टीम इंडियाचा माजी कॅप्टन महंमद अझहरुद्दीनचा आज वाढदिवस (Mohammad Azharuddin Birthday) आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारी 1963 रोजी अझरचा जन्म झाला. तो आला तेंव्हा त्याच्या कलात्मक बॅटिंगनं संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्याची भुरळ पडली. तो सौरव गांगुलीपूर्वी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन होता. त्यानं तीन वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं. त्याच्या करियरचा शेवट मात्र मॅच फिक्सिंगच्या आरोपाने झाला. अझर आता सर्व आरोपातून मुक्त झालाय. BCCI च्या वर्तुळातही त्याचं पुनरागमन झालंय.

वादळी प्रवेश

अझरचा (Mohammad Azharuddin) भारतीय टीममधला प्रवेश वादळी झाला. इंग्लंडची टीम 1984 साली भारतामध्ये पाच टेस्टची सीरिज खेळण्यासाठी आली होती. या सीरिजमधल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला होता. कपिल देव (Kapil Dev) आणि संदीप पाटील (Sandip Patil) यांच्यावर खराब शॉट खेळून मॅचच्या पराभवाला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे या दोघांनाही टीममधून वगळण्यात आलं आणि अझरला कोलकाता टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

जेंव्हा जडेजानं केली होती पाकिस्तानची धुलाई! VIDEO )

अझरने या संधीचं सोनं केलं. त्याने कोलकाता टेस्टमध्ये तर सेंच्युरी केलीच. त्याचबरोबर मद्रास ( तेंव्हाचे नाव) आणि कानपूरमध्ये झालेल्या पुढील दोन टेस्टमध्येही सेंच्युरी झळकावत टेस्ट करियरमधील पहिल्या तीन टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावणारा पहिला बॅट्समन होण्याचा विक्रम केला. अझर संपूर्ण भरात असताना त्याची बॅटिंग पाहिलेला कोणताही व्यक्ती आयुष्यभर विसरु शकत नाही. अझरच्या बॅटींगमध्ये कलात्मकता होती. त्याच्या मनगटात जादू होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तो एका क्षणात मनगटाच्या साह्याने विरुद्ध दिशेला पिटाळत (Mohammad Azharuddin Birthday) असे.

अझरची टेस्ट क्रिकेटमधील आकडेवारी

टेस्ट99
रन्स6215
सरासरी45.03
सर्वोच्च199
100/5022/21

अझर नैसर्गिक आक्रमक बॅट्समन होता. त्याने 1988 साली न्यूझीलंड विरुद्ध बडोदा वन-डे मध्ये फक्त 62  बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली होती. जो तेंव्हाचा जागतिक क्रिकेटमधील रेकॉर्ड होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1996 साली झालेल्या कोलकाता टेस्टमध्ये (Kolkata Test) त्याने 74 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली होती.

तीन वर्ल्ड कपमध्ये कॅप्टनसी

अझरनं तीन वर्ल्ड कपमध्ये भारताची कॅप्टनसी केली. हा बहुमान मिळालेला तो एकमेव भारतीय कॅप्टन आहे. गुणवत्ता, यश, पैसा, प्रसिद्धी, कॅप्टनसी हे सर्व अझरकडं होतं. खेळाच्या जोरावर त्याने भारतासह सर्व जगभर आदर कमावला होता. तो चपळ फिल्डर होता. शर्टची कॉलर वर करुन खेळणाऱ्या अझरच्या स्टाईलची संपूर्ण देशात मोठ्या भक्तीभावाने कॉपी करत. पण…

अझरची वन-डे क्रिकेटमधील आकडेवारी. (* ही खूण नाबाद असल्याचे दाखवते.)

वन-डे334
रन्स9378
सरासरी36.92
सर्वोच्च153*
100/507/58

मॅच फिक्सिंगचा डाग

हा पण… अझरच्या करियरला लागलेला सर्वात मोठा डाग (Mohammad Azharuddin Birthday) आहे. भारतीय क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव आले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने देखील अझरवर ठपका ठेवला होता. मॅच फिक्सिंग प्रकरणात सापडलेला दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत कॅप्टन हॅन्सी क्रोनिएने त्याच्या कबुली जबाबात अझरचे नाव घेतले. ‘तहलका’ ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अझरचे नाव समोर आले. बीसीसीआयने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चंद्रचूड समितीने अझरवर आजीवन बंदीची शिफारस केली. बीसीसीआयने ही शिफारस मान्य करत अझरवर आजीवन बंदी घातली.

IPL 2020 मध्ये फिक्सिंग?, डॉक्टर असल्याचं भासवणाऱ्या नर्सनं साधला भारतीय खेळाडूशी संपर्क

अझरने या बंदीला आव्हान दिले. अनेक वर्ष लांबलेल्या खटल्यात अखेर अझरची सुटका झाली तो दोषमुक्त झाला. बीसीसीआयच्या वर्तुळात त्याचे पुनरागमन झाले. तो आता हैदराबाद क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे. अझर अध्यक्ष असलेल्या ‘हैदराबाद क्रिकेट बोर्डात भ्रष्टाचार सुरु आहे’ असा आरोप टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडूनं (Ambati Rayudu) केला होता.

1990 च्या दशकात क्रिकेट पाहणे सुरू करणाऱ्या अनेकांना अझर हा आवडता खेळाडू होता. सचिननंतर त्याच्या फॅनची संख्या जास्त होती. तो टीम इंडियाचा बराच काळ कॅप्टन होता. भारतीय क्रिकेटमध्ये अधिकार, फॅन्सचं प्रेम हे सर्व त्याला मिळालं. पण, फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्यानं ‘मी मुस्लीम आहे म्हणून मला टार्गेट केले जात आहे,’ असे धार्मिक कार्ड खेळले. फिक्सिंग प्रकरणात कोर्टानं त्याची सुटका केली. पण, त्यानं खेळलेल्या धार्मिक कार्डामुळे अझर (Mohammad Azharuddin Birthday) त्याच्यावर प्रेम केलेल्या अनेक फॅन्सच्या मनातून कायमचा उतरला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: