फोटो – NEWSTROOPP

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगची (Big Bash League) T20 क्रिकेट अधिक खुमासदार व्हावं म्हणून सर्व प्रकारचे नवे नियम आणि नव्या कल्पना राबवणारी स्पर्धा अशी ओळख आहे. क्रिकेटमध्ये आणखी नाट्य निर्माण करण्यासाठी त्यांनी यावर्षी तीन नवे नियम या स्पर्धेत लागू केले आहेत. या नियमांचे क्रिकेट विश्वात बरेच पडसाद उमटले होते.

( वाचा : बिग बॅश स्पर्धेतील तीन नवे नियम माहिती आहेत का? )

क्रिकेटमध्ये नव्या कल्पना राबवणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये अजूनही DRS नाही. होय, ज्यांना हे माहिती नाही त्यांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण अजूनही बिग बॅशमध्ये DRS नाही. आता DRS नसल्यानं अनेक वादग्रस्त निर्णय या स्पर्धेत होत असतात. सिडनी थंडर (Sydney Thunder) विरुद्ध पर्थ स्क्रॉचर्स (Perth Scorchers) यांच्यात झालेल्या स्पर्धेच्या 12 व्या मॅचमध्ये एक असाच वादग्रस्त निर्णय अंपायरनं दिला आहे. त्यामुळे स्पर्धेत DRS सुरु करावं अशी मागणी करण्यात येत आहे.

काय होता निर्णय?

सिडनी थंडरची बॅटींग सुरु असताना सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हे सर्व नाट्य घडले. पर्थच्या अ‍ॅण्ड्यू टायचा (AJ Tye) बॉल थंडरचा बॅट्समन उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) बॅटला लागून विकेटकिपरच्या हातामध्ये विसावला. ख्वाजा आऊट होता असाच पर्थच्या खेळाडूसह ती मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांचा समज होता. पण, अंपायर सायमन लाईटबॉडी (Simon Lightbody) यांना काही तसं वाटलं नाही. ख्वाजाची बॅट जमिनीला टेकली असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी त्याला आऊट दिले नाही. अंपायरच्या या निर्णयाचा टायला चांगलाच धक्का बसला. टाय आणि अंपायरमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील झाली.

अंपायर सायमन यांच्या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. आता तरी या स्पर्धेत DRS सुरु करावे अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर अ‍ॅडम गिलख्रिस्टसह अनेकांनी केली आहे.

हा प्रसंग घडला तेंव्हा ख्वाजा 18 वर खेळत होता. त्यानंतर तो लगेच 21 रन्सवर आऊट झाला. थंडरच्या विजयावर या निर्णयाचा फारसा परिणाम झाला नाही. पण, तंत्रज्ञान हाताशी असूनही काही तरी अजब युक्तीवाद करत ते न राबवण्याचा हट्ट ‘बिग बॅश’ आयोजक किती दिवस करणार हा प्रश्न आहे? ‘अनेक फंडे राबवूनही ‘बिग बॅश लीग’ हवी तितकी लोकप्रिय का होत नाही?’ याचे उत्तर यामध्ये दडले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: