फोटो – ट्विटर

आशिष नेहराचं एक वाक्य यापूर्वी वाचले होते. “सध्या शरीरावर जखमा नाहीत तर संपूर्ण शरीरच जखमांमध्ये अडकलंय” शेन वॉटसनच्या (Shane Watson) 14 वर्षांच्या करियरचं वर्णन करण्यासाठी नेहराजींचं हे एकच वाक्य पुरेसं आहे. पाय, पिंडरी, कंबर, गुडघा, खांदा आणि हार्टअटॅकचा संशय आलेली विषबाधा या सर्व समस्यांशी वॉटसननं त्याच्या करियरमध्ये प्रतिस्पर्धी टीमपेक्षा जास्त सामना केला. रंगात असताना सर्व बॉलर्सना गुडघे टेकवायला लावणा-या वॉटोचा आज वाढदिवस (Shane Watson Birthday) आहे. आजच्या दिवशी (17 जून 1981) वॉटसनचा जन्म झाला.

2002 मध्ये पदार्पण, 2008 मध्ये स्थैर्य

रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) 2002 साली ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला. पॉन्टिंगच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियन टीमची नवी रचना होत होती. त्या रचनेमध्ये उपयुक्त ऑल राऊंडर अशी ओळख असलेल्या वॉटसनचा टीममध्ये समावेश झाला. तो टीममध्ये आला त्यावेळी ऑस्ट्रेलियन साम्राज्याचा सूर्य क्रिकेटमध्ये कधी मावळत नव्हता. वॉटसनला सुरुवातीपासूनच दुखापतीनं त्रस्त केलं. 2003 च्या वर्ल्ड कपमध्येही दुखापतीमुळे अगदी शेवटच्या क्षणी वॉटसनला टीममधून बाहेर पडावे लागले होते.

सुरुवातीचे सहा वर्ष आत-बाहेर घालवल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला स्वत:ची महती पटवून देण्यासाठी वॉटसनला भारतामध्ये जावे लागले. अर्थात आयपीएल खेळावे लागले. 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएलमध्ये (IPL 2008) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) यशोगाथेचा तो महत्त्वाचा खेळाडू होता. वॉटसननं (Shane Watson Birthday) त्या आयपीएलमध्ये राजस्थानकडून सर्वात जास्त रन काढले आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स घेतल्या. या आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन टीमचा वॉसनवरील विश्वास वाढला. तो टीममध्ये परतला.

ड्रीम कालखंड

2009 ते 2011 हा वॉटसनच्या आयुष्यातील ड्रीम कालखंड होता. मिडल ऑर्डरमध्ये करियरची सुरुवात करणारा वॉटसन ओपनर म्हणून यशस्वी ठरला. 2009 च्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) पाकिस्तानविरुद्ध त्याने पहिली सेंच्युरी झळकावली. त्यानंतर पुढच्या वर्षी लक्ष्मण आणि ओझा यांच्या पार्टरनरशिपमुळे गाजलेल्या मोहाली टेस्टमध्ये वॉटसननं साडे सात तासांपेक्षा जास्त मैदानावर नांगर टाकून 126 रन काढले.

 वन-डे क्रिकेटमध्येही तो मैदान गाजवत होता. त्याच्या 9 वन-डे सेंच्युरीपैकी 6 सेंच्युरी या या तीन वर्षातील आहेत. 2009 आणि 11 साली त्याने 1000 पेक्षा जास्त रन्स काढले. त्याचबरोबर तो रिकी पॉन्टिंगचा विकेट टेकर बॉलर होता.

प्रचंड क्षमतेचा पण वादग्रस्त ऑल राऊंडर!

बांगलादेशला बदडले

शेन वॉटसन (Shane Watson Birthday) 2011 साली  इंग्लंड विरुद्ध मेलबर्व वन-डे मध्ये नाबाद 161 रनची खेळी करुन भारतामध्ये आला होता. 2011 च्या वर्ल्ड कपमध्येही (Cricket World Cup 2011) त्याची कामगिरी समाधानकारक होती. पण ती कामगिरी टीमला विजेतेपद मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही. त्याचा राग वॉटसननं बांग्लादेशविरुद्ध काढला.

वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसातच त्यानं ढाकामध्ये बांगालदेशविरुद्ध फक्त 96 बॉलमध्ये 15 सिक्स आणि 15 फोर बदडले. तो सचिन तेंडुलकरचा 200 रनचा विक्रम मागे टाकणार असे वाटत असताना टार्गेट पूर्ण झाल्याने 185 रनवर नाबाद राहिला.ऑस्ट्रेलियन बॅट्समनचा वन-डे क्रिकेटमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे. या खेळीला आता 10 वर्ष झाले आहेत. मात्र अजूनही वॉटसनचा रेकॉर्ड कायम आहे.

दुखापतीची उतरण

वॉटसनच्या करियरला नंतर दुखापतीचं ग्रहण लागलं. 2012 च्या T-20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचं विजयी अभियान वॉटसनच्या जीवावर सुरु होतं. पण फायनलमध्ये वॉटसनचं झटपट आऊट होणं कांगारुंना महाग पडलं. 2014 साली बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-20 स्पर्धेत त्याला एकाही मॅचमध्ये दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे जॉर्ज बेलीची टीम साखळी फेरीतच बाद झाली.

रिकी पॉन्टिंग रिटायर झाल्यानंतर वॉटसन ऑस्ट्रेलियन टीमचा व्हाईस कॅप्टन बनला. 2013 साली दिल्ली टेस्टमध्ये मायकल क्लार्क जखमी झाल्यानं त्याने टीमचं नेतृत्व केले. पण ती टेस्ट ऑस्ट्रेलियाने 3 दिवसांमध्ये गमावली. त्यानंतर काही दिवसांनीच होम वर्क पूर्ण न केल्याच्या कारणामुळे वॉटसनवर शिस्तभंगाची कारवाई झाली.

वॉटसनला शेन वॉर्ननंतर ख-या अर्थानं रिकी पॉन्टिंगनंच ओळखलं. त्याचा इगो जपला. त्याला फुलवलं. त्याचा फायदा टीमला झाला. मायकल क्लार्क – ऑथर जोडीच्या वर्क कल्चरमध्ये वॉटसन बसलाच नाही. त्याने टीम मॅनेजमेंट विरुद्ध बंड केले. क्लार्कवर टीका केली. ऑस्ट्रेलियाने ती सीरिज 4-0 ने गमावली. त्यावेळी वॉटसन टेस्ट खेळू शकत नाही यावर शिक्कामोर्तब झाले.

WTC Final 2021 : 3 भारतीय प्लेयर जे होऊ शकतात ‘मॅन ऑफ द मॅच’

शेन वॉटसनचं 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन टीममधलं स्थान पक्क नव्हतं. त्याला स्पर्धेदरम्यानही एकदा वगळण्यात आलं. पण त्या स्पर्धेतल्या सर्वात खतरनाक परीक्षेतून वॉटसननंच ऑस्ट्रेलियाला बाहेर काढलं. क्वार्टर फायनलमध्ये वहाब रियाझचा (Wahab Riaz)   तो खतरनाक स्पेल वॉटसननं यशस्वीपणे परतवला. त्यामुळेच मायदेशात ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन होता आलं. दुखापतीच्या चक्रामध्ये अडकलेल्या वॉटसननं 2015 साली टेस्ट आणि 2016 साली वन-डे आणि T20 क्रिकेटमधून रिटायर झाला.

आयपीएलमधील वॉटसन

शेन वॉटसनच्या (Shane Watson Birthday) करियरमध्ये आयपीएलचं मोठं स्थान आहे. 2008 च्या आयपीएलमुळेच (IPL 2008) त्याला ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्थिर जागा मिळाली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला. तो आयपीएलमधील मोठा विदेशी स्टार होता. ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा त्याने आयपीएल स्पर्धा मैदानातील कामगिरीमुळे गाजवली.

सुरुवातीच्या काळात तो राजस्थान रॉयल्सचा मुख्य आधारस्तंभ होता. त्याने 2014 साली टीमचं नेतृत्त्वही केले. त्यावेळी शेवटच्या लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सं राजस्थानचा पराभव केला होता. त्यामुळे राजस्थानला ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश मिळाला नाही.

ON THIS DAY: मुंबई इंडियन्सने राजस्थानला दाखवले ‘TARE’, शांत द्रविडही संतापला

राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर वॉटसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळला. गेल, कोहली, डीव्हिलियर्स या तगड्या बॅट्समननचा समावेश असलेल्या आरसीबीमध्ये त्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्यात आले. तिथं तो त्याच्या क्षमतेला न्याय देऊ शकला नाही. पण, 2016 च्या आयपीएलमध्ये वॉटसननं 20 विकेट्स घेतल्या होत्या.

CSK मध्ये संजीवनी

वॉटसनच्या आयपीएलमधील करियरला (Shane Watson Birthday) पुन्हा एकदा संजीवनी चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) मिळाली. धोनीनं (MS Dhoni) त्याच्यावर विश्वास दाखवला. त्याला पुन्हा एकदा ओपनिंगची जागा दिली. 2018 च्या आयपीएलमध्ये (IPL 2018) त्याने 555 रन काढत धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. त्याचबरोबर टीकाकारांची तोंडं बंद केली.

त्याच आयपीएल फायनलमध्ये (IPL 2018 Final) वॉटसननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अविस्मरणीय सेंच्युरी झळकावली. 179 रनचा पाठलाग करताना वॉटसनला पहिल्या 10 बॉलमध्ये एकही रन काढता आला नव्हता. त्यानंतर वॉटसननं त्याचा क्लास दाखवत पुढच्या 40 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. दोन वर्षांच्या बंदीनंतर परतलेल्या सीएसकेनं 2018 साली आयपीएलमध्ये विजेतेपद पटाकवले. त्या विजेतेपदामध्ये वॉटसन हा चेन्नईचा हिरो होता.

एकाच वर्षी 5 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन

 शेन वॉटसननं त्यानंतर वर्षभराने पुन्हा एकदा आयपीएल फायनलमध्ये एकट्याच्या बळावर सीएसकेसाठी विजेतेपद खेचून आणले होते. पायातून रक्त वाहत असतानाही वॉटसनची ती झुंजार हाफ सेंच्युरी त्याच्यी टीममबद्दच्या सर्वोच्च कमिटमेंटचं उदाहरण होती. वॉटसनचे (Shane Watson Birthday) प्रयत्न फक्त 1 रननं कमी पडले. त्यानंतर पुढील आयपीएलमध्ये (IPL 2019) वॉटसन फॉर्मात नसल्याचा मोठा फटका सीएसकेला बसला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: