फोटो – ट्विटर, आयसीसी

तळहाताचा वापर करत लेग स्पिन करणारा डावखुरा बॉलर म्हणजे चायनामन. क्रिकेट विश्वातील ही एक अत्यंत दुर्मिळ जमात आहे. अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच चायनामन बॉलर्सनी टेस्ट क्रिकेट खेळले आहे. क्रिकेटवेड्या आपल्या खंडप्राय देशात तर हा मान एकमेव बॉलरने मिळवला आहे. तो चायनामन बॉलर म्हणजे कुलदीप यादव. कुलदीपचा आज वाढदिवस (Kuldeep Yadav Birthday) आहे. आजच्याच दिवशी (14 डिसेंबर 1994) कुलदीपचा जन्म झाला.

कसा बनला चायनामन?

कुलदीपनं क्रिकेटपटू व्हावं ही त्याच्या वडिलांची इच्छा होती. कुलदीप यादव लहानपणी वासिम अक्रमचे (Wasim Akram) व्हिडीओ पाहून प्रभावित झाला होता. भारतामध्ये तो काळ डावखुरा फास्ट बॉलर  झहीर खानचा (Zaheer Khan) होता. कुलदीपला भारताचा पुढचा झहीर खान व्हायचं होतं. याच उद्देशानं तो कोच कपिल पांडेच्या अकादमीमध्ये गेला.

फास्ट बॉलरला आवश्यक असा फिटनेस कुलदीपचा नव्हता. त्याच्या बॉलिंगचा अभ्यास केल्यानंतर कोचनी त्याला स्पिनर होण्याचा सल्ला दिला. कुलदीपला तो सल्ला पटला नव्हता. कोचनी सांगितलंच आहे तर त्यांना फसवण्यासाठी त्यानं मुद्दाम वेगळ्या अ‍ॅक्शननं बॉलिंग केली. कोचनी त्याला पुन्हा तशीच बॉलिंग टाकण्यास सांगितली. कुलदीपनं पुन्हा तसाच बॉल टाकला. त्याच्या 2 बॉलने कोच पांडे प्रभावित झाले. त्यांनी कुलदीपला तुझी हीच बॉलिंग अ‍ॅक्शन (Kuldeep Yadav Birthday)  असेल, असे सांगितले.

त्याच दिवसापासून कुलदीप चायनमान बॉलर (Chinaman bowler) बनला. फास्ट बॉलर्सच्या गजबजलेल्या रस्त्यातून प्रवास करण्याऐवजी त्याने चायनामनचा एकाकी मार्ग निवडला. या एकाकी प्रवासातूनच त्याला त्याचे स्टेशन (टीम इंडियातील जागा) गाठता आले.

64 घरांचा सरदार ते 22 यार्डातील सैनिक!

पहिला भारतीय!  

कुलदीप वयाच्या 17 व्या वर्षापासूनच टीम इंडियाच्या अंडर 19 टीममध्ये होता. तो सुरुवातीला कुणाच्या रडारवर नव्हता. 2012 साली त्याला मुंबई इंडियन्सने बोलावले. मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये कुलदीपनं सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) चकवले. त्यामुळे त्याची हेडलाईन झाली. पण, मुंबई इंडियन्सनध्ये त्याला जागा मिळाली नाही.

2014 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ‘कुलदीप’ सर्वप्रथम ‘चमकला’. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये त्याला विकेट मिळाली नाही. पण, त्यानंतरच्या स्कॉटलंड विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने हॅट्ट्रिक (Hat-trick) घेतली. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा कुलदीप हा पहिलाच भारतीय (Kuldeep Yadav Birthday)  आहे. त्यानंतर वन-डे आणि T20 या दोन्ही प्रकारात हॅट्ट्रिक घेणारा कुलदीप हा आजवरचा एकमेव भारतीय बॉलर आहे. त्यापैकी वन-डे क्रिकेटमध्ये चेतन शर्मा आणि कपिल देव यांच्यानंतर तब्बल दोन दशकांनी एखाद्या भारतीय बॉलरनी ही किमया केली होती.

कुलदीपने 2014 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त 14 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला लगेच कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) करारबद्ध केले. त्या आयपीएल सिझनमध्ये कुलदीपला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण चॅम्पियनस लीगमध्ये कुलदीपने सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे 2014 विरुद्ध वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये त्याची टीम इंडियाच्या वन-डे टीममध्ये निवड झाली. या सीरिजनंतर कुलदीपने लिस्ट A आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

टीम इंडियात प्रवेश

कुलदीप यादवसाठी 2016 साली परिस्थिती बदलण्यास सुरूवात केली. त्यावर्षी त्याने आयपीएल सिझन गाजवला. दुलिप ट्रॉफी स्पर्धेतील 3 मॅचमध्ये 17 विकेट्स घेतल्या. त्याची चायनामन बॉलिंग बॅटर्ससाठी कोडं बनली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध धरमशालामध्ये 2017 साली सीरिजमधील शेवटची टेस्ट होणार होती.

धरमशाला टेस्टपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) जखमी झाला. त्याच्या जागी कॅप्टन बनलेल्या अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) 5 बॉलर्ससह खेळण्याचा आक्रमक निर्णय घेतला. त्यामुळे विराटच्या जागी कुलदीपला संधी (Kuldeep Yadav Birthday) मिळाली. डेव्हिड वॉर्नर ही कुलदीपची टेस्ट क्रिकेटमधील पहिली विकेट. पहिल्या टेस्टमध्ये कुलदीपनं 4 विकेट्स घेतल्या.

KulCha Era in Team India

टीम इंडिया 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) फायनलमध्ये पराभूत झाली. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या त्या मोठ्या पराभवानंतर अश्विन आणि जडेजा या स्पिनर्सना लिमिटेड ओव्हर्सच्या टीममधून वगळण्यात आले. त्यानंतर टीम इंडियात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या जोडीचा उदय झाला. कुलदीप आणि चहल या त्यांच्या नावातील अद्याक्षरापासून या जोडीला कुलचा (KulCha) हे नाव मिळाले.

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीनं 2017 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यास सुरूवात केली. या जोडीला स्टंपच्या मागे महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) मार्गदर्शन मिळत होतं. पुढील दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे एक धोकादायक त्रिकुट बनले होते. कुलदीपला या परिस्थितीचा (Kuldeep Yadav Birthday)  सर्वात जास्त फायदा झाला.

कुलदीपने 2018 साली 19 मॅचमध्ये 45 विकेट्स घेतल्या. त्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स फक्त राशिद खानने (Rashid Khan) घेतल्या होत्या. मात्र राशिदच्या बहुतेक विकेट्स या कमकुवत टीमविरुद्ध (Minnows Team)  होत्या. कुलदीप या काळात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 100 विकेट्स घेणारा भारतीय बॉलर बनला. त्याचबरोबर T20 क्रिकेटमध्येही कुलदीपचा इकोनॉमी रेट आणि विकेट्स रेट प्रभावी होता.

टोकाचे यश आणि अपयश अनुभवणारा टीम इंडियाचा Unsung Hero

बाबरला धक्का, पाकिस्तानला झटका!

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमधील मॅच (India vs Pakistan,  Cricket World Cup 2019) मॅच ही कुलदीपच्या करिअरमधील कधीही न विसरता येणारी मॅच आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या 337 रनचा पाठलाग करताना पाकिस्ताननं दुसऱ्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप केली होती.

टीम इंडियाची चॅम्पियन ट्रॉफी फायनलची आठवण जागी करणारा फखर झमान (Fakhar Zaman) आणि बाबर आझम (Babar Azam) ही जोडी मैदानात सेट झाली होती. मँचेस्टरच्या स्टेडियमवर पावसाचे ढग जमा झाले होते. त्यामुळे डकवर्थ लुईस पद्धत लागू झाली तर टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी विकेट्स हव्या होत्या.

भुवनेश्व कुमार मॅचमध्येच जायबंदी झाल्यानं टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या. त्याचवेळी कुलदीप यादव (Kuldeep Yadav Birthday) मदतीला धावला. त्याने 24 व्या ओव्हरमध्ये राऊंड द विकेट टाकलेला बॉल बाबरला झेपलाच नाही. त्याने बाबरच्या बचावाला धक्का देत दांडी उडवली. त्या वर्ल्ड कपमधील तो सर्वोत्तम बॉल होता.  कुलदीपने पुढच्याच ओव्हरमध्ये फखर झमनला आऊट करत पाकिस्तानचे परतीचे मार्ग बंद केले.

उतरता काळ

कुलदीप यादवच्या कारकिर्दीमधील उतरत्या काळाला 2019 साली सुरुवात झाली होती. त्यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत कुलदीपची मिस्ट्री बॅटर्सनी ओळखली होती. त्याची बॉलिंग खेळणे सोपे जात होते. कुलदीपचा स्पीड देखील कमी झाल्यानं तो प्रतिस्पर्धी टीमचं हक्काचं गिऱ्हाईक बनत होता पहिल्या 8  मॅचमध्ये त्याला फक्त 3 विकेट्स मिळाल्या.

केकेआरचे होम ग्राऊंड इडन गार्डनवर होणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धची मॅच कुलदीपसाठी महत्त्वाची होती. त्या मॅचमध्ये यशस्वी होणे कुलदीपसाठी आवश्यक होते. प्रत्यक्षात मॅचमध्ये जे घडले ते कुलदीपला कधीही लक्षात ठेवावे असे वाटणार नाही. आरसीबीच्या मोईन अलीने (Moeen Ali)  कुलदीपला टार्गेट केले.

मोईन अलीने त्या मॅचमध्ये एकूण 66 रन काढले. या 66 पैकी 56 रन त्याने कुलदीपच्या बॉलिंगवर काढले. कुलदीपच्या शेवटच्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर बाऊंड्री लाईनवर कॅच देऊन आऊट होण्यापूर्वी मोईनने पाच बॉलमध्ये 27 रन काढले होते. त्या मॅचमधील कुलदीपचे बॉलिंग विश्लेषण होते 4 ओव्हर्स शून्य मेडन 29 रन आणि 1 विकेट.

2 वर्षांपासून विचारत नाही कुणी, टीम इंडियाच्या बॉलरला आठवला महेंद्रसिंह धोनी!

कुलदीपच्या आत्मविश्वासाला त्यामुळे मोठा धक्का बसला. मोईन अलीने केलेल्या धुलाईमुळे त्याला मैदानातच रडू आवरले नव्हते. त्यानंतर तो त्या आयपीएल सिझनमधील एकही मॅच खेळला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतही पाकिस्तान विरुद्धच्या मॅचचा अपवाद वगळता कुलदीप फारसा चालला नाही. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्याला टीममधून वगळण्यात आले.

नव्या इनिंगची गरज

कुलदीप यादव 2019 च्या वर्ल्ड कपनंतर आंतराराष्ट्रीय क्रिकेट फारसा खेळलाच नाही. रवी शास्त्रींनी विदेशातील नंबर 1 स्पिनर असं कुलदीपचं वर्णन केले होते. पण त्याला नंतर प्लेईंग 11 मध्ये संधी मिळालीच नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो होता. खेळाडू एकापाठोपाठ जखमी होत असतानाही कुलदीपला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. चेन्नईमध्ये यावर्षी इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये तो खेळला पण तिथंही त्याला विराटनं अगदी क्वचित बॉलिंग दिली.

केकेआरमध्ये वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy)  उदय झाल्याने त्यांना कुलदीपची गरज उरली नाही. त्यांनी कुलदीपला बेंचवरच बसवले. यावर्षी आयपीएल स्पर्धेतील सेकंड हाफमध्ये कुलदीपने दुखापतीमुळे माघार घेतली होती.

कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? समोर आलं नेमकं कारण…

आगामी आयपीएल सिझनमध्ये दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) सर्व टीमची रचना बदलणार आहे. त्यामध्ये कुलदीपला कोणती आयपीएल टीम मिळते हे महत्त्वाचे असेल. त्या आयपीएल टीमकडून खेळताना कुलदीपनं त्याचा हरवलेला आत्मविश्वास मिळवला तर त्याची कारकिर्द (Kuldeep Yadav Birthday) पुन्हा एकदा बहरणार हे नक्की आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: