
श्रीलंकेच्या (Sri Lanka) फास्ट बॉलिंगची धूरा एक दशकांहून अधिक काळ वाहणाऱ्या चामिंडा वासचा (Chaminda Vaas Birthday) आज वाढदिवस. आजच्या दिवशी (जन्म 27 जानेवारी 1974) या दिवशी चामिंडाचा जन्म झाला. झाला. ‘वर्णाकुलासुरिया पटाबेडिंगे उशान्ता जोसेफ चामिंडा वास’ असे त्याचे पूर्ण नाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठे नाव असलेला खेळाडू असा विक्रमही त्याच्या नावावर आहे. लांब नाव असलेल्या चामिंडाची क्रिकेट कारकीर्द देखील लांब आणि अनेक विक्रमांनी भरली आहे.
रोमन कॅथलिक परिवारात जन्मलेल्या चामिंडाला लहानपणी ख्रिस्ती पाद्री व्हायचे होते. मोठ्या भावाचं बघून तो क्रिकेटकडे वळला आणि फास्ट बॉलर झाला. 1994 साली भारताविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये तर त्याच वर्षी पाकिस्तानविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. श्रीलंकेला न्यूझीलंड विरुद्ध ऐतिहासिक असा पहिला टेस्ट विजय मिळवून देण्यात चामिंडाचा मोठा वाटा होता. त्या मॅचमध्ये त्याने दहा विकेट्स घेत ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला.
छोट्या शहरातील हिरोने केले देशाचे मोठे स्वप्न पूर्ण!
पाद्री होण्याची होती इच्छा
अर्जुन रणतुंगाच्या (Arjuna Rantunga) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या क्रिकेट टीमनं श्रीलंकन क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या टीममध्ये अनेक चॅम्पियन खेळाडू होते. या चॅम्पियन टीमचा चामिंडा हा महत्वाचा सदस्य होता. 1996 साली श्रीलंकेनं वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप विजेत्या टीमचा चामिंडा सदस्य होता. पुढे स्पिन बॉलिंगचा जादूगर मुरलीधरनसोबत (Muralitharan) चामिंडाची जोडी जमली. या दोघांनी श्रीलंकेला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.
दुखापतीचे ग्रहण, जिद्दीने पुनरागमन
चामिंडा वास सुरुवातीला 140 पेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करत असे. क्रिकेट करियर ऐन भरात असताना त्याला पाठदुखीनं घेरलं. ऑपरेशननंतर करियर संपतं की काय? असा प्रश्न निर्माण झाला. चामिंडानं हार मानली नाही. त्याने जिद्दीनं पुनरागमन केलं. त्याचा बॉलिंगचा वेग कमी झाला होता पण अचूकता आणखी वाढली होती. इनस्विंग आणि ऑफ कटर च्या जोडीनं ‘रिव्हर्स स्विंग’ चं कौशल्य चामिंडानं विकसित केलं. तो पुर्वीपेक्षा अधिक घातक बनला.
चामिंडा वासचे रेकॉर्ड्स
टेस्ट करियरमध्ये चामिंडानं 355 विकेट्स घेतल्या. तो आजवरचा श्रीलंकेचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर आहे. वन-डे करियरमध्येही चामिंडाच्या नावावर 400 विकेट्स आहेत. ही कामगिरी करणारा तो मुरलीधरननंतरचा दुसरा श्रीलंकन बॉलर आहे. झिम्बाब्वे विरुद्ध 2001 साली झालेल्या वन-डे मॅचमध्ये चामिंडानं 19 रन्स देत 8 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. वन-डे क्रिकेटमध्ये एकाच इनिंगमध्ये आठ विकेट्स घेणारा चामिंडा हा एकमेव बॉलर आहे.
चामिंडा वासने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पहिल्या ओव्हरच्या पहिल्या तीन बॉलवर विकेट्स घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या तीन बॉलवर हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव बॉलर आहे. चामिंडाने वन-डे क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केलाय.
वाढदिवस स्पेशल : वटवृक्षाची सावली आधारवड होते तेंव्हा…
बॉलिंगप्रमाणे बॅटिंगमध्येही चामिंडाने उपयुक्त योगदान दिले. त्याने टेस्ट करियरमध्ये 13 हाफ सेंच्युरी आणि एक सेंच्युरी झळकावली. बांगलादेशविरुद्ध काढलेले नाबाद 100 रन्स ही त्याची टेस्टमधील सर्वोच्च धावसंख्या. 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल श्रीलंका सरकारने त्याचा (Chaminda Vaas Birthday) ‘देशबंधू’ हा तिसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.