फोटो – ट्विटर

भारताचा द्वेष हेच ज्याच्या आयुष्याचे मुख्य भांडवल आहे, असा पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादचा आज वाढदिवस आहे (Javed Miandad Birhday) आहे. आजच्याच दिवशी (12 जून 1957) रोजी मियाँदादचा जन्म झाला. जावेद भारताचा द्वेष करण्याची दोन मुख्य कारणे असावीत.

भारत विरोधाची दोन मुख्य कारणं

  1. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup) भारताविरुद्ध हरल्यानंतर त्याचे क्रिकेट करियर संपले. 21 वर्ष खेळूनही टीममधील जागा नव्या खेळाडूंना सोडण्यासाठी तयार नसलेला जावेद त्यामुळे नाराज झाला असावा 2) मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जावेद व्याही आहे.

क्रिकेट आणि राजकाराणाची सांगड घालू नये. राजकीय चष्म्यातून कोणत्याही क्रिकेटपटूंकडे बघू नये हा क्रिकेट फॅन्सचा दावा ‘Cricket मराठी’ ला देखील मान्य आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटपटू आहे, म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ असा कायदा जगातल्या कोणत्याही देशात नाही. अगदी तसंच एखादा व्यक्ती क्रिकेटपटू आहे म्हणून त्याची चुकीची, भारतविरोधी असलेली बाजू दाखवायची नाही हे ‘Cricket मराठी’ ला मान्य नाही.

मैदानातील जावेद

जावेद मियाँदाद कराचीतील गल्लीत वाढला. त्या गल्लीत क्रिकेट खेळत असताना 18 व्या वर्षीच पाकिस्तानच्या टीममध्ये आला. जावेदची गल्लीतील टगेगिरी ही संधी मिळेल तेव्हा मैदानात देखील बाहेर आली आहे. पर्थमध्ये 1981 साली झालेल्या टेस्टमध्ये डेनिस लिली (Dennis Lillee) याच्याशी त्याची झटापट झाली. यावेळी जावेदनं लिलीवर बॅट उगारली होती.

जावेद आणि पाकिस्तान देश या दोघांसाठी अभिमानाचा क्षण 1986 साली आला. भारताविरुद्ध शारजामध्ये झालेल्या फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर पाकिस्तानला जिंकण्यासाठी 4 रनची आवश्यकता होती. त्यावेळी जावेदनं चेतन शर्माच्या (Chetan Sharma) बॉलवर सिक्स लगावला. या सिक्सने जावेद (Javed Miandad Birhday) खूप मालामाल झाला.

तो काम करत असलेल्या हबीब बँकेने त्याला प्रमोशन दिले. पाकिस्तान सरकारने पुरस्कार दिले. शारजातील अरबांनी मोठी बक्षिसी दिली. त्याला मर्सिडीज गिफ्ट करण्यात आले. इतकंच नाही तर जावेदला 80 हजार अमेरिकी डॉलर किमतीचे हिऱ्याचे ब्रेसलेट देण्यात आले, अशी त्या काळी चर्चा होती. या सर्वांपेक्षा जावेदला आणि समस्त पाकिस्तानला सतत बोलण्यासाठी एक मुद्दा या सिक्सने मिळवून दिला.

जावेदच्या क्रिकेट करियरमधील तिसरा प्रसंग 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1992) घडला. भारताविरुद्धच्या मॅचमध्ये विकेट किपर किरण मोरे (Kiran More) याच्या अपिलाने जावेद कंटाळला होता. त्यामधून दोघामध्ये थोडी बोलाचाली झाली. त्यानंतर त्याने मोरेला चिडवण्यासाठी बेडूक उड्या मारल्या. भारताने दिलेल्या 216 रनचा पाठलाग करताना जावेद 110 बॉलमध्ये 40 रन काढून आऊट झाला.

सर्जिकल स्ट्राईनंतर बरळला जावेद

भारत हा घाबरट देश आहे.

मी त्यांना एक सिक्स मारला होता त्यांना तो आजही लक्षात आहे.

त्यांना आता आणखी एका मैदानात सिक्स मारण्याची गरज आहे.

भारतीयांनी मोदींना हाकलून दिले पाहिजे

प्रत्येक पाकिस्तानी शहीद होण्यासाठी तयार आहे.

भारताने 2016 साली उरीमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंकर (URI Surgical Strike)  ही पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेल्या शेकडो दहशतवाद्यांपैकी कोणत्याही एकाच्या तोंडी शोभेल अशी भाषा आहे. ही सर्व भाषा दहशतवाद्याची नाही तर जग ज्याला क्रिकेटपटू म्हणून ओळखते त्या जावेद मियाँदादची आहे.

‘भारत सुरक्षित देश नाही’

भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) पास केल्यानंतर जावेद मियाँदाद भडकला होता. त्यावेळी त्याने भारत हा सुरक्षित देश नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) भारताशी संबंध तोडावे अशी मागणी केली होती.

भारताविरुद्ध उपसली तलवार

पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) याने काश्मीर प्रश्नावर भारताला युद्धाची धमकी दिली होती. इम्रानच्या या धमकीनंतर जावेदनं (Javed Miandad Birhday) तलवार हातामध्ये घेऊन मोर्चा काढला. ‘आधी बॅटने सिक्सर मारत असे आता तलवारीचाही वापर करु शकतो. बॅटने सिक्स मारला होता तर तलवारीने माणसं का मारु शकत नाही?’  असा प्रश्न विचारत या गुंड जावेद मियाँदादने धमकी दिली होती.

अणुबॉम्बसाठी बँक अकाऊंट

मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे सर्व जग संकटात होता. या संकटाच्या काळातही जावेदचा भारत द्वेष कमी झालेला नव्हता. कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) पाकिस्तान कर्ज मागण्यासाठी गेला तर ते पाकिस्तानकडे असलेला अणूबॉम्ब जप्त होऊ शकतो. हा अणूबॉम्ब वाचवायचा असेल तर सर्व पाकिस्तानी नागरिकांनी पैसा गोळा केला पाहिजे, असे जावेदने सांगितले. इतकेच नाही तर त्यासाठी मी ‘नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान’ मध्ये नवं खातं उघडलं आहे. त्या खात्यात जगभरातील पाकिस्तानी नागरिकांनी पैसे जमा करावे, असे आवाहन जावेदने मागच्या वर्षी केले होते.

पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?

जावेद मियाँदाद दहशतवादी

मुंबईमध्ये 1993 साली बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये आहे. भारताने वारंवार मागणी करुनही पाकिस्तानने त्याचा ठावठिकाणा अजून सांगितलेला नाही. दाऊद इब्राहिम विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस देखील बजावली आहे.

दाऊदचा सर्व भूतकाळ जावेदला माहिती आहे. तरीही निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या दाऊदचा तो नातेवाईक बनला. जावेदला दाऊदचा ठावठिकाणा देखील माहिती असेल, तरीही त्याने याबाबत कधीही इंटरपोलला माहिती दिलेली नाही. दाऊद इब्राहिम या भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला लपवून ठेवण्यात जावेदचाही हातभार आहे. त्यामुळे जावेद मियाँदाद (Javed Miandad Birhday) हा क्रिकेटपटू नसून दहशतवादीच आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: