
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सर्वात यशस्वी कॅप्टन ग्रॅमी स्मिथचा आज वाढदिवस (Graeme Smith Birthday) आहे. आजच्याच दिवशी (1 फेब्रुवारी 1981) रोजी स्मिथचा जन्म झाला. ज्या वयात क्रिकेटपटू राष्ट्रीय टीममध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपडत असतात त्या वयात म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन झाला होता.
अवघड काळात परीक्षा
स्मिथ कॅप्टन झाला तो काळ दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा कसोटीचा होता. हॅन्सी क्रोनिए (Hansie Cronje) प्रकरणामुळे त्यांचं क्रिकेट मुळापासून हादरलं होतं. 2003 च्या वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup 2003) अपयशाचा मोठा धक्का देशाने सहन केला होता. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला या सर्व गाळातून बाहेर पडण्यासाठी एका सक्षम नेत्याची गरज होती. टीममधील उपलब्ध पर्यायांवर बोर्डाचा विश्वास नव्हता. त्यांनी 22 वर्षाच्या स्मिथला कॅप्टनसीच्या घोड्यावर चढवलं.
वाढदिवस स्पेशल : मॅकग्राची उंची, ब्रेट ली चा वेग आणि अक्रमचा स्विंग! )
क्रिकेट विश्वात टीममधल्या चांगल्या खेळाडूला कॅप्टन करण्याची पद्धत आहे. सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा, विराट कोहली यांनी कॅप्टन म्हणून वेळोवेळी चांगल्या इनिंग खेळल्या आहेत. त्यांच्या या खेळीनंतर प्रत्येकवेळी त्यांच्यातील कॅप्टनपेक्षा बॅटरची चर्चा झाली किंवा होते. स्मिथचं तसं नव्हतं. तो खेळायचा तेंव्हा त्याच्या ‘कॅप्टन्स नॉक’चीच चर्चा होत असे.
स्मिथ 2003 साली कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच इंग्लंडच्या दौऱ्यावर (ENG vs SA) गेला होता. त्यावेळी त्याने एजबस्टन आणि लॉर्डस या दोन सलग टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकाली होती. त्याने लॉर्ड्सवर 259 रन्स काढले. परदेशी टीमच्या खेळाडूने लॉर्ड्सवर (Lords) केलेला तो सर्वोच्च स्कोअर आहे. डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांनी 1930 साली केलेला विक्रम स्मिथने मोडला (Graeme Smith Birthday) होता.
लॉर्ड्स टेस्टमध्ये परदेशी बॅट्समन्सचा सर्वोच्च स्कोअर
नाव | रन्स | देश | साल |
ग्रॅमी स्मिथ | 259 | दक्षिण आफ्रिका | 2003 |
डॉन ब्रॅडमन | 254 | ऑस्ट्रेलिया | 1930 |
वॉली हॅमंड | 240 | वेस्ट इंडिज | 1938 |
कॅप्टन म्हणून केलेल्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. 50 पेक्षा जास्त टेस्ट मॅचमध्ये विजय, इंग्लंडमध्ये सीरिज विजय, ऑस्ट्रेलियात 16 वर्षांनंतर टेस्ट सीरिज जिंकणारा पहिला परदेशी कॅप्टन, टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 टीम आणि 9 वर्ष एकही टेस्ट सीरिज न हरलेला कॅप्टन असे अनेक रेकॉर्ड स्मिथच्या नावावर आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वाधिक यशस्वी कॅप्टन
नाव | देश | कालावधी | कॅप्टन म्हणून एकूण टेस्ट | विजयी टेस्ट |
ग्रॅमी स्मिथ | दक्षिण आफ्रिका | 2003-14 | 109 | 53 |
रिकी पॉन्टिंग | ऑस्ट्रेलिया | 2004-10 | 77 | 48 |
स्टिव्ह वॉ | ऑस्ट्रेलिया | 1999-2004 | 57 | 41 |
टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंगला येऊन सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटरच्या यादीत स्मिथचा पहिला क्रमांक आहे. त्याची दक्षिण आफ्रिकेतील सरासरी 41. 52 असली तरी परदेशातील सरासरी ही 54.98 इतकी घसघशीत आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या इनिंगमध्ये खेळणे हे सर्वात आव्हानात्मक असते. स्मिथचा खेळ चौथ्या इनिंगमध्ये विशेष बहरत असे. अलिकडच्या काळात चौथ्या इनिंगमध्ये फक्त सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) त्याच्यापेक्षा जास्त रन्स केले आहेत. मात्र स्मिथची सरासरी सचिनपेक्षा 15 ने जास्त आहे! चौथ्या इनिंगमध्ये पाच किंवा जास्त सेंच्युरी झळकावणाऱ्या पाच बॅट्समनमध्ये स्मिथचा समावेश होतो. चौथ्या इनिंगमध्ये टार्गेटचा यशस्वी पाठलाग करताना 1000 पेक्षा जास्त रन्स करणारा स्मिथ (Graeme Smith Birthday) हा एकमेव बॅटर आहे.
चौथ्या इनिंगमध्ये टार्गेटचा पाठलाग करणारे यशस्वी बॅट्समन
नाव | इनिंग | रन्स | सरासरी | 100/50 |
ग्रॅमी स्मिथ | 22 | 1141 | 87.76 | 4/6 |
मॅथ्यू हेडन | 27 | 913 | 57.06 | 1/6 |
रिकी पॉन्टिंग | 24 | 911 | 82.81 | 3/4 |
स्मिथचा वन-डे मधील बॅट्समन म्हणून रेकॉर्ड टेस्ट इतका चांगला नव्हता पण टीमला गरज असताना त्याने अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2006 साली रेकॉर्डब्रेक टार्गेटचा पाठलाग करताना स्मिथने हर्षल गिब्जच्या मदतीने आफ्रिकेला झंझावती सुरुवात करुन दिली होती. दहा वर्षाच्या कॅप्टन्सची कालावधीत दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कप जिंकण्याचं आणि चोकर्स हा टॅग हटवण्याचं स्वप्न स्मिथला पूर्ण करता आलं नाही. स्मिथला (Graeme Smith Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताना ते एकमेव शल्य असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.