फोटो – सोशल मीडिया

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एका मॅचमध्ये पाच विकेट घेणारा पहिला भारतीय बॉलर असलेल्या भुवनेश्वर कुमारचा आज वाढदिवस (Bhuvneshwar Kumar Birthday) आहे. आजच्याच दिवशी (5 फेब्रुवारी 1990) रोजी भुवनेश्वरचा जन्म झाला. भारताच्या सर्वोत्तम स्विंग बॉलरमध्ये त्याचा समावेश होतो. अनेक फास्ट बॉलर्सप्रमाणे भुवनेश्वरला सतत दुखापतग्रस्त होण्याचा शाप आहे.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विक्रम!

क्रीडा उत्पादनं विशेषत: क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा SG बॉलच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर प्रदेशातील मीरत शहरात भुवनेश्वरचा जन्म झाला. बहिणीच्या आग्रहामुळे भुवनेश्वर क्रिकेटकडे वळला. सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट करणारा पहिला बॉलर बनण्याचा विक्रमही भुवनेश्वरच्या नावावर आहे. 2008 साली वयाच्या अठराव्या वर्षीच त्याने हा विक्रम केलाय. त्यानंतर चार वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर 2012 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टी20 आणि वन-डे मालिकेसाठी भुवनेश्वरची राष्ट्रीय टीममध्ये (Team India) पहिल्यांदा निवड झाली.

वाढदिवस स्पेशल: ‘वो तो है अलबेला, हजारों में अकेला’!

भुवनेश्वरनं ((Bhuvneshwar Kumar)) बंगळुरुमध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. पहिल्याच मॅचमध्ये त्याने टिच्चून बॉलिंग करत चार ओव्हर्समध्ये फक्त 9 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या. नासिर जमशेद, अहमद शेहजाद आणि उमर अकमल या तीन आघाडीच्या बॅट्समन्सना त्याने आऊट केले होते. भुवनेश्वरने वन-डे क्रिकेटमधील त्याच्या पहिल्याच बॉलवर मोहम्मद हाफीजला आऊट केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 साली चेन्नईत (Chennai) त्याने (Bhuvneshwar Kumar Birthday) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच टेस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीसोबत त्याने नवव्या विकेट्ससाठी 140 रन्सची पार्टनरशिप करत भारताच्या विजयात बॅटनं योगदान दिले.

भुवनेश्वरनं टीमसाठी नेहमीच बॉल आणि बॅटनं उपयुक्त योगदान दिले आहे. भारतीय टीम असो वा सनरायझर्स हैदराबाद फिट असलेला भुवनेश्वर दोन्ही टीमसाठी नेहमीच महत्त्वाचा बॉलर ठरला आहे. भारताला 2014 साली लॉर्ड्समध्ये टेस्ट मॅच जिंकून देण्यात भुवनेश्वरच्या ऑलराऊंड कामगिरीचा मोलाचा वाटा होता. लॉर्ड्सपूर्वी झालेल्या नॉटिंगहम टेस्टमध्ये त्याने मोहम्मद शमीसोबत शेवटच्या विकेट्ससाठी 111 रन्सची पार्टरनशिप केली होती. त्यानंतर बॉलिंगमध्ये पाच विकेट्स घेत इंग्लंडला मोठी आघाडी मिळवू दिली नाही.

दुसऱ्या इनिंगमध्ये स्टुअर्ट बिन्नीसोबत  91 रन्सची पार्टनरशिप करत टीम इंडियाचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. 2018 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सुरुवातीच्या टेस्टमध्ये भुवनेश्वरला धक्कादायक रित्या वगळण्यात आले होते. जोहन्सबर्ग टेस्टमध्ये त्याचा समावेश झाला. भुवनेश्वरने त्या ‘लो स्कोअरिंग’ टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 30 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 33 रन्स काढले. त्याचबरोबर चार विकेट्सही घेत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये देखील भुवनेश्वर कुमारची ((Bhuvneshwar Kumar)) कामगिरी चांगली झालेली आहे. तो आजवर पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन टीमकडून खेळलाय. त्यापैकी सनरायझर्समध्ये त्याचा खेळ विशेष बहरला. सनरायझर्स बॉलर्सची टीम म्हणून ओळखली जाते. त्यांच्या बॉलिंगचं नेतृत्व भुवनेश्वर करतो. 2016 साली सनरायझर्सला आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्यात त्याच्या बॉलिंगचा मोठा वाटा होता. 2016 आणि 17 मधील आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त विकेट्स भुवनेश्वरनेच (Bhuvneshwar Kumar Birthday) घेतल्या आहेत.

दुखापतीचे ग्रहण

भुवनेश्वरच्या क्रिकेट कारकीर्दीला दुखापतीचं ग्रहण आहे. सतत होणाऱ्या दुखापतींमुळे अनेक महत्वाचे सामने/ स्पर्धा तो खेळू शकलेला नाही. 2019 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुखपतीमुळेच त्याला मॅच अर्धवट सोडून द्यावी लागली होती. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे काही सामने खेळता आले नाहीत. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये फॉर्मातल्या शमीच्या ऐवजी अनुभवी भुवनेश्वरचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता, पण त्याला प्रभाव पाडता आला नाही.

वर्ल्ड कपनंतर बराच काळ तो दुखापतीमुळे बाहेर होता. आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) तो परतला पण पुन्हा एकदा त्याची दुखापत बळावल्याने त्याला आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. आयपीएलनंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही दुखापतीमुळे तो (Bhuvneshwar Kumar Birthday) सहभागी होऊ शकला नाही.

एक अध्याय संपला! डेव्हिड वॉर्नर आणि SRH नं घेतला एकमेकांचा निरोप

कारकिर्दीवर संकट

भुवनेश्वरला दुखापतीमुळे क्रिकेटमधून वारंवार ब्रेक घ्यावा लागला. त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर झाला आहे. इंग्लंडमधील वातावरण त्याच्या स्विंग बॉलिंगसाठी आदर्श आहे. तरीही त्याची टेस्ट सीरिजसाठी निवड झाली नाही. भारतीय फास्ट बॉलर्सनी गेल्या काही वर्षात टेस्ट क्रिकेट गाजवले आहे. बॉलर्सनी मिळवलेल्या यशात भुवनेश्वर कुठेच नाही. टेस्ट टीममधील स्पर्धेत तो खूप मागे पडला आहे.

भुवनेश्वर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्येही ‘आऊट ऑफ फॉर्म’ आहे. आयपीएल 2021, T20 वर्ल्ड कप आणि भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्येही तो फेल गेला. या दोन्ही स्पर्धेत त्याला काही मॅचनंतर प्लेईंग 11 मधून वगळण्यात आले. क्रिकेटमधील या प्रकारातीलही त्याची जागा सध्या धोक्यात (Bhuvneshwar Kumar Birthday) आली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: