
जॉर्ज बुश, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प या तीन अमेरिकन अध्यक्षांशी शाहिद आफ्रिदीचं खास नातं आहे. या सर्व अध्यक्षांच्या काळात शाहिद आफ्रिदीनं रिटायरमेंट जाहीर केली आहे. शाहिद आफ्रिदीचा आज वाढदिवस (Shahid Afridi Birthday) आहे. आजच्या दिवशी म्हणजे 1 मार्च 1980 रोजी त्याचा जन्म झाला अशी माहिती इंटरनेटवरील उपलब्ध रेकॉर्ड सांगतात. अर्थात हा पाकिस्तानी (Pakistan) खेळाडूचा आणि त्यातही शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड असल्याने त्याच्या वाढदिवसाच्या तारखेवर प्रत्येकाने आपआपल्या विचारशक्तीनुसार विश्वास ठेवावा असं आवाहन ‘Cricket मराठी’ सर्व वाचकांना करत आहे.
वयाच्या वादाबरोबरच शाहिदी आफ्रिदी हा रिटायरमेंट घेण्यासाठी देखील प्रसिद्ध होता. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये एकूण पाच वेळा रिटायरमेंट घेतली आहे. 2006 ते 2017 या अकरा वर्षात आफ्रिदी एकूण पाच वेळा रिटायर झाला आहे.
जॉर्ज बुशच्या काळात पहिल्यांदा रिटायर!
आफ्रिदीनं 12 एप्रिल 2006 रोजी सर्वात पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली होती. 2007 च्या क्रिकेट वर्ल्ड कपवर (Cricket World Cup) लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्त होत असल्याचं त्याने म्हंटलं होतं. मात्र त्यानंतर दोन आठवड्यातच त्याने यु टर्न घेतला.
शाहिद आफ्रिदीला पुन्हा टेस्ट खेळण्यासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त वाट पाहवी लागली. 2010 साली तर तो थेट टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन बनला. अर्थात त्याची टेस्ट क्रिकेटमधील सेकंड इनिंग फक्त 1 टेस्ट टिकली.
Explained : पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही ? )
पीसीबीवर नाराज होऊन दुसऱ्यांदा रिटायर!!
आफ्रिदीला रिटायरमेंट घेण्याची दुसरी हुक्की 2011 साली आली. त्या वर्षी झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2011) पाकिस्तान भारताविरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभूत झाले होते. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने त्याला कॅप्टनसीपदावरुन बडतर्फ केले.
कॅप्टनसीवरुन काढल्यानं दुखावलेल्या आफ्रिदीनं तात्काळ रिटायरमेंट जाहीर केली. पीसीबीवरही (PCB) त्याने आरोप केले. आफ्रिदीचा हा सर्व निर्धार पाच महिनेच टिकला. त्याने पाच महिन्यातच दुसऱ्यांदा यु टर्न घेत रिटायर होण्याचा निर्णय मागे घेतला.
तरुणांना संधी देण्यासाठी तिसऱ्यांदा रिटायर!!!
आफिद्री 2012 मध्ये त्याच्या सवयीनुसार तिसऱ्यांदा रिटायर झाला. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये खराब खेळ केल्यामुळे निराश होऊन त्याने वन-डे क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेत असल्याचं आफ्रिदीनं (Shahid Afridi Birthday) सांगितलं. पण पाकिस्तानी क्रिकेटमधला सर्वात तरुण तर तोच होता. त्यामुळे हा तरुण आणखी तीन वर्ष म्हणजेच 2015 च्या वर्ल्ड कप पर्यंत पाकिस्तानच्या वन-डे टीममध्ये होता.
शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली, काश्मीरला स्वतंत्र करण्याची केली भाषा!
रिटायरमेंटची चौथी उबळ!!!
आफ्रिदीला 2016 मध्ये रिटायरमेंटची चौथी उबळ आली. त्यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कप नंतर आंतरराष्ट्रीय T20 मधून रिटायर होणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. त्यानंतर वर्ल्ड कप सुरु होण्याच्या एक महिना आधी पुन्हा एकदा यु टर्न घेतला. T20 वर्ल्ड कप नंतर रिटारमेंटच्या निर्णयाचा फेरविचार करु असे आफ्रिदीने जाहीर केले.
….अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात शेवटचा रिटायर!!!!!
आणि अखेर 2017 साली आफ्रिदी पाचव्यांदा आणि खरोखरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला. 20 फेब्रुवारी 2017 या दिवशी आफ्रिदीनी ‘आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ रिटायर होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर गेल्या चार वर्षात आफ्रिदी आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला नाही.
आफ्रिदी या वर्षी पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) खेळला. या लीगमध्ये त्याचा होणारा जावाई शाहीन आफ्रिदी देखील होता. या स्पर्धेतून त्यानं माघार घेत आपण पुढे खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पण, तो हे खरंच करेल का? याची खात्री आम्ही तरी देऊ (Shahid Afridi Birthday) शकत नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.