फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकरचा (Vijay Shankar) आज वाढदिवस. 26 जानेवारी 1991 रोजी विजयचा जन्म झाला. विजयच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण आहे. त्याचे वडिल आणि मोठा भाऊ दोघेही तामिळनाडूतील कनिष्ठ दर्जाचे क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे एका खेळाडूची मानसिकता ते जाणतात. त्यांनी विजयला घराच्या गच्चीवरच सरावासाठी नेट तयार करुन दिले आहे. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत विजय ऑफ स्पिन बॉलिंग करत असे. पण, दिग्गज स्पिनर्सचा समावेश असलेल्या तामिळनाडू (Tamil Nadu) टीममध्ये या कौशल्याच्या जोरावर स्थान मिळणे अवघड आहे असे लक्षात येताच तो मध्यमगती बॉलर बनला.

तामिळनाडूच्या टीममध्ये विजयवर मीडल ऑर्डर बॅट्समन आणि मध्यमगती गोलंदाज अशी दुहेरी जबाबदारी आहे. 2014-15 च्या रणजी ट्रॉफीमध्ये विजयनं विदर्भ आणि महाराष्ट्राविरुद्धच्या बाद फेरीतील मॅचमध्ये ऑल राऊंड खेळाची छाप पाडली. पुढील तीन वर्ष तामिळनाडूसाठी देशांतर्गत स्पर्धेत विजयनं उपयुक्त योगदान दिलं. त्यामुळे 2017 च्या श्रीलंका सीरिजमध्ये जखमी भुवनेश्वर कुमारच्या जागी विजयी टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये निवड झाली. मात्र त्याला त्या सीरिजमध्ये अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. पुढे मार्च 2018 मध्ये श्रीलंकेत झालेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत (Nidahas Trophy 2018) विजयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

( वाचा : ऑस्ट्रेलिया गाजवलेल्या टी. नटराजनचं गावात राजेशाही स्वागत, पाहा VIDEO )

फायनलची त्रासदायक आठवण

निदहास ट्रॉफीची फायनल विजयच्या क्रिकेट कारकीर्दीमधील एक त्रासदायक आठवण आहे. बांगलादेश विरुद्धच्या त्या मॅचमध्ये दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आधी विजय शंकरला बॅटिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्यावर वेगाने रन्स करण्याची जबाबदारी होती. तो दिवस विजयचा नव्हता. विजय फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनासासारखं काहीच होत नव्हतं. तो कोषात गेला. विजय कोषात गेल्यानं रनरेट वाढवण्याच्या नादात मनिष पांडे (Manish Pandey) आऊट झाला. अखेर दिनेश कार्तिकनं 8 बॉल्समध्ये नाबाद 29 रन्सची अविस्मरणीय खेळी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून दिले. या मॅचनंतर हाताश मानसिकतेमधून विजयला बाहेर काढण्याचं काम दिनेश कार्तिकनं केलं.

( वाचा : दिनेश कार्तिकच्या करियरमधील चढ-उताराची गोष्ट! )

विजयचं पुनरागमन

संवेदनशील स्वभावाच्या विजयसाठी निदहास ट्रॉफीची फायनल मोठा धक्का होता. त्याने सर्व प्रकारचे ट्रोलिंग पचवले. विजयच्या सुदैवानं त्याच्या सभोवतालची माणसं चांगली आहेत. त्यामुळे तो यामधून बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019 साली झालेल्या नागपूर वन-डेमध्ये विजयला स्वत:ला सिद्ध करण्याची दुसरी संधी मिळाली.

विजयनं सुरुवातीला बॅटिंग करताना 41 बॉल्समध्ये 46 रन्स काढले. या खेळीत त्याने लगावलेल्या एका सिक्सरने कॅप्टन विराट कोहली देखील प्रभावित झाला होता. मात्र विजयची खरी परीक्षा बॉलिंगमध्ये होती. शेवटच्या ओव्हर्समध्ये रंगात आलेल्या मार्कस स्टॉईनिससमोर 10 रन्स वाचवण्याची जबाबदारी कोहलीनं विजयवर सोपवली. विजयनं पहिल्याच बॉलवर धोकादायक स्टॉईनिसला आऊट केलं. त्यानंतर दोन बॉलच्या अंतरानं एडम झम्पाला आऊट करत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वर्ल्ड कप टीममध्ये निवड

विजयची अंबती रायुडूच्या (Ambati Rayudu) ऐवजी 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी (ICC Cricket World Cup 2019) निवड झाली. त्याच्या निवडीनं दुखावलेल्या रायुडूनं वादग्रस्त ट्विट करत जाहीर नाराजी व्यक्त केली. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धची मॅच (IND vs PAK) सुरु असताना भुवनेश्वर कुमार जायबंदी झाला. त्यामुळे विजयला त्याचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरावं लागलं. विजयनं पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्या बॉलवर विकेट घेणारा विजय हा तिसरा बॉलर बनला. पुढे विजयला दुखापतीमुळे वर्ल्ड कप अर्धवट सोडून घरी परतावं लागलं.

( वाचा : Yo, Yo 2.0? टीम इंडियाकडून खेळण्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ रनिंग टेस्ट! )

विजय क्रिकेट कारकीर्दीला दुखापतीचं ग्रहण आहे. या दुखापतीमुळेच तो वर्ल्ड कपनंतर बहुतेक काळ क्रिकेटपासून दूर आहे. टीम इंडियातील जागाही त्याने गमावलीय. 2020 ची आयपीएल स्पर्धाही त्याला दुखापतीमुळे पूर्ण खेळता आली नाही.

विजय शंकरच्या कारकीर्दीला लागलेलं हे दुखापतीचं ग्रहण कायमचं दूर व्हावं आणि हा ‘ऑलराऊंडर इन वेटींग’ असलेला विजय शंकर लवकर ‘ऑलराऊंडर इन अ‍ॅक्शन’ दिसावा याच विजयला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: