फोटो- ट्विटर

टीम इंडियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमवर मोठी टीका झाली होती. ऑस्ट्रेलियन टीमचा हेड कोच जस्टीन लँगर (Justin Langer) या टीकेचा केंद्रबिंदू होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी 2021 हे वर्ष खराब ठरत होतं. त्यांचा अगदी बांगलादेशमध्येही सपाटून पराभव झाला. पण याच वर्षात झालेला T20 वर्ल्ड कप जिंकत ऑस्ट्रेलियन टीमनं जोरदार कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लँगर ज्या कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीसाठी प्रसिद्ध होता, त्याच वृत्तीनं ऑस्ट्रेलियानं सर्व इतिहास विसरत पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन हेड कोच जस्टीन लँगरसाठी यंदाचा वाढदिवस (Justin Langer Birthday) खूप खास आहे. आजच्याच दिवशी (21 नोव्हेंबर 1970) रोजी लँगरचा जन्म झाला.

लँगरचा जीव होता धोक्यात

लँगर त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये लढवय्या खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याची खेळाबद्दलची कमिटमेंट इतकी टोकाची होती की एका टेस्टमध्ये तो अक्षरश:  जीवाची पर्वा न करता मैदानात उतरणार होता! लँगरचा जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा तेंव्हाचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं तर इनिंग घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेट लेखक/इतिहासकार अभिषेक मुखर्जी यांनी लँगरच्या लढाऊपणाचा तो किस्सा सांगितला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2006 साली जोहान्सबर्गमध्ये झालेली ती टेस्ट होती. जस्टीन लँगरची 100 वी टेस्ट! दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग दुसऱ्या दिवशी 303 रन्सवर संपुष्टात आली. लँगरला त्याची शंभरावी टेस्ट मोठी खेळी करुन संस्मरणीय करण्याची चांगली संधी (Justin Langer Birthday) होती. लँगरनं बॅटिंग सुरु करुन जेमतेम दहा मिनिटेच झाली होती की, मखाया एंटीनीचा एक उसळता बॉल खेळण्याचा लँगरचा प्रयत्न फसला. त्याच्या हॅल्मेटच्या मागच्या बाजूला तो बॉल लागला. लँगर जमिनीवर आडवा झाला. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने त्याला मैदानाच्या बाहेर नेले.

लँगरला दोन टाके, ऑस्ट्रेलिया अडचणीत!

लँगरच्या डोक्यावर रक्त दिसत होते. त्याला दोन टाके पडले होते. त्यामुळे तो आता परत बँटिंगला येण्याची शक्यता नव्हती. मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही….चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आणखी 44 रन्सची आवश्यकता होती. डेमियन मार्टीन आणि स्टुअर्ट क्लार्क ही जोडी मैदानात होती.

जस्टीन लँगर बॅटिंगला येण्याची शक्यता कमी आहे, असं ऑस्ट्रेलियाच्या मीडिया मॅनेजरने जाहीर केलं होतं. लँगरच्या अनुपस्थितीत इनिंग ओपन करणाऱ्या माईक हसीचंही तसंच मत होतं. ‘काहीही झालं तरी क्रिकेट हा फक्त खेळ आहे. लँगरची घरी बायको आणि चार मुलं वाट पाहतायत’ असं हसीने सांगितले होते.

ऑस्ट्रेलियाचा वनवास संपला, न्यूझीलंडला हरवत बनले वर्ल्ड चॅम्पियन

दक्षिण आफ्रिकेचा इशारा!

पाचव्या दिवशी मार्टिन त्याची सेंच्युरी काढून आऊट झाला. त्यानंतर क्लार्कने दोन चौकार मारले, पण त्यालाली एंटिनीने आऊट केले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 16 रन्सची आवश्यकता होती. त्यावेळी ब्रेट ली – कॅस्प्रोविझ जोडी मैदानात होती.

या जोडीनंतर फक्त जस्टीन लँगर हा एकच बॅट्समन शिल्लक होता. ‘त्याला आम्ही कोणतीही दया दाखवणार नाहीत. त्याच्या अंगावर उसळलते बॉल टाकू’ हे दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर मार्क बाऊचर याने आदल्या दिवशीच जाहीर केले होते. त्यामुळे जखमी लँगर पुन्हा मैदानात उतरला तर त्याच्या जीवाला धोका होता!

सर्वाधिक रनचा रेकॉर्ड आणि देशाची सर्वात मोठी प्रतीक्षा संपवणारा ऑस्ट्रेलियन

लँगर खेळण्यासाठी तयार

हे सर्व सुरु असताना जखमी जस्टीन लँगर पॅड बांधून गरज पडली तर अकराव्या क्रमांकावर खेळण्यास तयार (Justin Langer Birthday) होता. लँगरला मैदानात जाण्यापासून रोखण्याचा एकच उपाय आहे हे त्याचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगला माहिती होते. नववी विकेट पडली की इनिंग घोषित करायची हे त्याने मनाशी ठरवले होते.

ऑस्ट्रेलियाच्या आणि लँगरच्या सुदैवाने तशी वेळ आली नाही. ली-कॅस्प्रोविझ या जोडीने उरलेले रन्स काढत ऑस्ट्रेलियाला ती टेस्ट जिंकून दिली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: