फोटो – ट्विटर

इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2020 (IPL 2020 ) कोणताही प्रभाव न टाकणाऱ्या जोश फिलिपेने  (Josh Phillipe) ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League ) आक्रमक इनिंग खेळली. सिडनी सिक्सर्सकडून (Sydney Sixers) खेळणाऱ्या फिलिपेनं 57 बॉल्समध्ये 9 फोर आणि 3 सिक्सर्ससह 95 रन्स काढले. सिडनीनं दिलेलं 206 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करता मेलबर्न रेनगेड्सनं साफ निराशा केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB)  49 रन्सचा निचांक ते मोडतात का? असा प्रश्न एकवेळेस निर्माण झाला होता. सिडनीनं ती नामुष्की कशीबशी टाळली.

( वाचा : कॅप्टनसीच्या प्रश्नावर स्मिथ म्हणाला… )

फिलिपेचा धडाका

सिक्सर्सची सुरुवात खराब झाली. जॅक एडवर्डनं निराशा केली. जेम्स विन्सलाही मोठा स्कोअर करता आला नाही. त्यानंतर जोश फिलिपेनं कॅप्टन डॅनिअल ह्यूजच्या जोडीनं आक्रमक खेळ केला. दोघांनी तिसऱ्या विकेट्ससाठी 78 रन्सची पार्टरनरशिप केली. ह्यूज 32 रन्सवर आऊट झाल्यानंतर फिलिपेनं खेळाची सूत्रं हातात घेतली.

फिलिपे आणि जॉर्डन सिल्क यांनी अवघ्या 30 बॉल्समध्ये 70 रन्सची पार्टरनरशिप केली. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फिलिपे आऊट झाला. त्याची सेंच्युरी फक्त पाच रन्सनं हुकली. अनुभवी डॅनियल ख्रिस्टीननं शेवटच्या 3 बॉलमध्ये 11 रन्स काढल्यानं सिक्सर्सनं 200 चा टप्पा पार केला.

रेनगेड्सचा फ्लॉप शो

दिग्गज बॅट्समन्सचा भरणा असलेल्या मेलबर्न रेनगेड्सला 206 चं टार्गेट अशक्य नव्हतं. सिक्सर्सचा अनुभवी कॅप्टन आरोन फिंच 12 रन्स काढून परतला. त्यानंतर पुढच्या चार ओव्हर्समध्ये रेनगेड्सनं आणखी 3 विकेट्स गमावल्या. पहिल्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी काढणारा शॉन मार्श रविवारी फार चालला नाही. तो 13 रन्स काढून आऊट झाल्यानंतर मेलबर्नच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या.

Big Bash League -ऑस्ट्रेलियन टीमनं दुर्लक्ष केलेला शॉन मार्श चमकला! मेलबर्न रेनगेड्सचा दणदणीत विजय

शॉन मार्श गेल्यानंतरही रेनगेड्सची गळती सुरुच होती. त्यांची 9 व्या ओव्हरमध्येच 9 आऊट 43 अशी बिकट अवस्था होती. त्यावेळी T20 लीगमध्ये 49 रन्सवर ऑल आऊट होण्याचा आरसीबीचा रेकॉर्ड रेनगेड़्स मोडण्याची शक्यता होती. मात्र शेवटच्या जोडीनं 17 रन्सची पार्टरनरशिप करत ती नामुष्की टाळली. मेलबर्नची इनिंग 10.4 ओव्हरमध्ये 60 रन्सवर संपुष्टात आली. सिडनी सिक्सर्सनं दणदणीत 145 रन्सनं स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.  

error: