फोटो – ट्विटर

दक्षिण आफ्रिका टीमला (South Africa) चांगल्या फिल्डर्सची परंपरा लाभली आहे. या चांगल्या फिल्डर्समध्येही त्याची फिल्डिंग ही नेहमी उठून दिसते. बाऊंड्री लाईनवरुन क्षणात अचूक थ्रो करणे आणि अवघड कॅच सोपे वाटावे असे सहज घेणे हे त्याचे कौशल्य आहे. दक्षिण आफ्रिकेला त्याची क्षमता आयपीएलमधील एका सेंच्युरीमळे पटली.  तो खेळतो तेव्हा कोणतंही मोठं टार्गेट सेफ नसतं. “If it’s in the V, it’s in the tree and if it’s in the arc, it’s out of the park,” हा ज्याच्या बॅटींगचा मंत्र आहे, असा दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन डेव्हिड मिलरचा आज वाढदिवस (David Miller Birthday) आहे. आजच्याच दिवशी ( 10 जून 1989) रोजी मिलरचा जन्म झाला.

आयपीएल स्पर्धेतून ओळख

डेव्हिड मिलरनं वयाच्या 18 व्या वर्षीच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्याच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. दोन वर्ष फर्ल्ट क्लास क्रिकेट खेळल्यानंतर त्याची बांगालदेश A विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली. त्या सीरिजमध्ये तो सर्वाधिक रन करण्यातच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. मिलरची सुरुवातीची वर्ष साधारण होती. 2011 च्या वर्ल्ड कप (Cricket World Cup) टीममध्ये त्याची निवड झाली. आफ्रिकेच्या टीममधील त्याची जागा निश्चित होण्यासाठी 2013 ची आयपीएल स्पर्धा (IPL 2013) कारणीभूत ठरली.

डेव्हिड मिलर त्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (KIXP) टीमचा सदस्य होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धची मॅच मिलरचं करियर बदलणारी ठरली. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करताना 3 आऊट 190 रन केले होते. 191 रनचा पाठलाग करताना 10 व्या ओव्हरमध्ये पंजाबची अवस्था 4 आऊट 64 होती. निम्मी इनिंग संपल्यानंतर पंजाबला विजयासाठी आणखी 125  पेक्षा जास्त रन आवश्यक होते. मिलर आणि राजगोपाल सतीश ही पंजाबची शेवटची बॅटींग जोडी मैदानात होती.

पराभवाच्या दारात गेलेल्या पंजाबला मिलरनं (David Miller Birthday) परत आणलं. त्याने त्या मॅचमध्ये क्लिन हिट काय असते. एक उत्तम फिनिशिर काय असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा क्लास काय आहे हे जगाला दाखवले. मिलरने फक्त 38 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत पंजाबला 12 बॉल आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मिलरच्या झंझावातामुळे पंजाबने उरलेले 125 रन 48 बॉलमध्येच पूर्ण केले. या आक्रमक सेंच्युरीनंतर मिलरकडे दक्षिण आफ्रिकन टीमचे लक्ष गेले. याच खेळीमुळे वन-डे आणि टी20 टीममध्ये त्याची फिनिशर म्हणून जागा नक्की झाली.

हाशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर डिपेंडेबल’!

‘किलर मिलर’चा उदय

आरसीबी विरुद्धच्या खेळीनं मिलरचं आयपीएल आणि दक्षिण आफ्रिकन टीममधील भवितव्य बदललं. त्याच्यामध्ये सातत्याने फोर मारण्याची क्षमता होती. त्याचबरोबर त्याची क्रिझमध्ये उभे राहून लाँग ऑनला ड्राईव्हच्या साह्याने सिक्स मारण्याच्या क्षमतेमुळे तो फॅन्समध्ये ‘किलर मिलर’ (Killer Miller) म्हणून ओळखला जाऊ लागला.

डेव्हिड मिलरनं 2013 पाठोपाठ 2014 मधील आयपीएलमध्येही पंजाबकडून 400 पेक्षा जास्त रन काढले. पंजाबने 2014 च्या सिझनमध्ये फायनलमध्ये धडक मारली. त्यांच्या या प्रवासात मिलरच्या 446 रनचे मोलाचे योगदान होते. मिलरने आयपीएलच्या एका सिझनमध्ये आजवर काढलेले हे सर्वात जास्त रन आहेत.

पहिली सेंच्युरी आणि रेकॉर्ड पार्टरनरशिप

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 वर्ष घालवल्यानंतर मिलरनं (David Miller Birthday) 2015 साली पहिली सेंच्युरी झळकावली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीत अन्य प्रमुख बॅट्समनची साथ न मिळूनही मिलरनं नाबाद 130 रन काढले. दक्षिण आफ्रिकेच्या एकूण 262 रनमध्ये त्याचा जवळपास निम्मा वाटा होता.

त्यानंतर महिनाभरात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध हॅमिल्टनमध्ये झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 83 अशी अवस्था होती. त्यानंतर जेपी ड्यूमिनी (JP Duminy) सोबत मिलरची जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी 256 रनची नाबाद पार्टरनशिप केली. ही वन-डे क्रिकेटची इतिहासातील पाचव्या विकेट्ससाठी आजवरची सर्वोच्च पार्टनरशिप आहे. मिलरनं त्या मॅचमध्ये फक्त 92 बॉलमध्ये 7 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीनं नाबाद 138 रन काढले. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये मिलरनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत फक्त 18 बॉलमध्ये 272.22 च्या स्ट्राईक रेटनं 49 रन काढले होते.

सर्वात वेगवान सेंच्युरी

डेव्हिड मिलरनं 2017 साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या T20 मध्ये फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. त्याने 7 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील वेगवान सेंच्युरी झळकावली. दक्षिण आफ्रिकेच्याच रिचर्ड लेव्हीचा (Richard Levi) 5 वर्षांपासून अबाधित असलेला वेगवान सेंच्युरीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी मिलरने लेव्हीपेक्षा 10 बॉल कमी घेतले. त्यानंतर दोन महिन्यांनी रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्ध 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावत मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पाच किंवा त्यापेक्षा खालील नंबरवर येऊन सेंच्युरी झळकावणारा मिलर हा एकमेव बॅट्समन आहे. तसेच सलग 71 आंतरराष्ट्रीय T20 मॅचमध्ये एकदाही शून्यावर आऊट न होण्याचा रेकॉर्डही मिलरच्या नावावर आहे.

मिलरवर मोठी जबाबदारी

डेव्हिड मिलर (David Miller Birthday) आता दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी बॅट्समन आहे. मात्र त्याच्या बॅटींगमध्ये सातत्य नाही, असा आरोप केला जातो. त्यानंतरही त्याची वन-डेमधील सरासरी 40 पेक्षा आणि आंतरराष्ट्रीय T20 मधील सरासरी 30 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 100 पेक्षा जास्त आहे.

6 वर्षांपूर्वीची धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचं कारण?

मिलरला आजवर एकही टेस्ट मॅच खेळायला मिळालेली नाही, पण लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये फिनिशरचा रोल तो सातत्याने पार पाडतोय. या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अस्थिर टीममध्ये स्थिर असलेला आणि गर्दी खेचू शकणारा तो क्रिकेटपटू आहे. सध्या बदलामधून जात असलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमध्ये मिलरवर मोठी जबाबदारी आहे. त्याने आगामी T20 वर्ल्ड कपमधील त्याच्यातील गुणवत्तेला न्याय देत ही जबाबदारी पूर्ण केली तर दक्षिण आफ्रिका काही चांगले विजय मिळवून इतर टीम्सना धक्का देऊ शकेल.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: