फोटो – ट्विटर/क्रिकेट ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) मध्ये एक स्फोटक खेळी पाहयला मिळाली. सिडनी सिक्सर्सच्या (Sydney Sixers) डॅन ख्रिस्टियनने (Dan Christian) फक्त 15 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली. ख्रिस्टीयनचा धडाका इतका जोरात होता की तो बिग बॅशमध्ये सर्वात फास्ट हाफ सेंच्युरीचा ख्रिस गेलचा (Chris Gayle) रेकॉर्ड मोडेल असं काही काळ वाटले होते. मात्र गेलचा हा रेकॉर्ड थोडक्यात बचावला. गेलच्या नावावर बिग बॅशमध्ये सर्वात जलद 12 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केल्याचा रेकॉर्ड आहे.

सिक्सर्सची खराब सुरुवात

अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) विरुद्ध सिक्सर्सची सुरुवात खराब झाली. जोश फिलिपे झटपट परतला. जॅक एडवर्ड्स आणि जेम्स विन्सही मोठी खेळी करु शकले नाहीत. त्यामुळे सिक्सर्सची 12 व्या ओव्हरमध्ये 3 आऊट 58 अशी स्थिती होती. त्यानंतर कॅप्टन डॅनियल ह्यूज आणि डॅन ख्रिस्टीन यांची जोडी जमली.

( वाचा : Big Bash League: आयपीएलमध्ये फ्लॉप झालेल्या ‘या’ खेळाडूची स्फोटक खेळी, मेलबर्ननं टाळला आरसीबीचा रेकॉर्ड! )

ख्रिस्टीनचा धडाका

बाराव्या ओव्हरमध्ये बॅटींगला आलेल्या ख्रिस्टीयननं ‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हे तंत्र अवलंबले होते. त्याने लिएम स्कॉटच्या एकाच ओव्हरमध्ये 22 रन्स काढले. त्यानंतर अ‍ॅडलेडचा मुख्य बॉलर राशिद खानवरही (Rashid Khan) हल्ला चढवला. त्याने रशिदच्या एकाच ओव्हरमध्ये 16 रन काढले. त्यापाठोपाठ वेस अगरच्या ओव्हरमध्ये तीन चौकार खेचत ख्रिस्टीननं 15 बॉल्समध्ये 4 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर पुढच्याच बॉलवर तो आऊट झाला. ख्रिस्टीनच्या या आक्रमक हाफ सेंच्युरीच्या जोरावर सिक्सर्सनी स्ट्राईकर्ससमोर 178 रन्सचे आव्हान ठेवले.

सिक्सर्स तिसऱ्या क्रमांकावर

अ‍ॅडलेड स्ट्राईकर्सची टीम 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 139 रन्सच करु शकली. या विजयानंतर सिक्सर्सची टीम पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. सिक्सर्सनं तीन मॅचमध्ये दोन विजयासह 8 पॉईंट कमावले आहेत. जिंकलेल्या मॅचमध्ये त्यांनी दोन बोनस पॉईंट्सचीही कमाई केली आहे.

( वाचा : बिग बॅश स्पर्धेतील तीन नवे नियम माहिती आहेत का? )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: