पहिलीच हाफ सेंच्युरी आहे. चांगल्या सुरुवातीनंतर पर्थच्या इनिंगला ब्रेक लागला होता. त्यानंतर टीमची गाडी रुळावर आणण्याचं काम या जोडीनं केलं. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 117 रन्सची पार्टरनरशिप केली. इंग्लिसनं 41 बॉलमध्ये नाबाद 72 रन्स काढले. तर मुन्रोनं 1 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 52 रन्सची खेळी केली. मिचेल मार्शनं (Mitchell Marsh) शेवटच्या बॉलवर लगावलेल्या सिक्सरमुळे पर्थनं रेनगेड्समोर 186 रन्सचं आव्हान ठेवलं.

बॅटिंग ऑर्डर बदलली, खेळ नाही!

मेलबर्न रेनगेड्सनं 186 रन्सचा पाठलाग करताना बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला. त्यांचा कॅप्टन आरोन फिंच ओपनिंगला न येता तिसऱ्या क्रमांकावर आला. या बदलाच्या नंतरही त्यांना फार कमाल करता आली नाही. शॉन मार्शनं (Shaun Marsh) मारलेला फटका बेहरनड्रॉफच्या हाताला लागून स्टंपला लागला. त्यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला असलेला फिंच क्रिजच्या बाहेर असल्यानं आऊट झाला. फिंचला फक्त 8 रन करता आले.

फिंच आऊट झाल्यानंतर रेनगेड्सच्या सर्व आशा या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या शॉन मार्शवर होत्या. जेसन रॉयनं (Jasan Roy)  दमदार कॅच घेत मार्शला परत पाठवलं.

या धक्क्यानंतर रेनगेड्सची टीम सावरलीच नाही. त्यांच्या 9 बॅट्समन्सला दोन आकडी रन्सही करता आले नाहीत. अखेर त्यांची टीम 89 रन्सवर ऑल आऊट झाली आणि पर्थनं 96 रन्सनं दमदार विजय मिळवला. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये पर्थपेक्षा जास्त रन केल्याबद्दल एक अतिरिक्त बोनस पॉईंट (Bash Boost)  रेनगेड्सला मिळाला. त्यांची सध्याची कामगिरी पाहता या एकापेक्षा आणखी बऱ्याच बुस्टची रेनगेड्सला गरज आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: