फोटो – BCCI/IPL

T20 क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त पॉवर गेमची गरज नाही. क्रिकेटचे बेसिक घट्ट असेल तरी उत्तम स्ट्राईक रेटनं रन्स काढता येतात आणि टीमला मॅच जिंकून देता येते. आयपीएल सारख्या जगभरातील सर्वात मोठ्या T20 लीगमधील एका सिझनमध्ये सर्वात जास्त रन काढता येतात. टीमच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान देता येते हे दाखवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad Birthday) आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी ( 31 जानेवारी 1997) रोजी त्याचा जन्म झाला.

पुण्यात शिकला क्रिकेट!

ऋतुराज गायकवाड पुण्याचा. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला क्रिकेटची देखील परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रणजी टीमचं पुणे (Pune) मुख्यालय आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा (Maharashtra) विचार केला तर मुंबईनंतर पुणे हे दुसऱ्या क्रमांकाचं क्रिकेट केंद्र. याच पुण्यात ऋतुराजनं क्रिकेटचं बेसिक घट्ट केलं. वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजे 2016-17 मध्येच ऋतुराजची महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली.

ओपनिंग किंवा नंबर 3 वर खेळू शकणाऱ्या ऋतुराजनं लवकरच स्वत:ला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सिद्ध केलं.त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्स (CSK) या आयपीएल टीमनं त्याला करारबद्ध केले.

यारों का यार, IPL सुपरस्टार, तीन्ही प्रकारात योगदान देणारा कॅप्टनचा आधार

2020 चा आयपीएल सिझन ऋतुराजला फक्त क्रिकेटर म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणूनही खूप काही शिकवून गेला. सीएसकेच्या सरावाच्या दरम्यान टीमचे मालक एन. श्रीनिवासन, कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) या दोघांनाही त्याने (Ruturaj Gaikwad Birthday) प्रभावित केले होते. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा सुरुवातीला लांबणीवर पडली आणि नंतर भारताच्या ऐवजी यूएईमध्ये झाली.

ऋतुराज यूएईमध्ये दाखल होताच त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली. त्याची चाचणी दोनदा पॉझिटीव्ह आल्याने त्याला तब्बल 22 दिवस सर्व सहकाऱ्यांपासून, क्रिकेटपासून दूर राहावे लागले. कोरोना व्हायरसमधून बरा झाल्यानंतर दोनच दिवसांनी त्याला अंबती रायडू (Ambati Rayudu) जखमी झाल्याने सीएसकेकडून मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरावे लागले.

खराब सुरुवात

ऋतुराजला सीएसकेनं पहिल्या मॅचमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळवलं. तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला. दुसऱ्या मॅचमध्येही त्याने फक्त 5 रन केले. त्यामुळे त्याला अंतिम 11 मधून वगळण्यात आलं. सीएसकेसाठी 2020 चे आयपीएल निराशाजनक ठरले. सततच्या पराभवामुळे अखेर सीएसकेने शेवटच्या मॅचमध्ये तरुण खेळाडूंना संधी देण्याचे ठरवले. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये ऋतुराज त्याच्या नेहमीच्या जागेवर म्हणजेच ओपनिंगला आला. तिसऱ्या इनिंगमध्येही तो अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने त्याला शून्यावरच माघारी धाडलं. ऋतुराजचं 2020 च्या आयपीएलमधील (Ruturaj Gaikwad Birthday) ते शेवटचं अपयश होतं.

रिटायरमेंटच्या दिवशी धोनीसोबत असलेल्या सहकाऱ्यानं सांगितला 10 महिन्यांपूर्वीचा अनुभव

झोकात कमबॅक

त्यानंतरच्या तीन मॅचमध्ये त्याने अनुक्रमे 65, 72 आणि 62 असे रन्स काढले. टार्गेटचा पाठलाग करताना ऋतुराजनं या तिन्ही हाफ सेंच्युरी झळकावल्या. या तिन्ही मॅचमध्ये सीएसकेनं विजय मिळवला. तीनपैकी दोनदा नाबाद राहत आपल्यामध्ये इनिंगची यशस्वी सांगता करण्याची क्षमता असल्याचं ऋतुराजनं दाखवून दिलं.

ऋतुराजच्या या खेळीनं अनेक क्रिकेटपटूंना प्रभावित केले आहे. ‘त्याची बॅटिंग पाहण्यास आनंद होतो’, अशी भावना सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलीय. शेन वॉटसनला (Shane Watson) तो ‘यंग सुपरस्टार’ वाटला तर ऋतुराजचा प्रेशर गेममधील खेळ पाहून फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) तरुण विराट कोहलीची आठवण झाली!

IPL 2020 मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानंतर टीममधील तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्याची तक्रार कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं केली होती. ऋतुराजनं त्याची ही तक्रार (Ruturaj Gaikwad Birthday) लागोपाठ तीन चांगल्या इनिंग करत दूर केली.  

2021 Dream Year

सीएसकेला 2020 मध्ये पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात अपयश आलं. त्यांनंतर त्यानी IPL 2021 मध्ये पुन्हा एकदा नेहमीच्या थाटात खेळ करत थेट विजेतेपद पटकावले. या विजतेपदामध्ये ऋतुराजचे मोलाचे योगदान होते. ऋतुराजनं 16 मॅचमध्ये 45. 35 च्या सरासरीनं 635 रन केले. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरीचा समावेश होता.

ऋतुराजनं 136.26 च्या स्ट्राईक रेटनं हे रन केले. फाफ ड्यू प्लेलिसबरोबर त्याची जोडी चांगली जमली. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत सीएसकेच्या विजयाचा पाया रचण्याचं काम केलं. 6 ओव्हर्सचा पॉवर प्ले संपल्यानंतर फिल्डर पांगतात त्यावेळी देखील आपण तितक्यात सहज पद्धतीने रन करू शकतो. हे ऋतुराजने दाखवून दिले. त्यामुळेच त्याने मागील आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅप पटकावली. आगामी आयपीएल सिझनमध्येही सीएसकेनं ऋतुराजला (Ruturaj Gaikwad Birthday) त्याच्यातील अफाट क्षमतेवर विश्वास दाखवत रिटेन केले आहे.

8 टीम कुणाला रिटेन करणार हे ठरलं! बड्या नावांसह तरुण खेळाडूंनाही संधी

IPL नंतर धडाका

ऋतुराज गायकवाडसाठी 2021 हे ड्रीम इयर ठरले. त्याच्या खेळातील धडाका हा आयपीएलनंतरही कायम होता. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील (SMT) 5 मॅचमध्ये 51.80 च्या सरासरीनं 259 रन केले. त्यानंतर झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत (vijay Hazare Trophy 2021) ऋतुराजने कमाल केली. त्याने फक्त 5 मॅचमध्ये तब्बल 150. 75 च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 603 रन केले. 5 पैकी 4 मॅचमध्ये त्यानं सेंच्युरी झळकाली. या सातत्यपूर्ण खेळामुळे त्याच्या नावासमोर फुली मारण्याचा निवड समितीकडील पर्याय ऋतुराजनं बंद केला.

टीम इंडिया भावी सुपरस्टार

नव्या सीएसकेमध्ये मराठमोळ्या ऋतुराजला महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर त्याचा खेळ आणि फॉर्म टीम इंडियासाठी देखील महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेतील वन-डे सीरिजध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या लिमिटेड ओव्हर क्रिकेटवर प्रश्न उपस्थित झाला आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला भविष्यातील टीम बांधणी सुरू करताना ऋतुराजला वगळणे अशक्य आहे.

कॅप्टन रोहित शर्माचं पुनरागमन, 3 नव्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश

ऋतुराज आता 25 वर्षाचा आहे. क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आत्ताच त्याला टीम इंडियात संधी मिळणे आवश्यक आहे. ती संधी मिळाली तर त्याच्यासाठी आणि टीम इंडियासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’ बनलेल्या ऋतुराज गायकवाडमध्ये टीम इंडियाचा सुपरस्टार (Ruturaj Gaikwad Birthday) होण्याची क्षमता आहे. त्याला त्यासाठी फक्त योग्य संधीची प्रतीक्षा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: