फोटो – ट्विटर/ICC

क्रिकेट विश्वातील बेस्ट बॅट्समनपैकी एक असलेल्या स्टीव्ह स्मिथचा (Steve Smith) आज वाढदिवस (Steve Smith Birthday) आहे. आजच्या दिवशी (2 जून 1989) रोजी स्मिथचा जन्म झाला. गेल्या 5 वर्षांपासून नियमित क्रिकेट पाहणाऱ्यांना स्मिथनं लेग स्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केलं होतं, हे सांगितल्यावर आश्चर्य वाटेल. पुढचा शेन वॉर्न म्हणून पदार्पण केलेल्या स्मिथनं पुढचा डॉन ब्रॅडमन अशी ओळख निर्माण होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

तो ऑस्ट्रेलियाचा सर जडेजा होता…

स्टीव्ह स्मिथ आणि रविंद्र जडेजा या दोघांच्याही सुरुवातीच्या क्रिकेट करियरमध्ये समानता आहे. दोघेही अंडर 19 टीममधून मुख्य टीममध्ये आले. जडेजा शेन वॉर्नच्या (Shane Warne) कॅप्टनसीमध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळला. स्मिथला शेन वॉर्ननीच लेग स्पिनचे प्रशिक्षण दिले.

स्मिथ आणि जडेजा या दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी लवकर मिळाली. ते दोघेही सुरुवातीला लेग स्पिनर, चांगले फिल्डर आणि बरी बॅटींग करणारे खेळाडू होते. पण यापैकी नेमकं काय करायचं आहे, हे त्यांना नीट माहिती नव्हतं. ‘ESPN Cricinfo’ ने स्मिथचं सुरुवातीच्या काळातील वर्णन, ‘ऑर्केस्ट्रामधील असा सदस्य ज्याला नेमकं काय वाजवायचं आहे, हे माहिती नाही,’ असं केलं आहे. दोघांचीही सोशल मीडियावर सुरुवातीच्या काळात बरीच ट्रोलिंग झाली. जडेजाचं ‘सर जडेजा’ हे नाव करण्यात महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) हातभार होता. तर ‘स्मिथसाठी गर्लफ्रेंड शोधण्यात मला मदत करा’ असं आवाहन मायकल क्लार्कने (Michael Clarke) 2011 साली सोशल मीडियावरुन केले होते.

गर्लफ्रेंड मिळाली आणि खेळही सुधारला

मायकल क्लार्कनं आवाहन केल्यानंतर काही महिन्यात स्मिथला गर्ल फ्रेंड मिळाली. क्रिकेट खेळण्यासाठी वयाच्या 17 व्या वर्षीच शिक्षण सोडून दिलेल्या स्मिथनं (Steve Smith Birthday) डॅनिएल विलिस (Danielle (Dani) Willis) या लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीशी टेटिंग सुरु झाले. पुढे काही वर्षांनी दोघांनी लग्न केले.

स्मिथला त्या काळात कायद्याचं शिक्षण घेण्यात रस होता. तो त्यामधील काही प्रश्न डॅनिएलला विचारत असे. स्मिथ कायद्याचं किती शिकला हे माहिती नाही, पण डॅनियलनं स्मिथचं क्रिकेट गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली. जोडीदार आपल्या प्रोफेशनमध्ये रस घेणारा त्यात खंबीर साथ देणारा असेल तर फायदा होतो. स्मिथचाही तो फायदा झाला.

स्मिथ 2011 ते 2013 या काळात ऑस्ट्रेलियन टेस्ट टीममध्ये नव्हता. त्यापूर्वी त्याने काही लक्षवेधी खेळी केल्या होत्या, पण त्याचा स्मिथला टेस्ट टीममधील जागा टिकवण्यास मदत झाली नाही. दोन वर्ष टीममधून ड्रॉप झाल्याच्या काळात त्याने बॅटींगवर मेहनत घेतली. त्याच्या या मेहनतीला डॅनियलनं साथ दिली. स्मिथ बॉलिंग मशिनवर तासन्-तास प्रॅक्टीस करताना ती त्या सेशनला नियमित उपस्थित असे.

2013 साली मोहाली टेस्टपूर्वी चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई झाली आणि स्मिथला पुन्हा टेस्ट टीममध्ये संधी मिळाली. स्मिथनं मोहालीत 92 रन केले. त्या खेळीनंतर एक बॅट्समन म्हणून त्याने मागे वळून पाहिले नाही.

पहिल्या बॉलपासून जिंकण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन

स्मिथचा धडाका सुरु

स्मिथनं (Steve Smith Birthday) त्याच वर्षी (2013) साली इंग्लंड विरुद्ध ओव्हलमध्ये पहिली सेंच्युरी झळकावली. जोनाथन ट्रॉटला सिक्स मारत त्यानं ती सेंच्युरी पूर्ण केली होती. स्मिथच्या सातत्यपूर्ण खेळामुळे तो लवकरच ऑस्ट्रेलियाचा व्हाईस कॅप्टन बनला. टीम इंडिया 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी मायकल क्लार्कची पाठदुखी बळावल्यानं त्यानं पहिल्या टेस्टनंतर माघार घेतली. स्मिथनं त्या सीरिजमधील चारही टेस्टमध्ये भारताविरुद्ध सेंच्युरी झळकावली. यापैकी तीन सेंच्युरी त्यानं कॅप्टन म्हणून झळकावल्या होत्या. स्मिथनं त्या सीरिजमध्ये 128.16 च्या सरासरीनं 769 रन काढले.

स्मिथचा हा धडका 2015 मध्येही सुरु होता. त्याने त्यावर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 402 रन काढत वर्ल्ड कप विजेतेपदात मोलाचे योगदान दिले. 2015 च्या वर्ल्ड कपनंतर मायकल क्लार्क रिटायर झाला आणि स्मिथ पूर्णवेळ कॅप्टन बनला.

कॅप्टन स्मिथ

स्मिथ 2015 पूर्णवेळ कॅप्टन म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यावर सर्वात प्रथम गेला. किंग्स्टन ओव्हलवर त्याची पहिली डबल सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. पुढे महिनाभरातच त्याने (Steve Smith Birthday) पहिली डबल सेंच्युरी झळकावण्यासाठी लॉर्ड्सचे मैदान निवडले. लॉर्ड्सवर 77 वर्षांनी आणि इंग्लंडमध्ये 1993 नंतर डबल सेंच्युरी करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन बनला. इंग्लंडमध्ये 2015 साली झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये त्याने 500 पेक्षा जास्त रन केले. त्यावर्षी (2015) ऑस्ट्रेलियाचा वन-डे प्लेयर ऑफ द इयर आणि टेस्ट प्लेयर ऑफ द इयर हे दोन्ही पुरस्कार स्मिथनं पटकावले.

स्मिथ आणि वाद…

स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्क या त्याच्या आधीच्या कॅप्टनप्रमाणे स्मिथही वादापासून फार दूर राहू शकला नाही. 2017 साली ऑस्ट्रेलियन टीम भारतामध्ये आली. त्यावेळी पुण्यात झालेली पहिली टेस्ट 333 रनने जिंकून ऑस्ट्रेलियाने सुरुवात चांगली केली होती. नंतर टीम इंडियाने कमबॅक करत सीरिज 2-1 ने जिंकली.

त्या सीरिजमध्ये DRS घ्यायचा की नाही, यासाठी त्याने ड्रेसिंग रुममध्ये विचारणा केली. या प्रसंगाचे स्मिथने नंतर ‘brainfade moment’ असे वर्णन केले. पण, विराट कोहलीनं (Virat Kohli) स्मिथवर टीका केली होती. त्या सीरिजमध्ये नंतर चीटर म्हणून ओळखला गेला. अर्थात या घटनेचा स्मिथच्या बॅटींगवर काही परिणाम झाला नाही. त्याने संपूर्ण सीरिजमध्ये 3 सेंच्युरीसह सर्वात जास्त 499 रन काढले.

बॉल टेम्परिंग प्रकरण

स्मिथनं भारत दौऱ्यात मिळालेला ‘चीटर टॅग’ वर्षभराच्या आत आणखी ठळक केला. 2018 साली केपटाऊनमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये स्मिथच्या संमतीने (Steve Smith Birthday) ऑस्ट्रेलियन टीमनं बॉल टेम्परिंगचा प्रकार केला. खेळ भावनेला गंभीर धक्का देणाऱ्या या कृतीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाची बदनामी झाली.

Live मॅचमध्ये केली होती गडबड, जुन्या प्रकरणात अडकणार ऑस्ट्रेलियन दिग्गज?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्मिथवर एक वर्षांची बंदी घातली. तर त्याला पुन्हा कॅप्टन होण्यासाठी 2 वर्ष वाट पाहावी लागेल, असा आदेश दिला. या बंदीनंतर स्मिथ ऑस्ट्रेलियात येऊन पत्रकार परिषदेमध्ये चूक मान्य केल्याचं सांगत रडला.

स्मिथचे हे रडणे किती प्रामाणिक होते हा प्रश्न टीम इंडियाच्या नुकत्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया  दौऱ्यात निर्माण झाला आहे. त्याने या दौऱ्यातील सिडनी टेस्टमध्ये ऋषभ पंत बॅटींग करत असताना बुटाने पिच खराब करण्याचा प्रयत्न केला होता.

पुन्हा कॅप्टन होण्यासाठी सज्ज

स्टीव्ह स्मिथने (Steve Smith Birthday) बंदीनंतर 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019)  केले. ऑस्ट्रेलियाला पुन्हा वर्ल्ड कप राखण्यात अपयश आले. त्यानंतर झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये स्मिथने 110.57 च्या सरासरीने 774 रन केले. स्मिथ दुखापतीमुळे एक टेस्ट कमी खेळला होता. अन्यथा एका सीरिजमध्ये 1000 रन पूर्ण करण्याचा विक्रम त्याने सहज पूर्ण केला असता, इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये तो होता. स्मिथच्या या जोरदार प्रयत्नामुळे ती सीरिज 2-2 अशी बरोबरीत सुटली असली तरी ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस स्वत:कडे राखण्यात यश मिळवले.

स्मिथला इंग्लंडमधील खेळाची पुनरावृत्ती भारताविरुद्ध मायदेशात करता आली नाही. अश्विनने त्याला वारंवार चकवले. दुखापतग्रस्त टीम इंडियाने स्मिथ-वॉर्नरसह खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन सीरिज जिंकली.

अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची नोंद

भारताविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम पेनला काढून स्मिथला पुन्हा टीमचा कॅप्टन करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याला व्हाईस कॅप्टन करत पॅट कमिन्सला कॅप्टन केलं. स्मिथनं ही नवी जबाबदारी देखील चांगली पार पाडतोय. अ‍ॅशेस सीरिज आणि पाकिस्तान दौऱ्यात त्यानं समाधानकारक रन केले पण मोठा स्कोअर केला नाही. आता या वर्षात स्मिथकडून मोठ्या खेळीची त्याच्या फॅन्सना अपेक्षा (Steve Smith Birthday) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: