दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) आक्रमक पण तितकाच वादग्रस्त बॅट्समन हर्षल गिब्जचा (Herschelle Gibbs) आज वाढदिवस. गिब्जचा आजच्याच दिवशी 23 फेब्रुवारी 1974 रोजी जन्म झाला होता. दक्षिण आफ्रिकेने 2006 साली रिकी पॉन्टिंगच्या (Ricky Ponting) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 434 रन्सचा यशस्वी पाठलाग करुन (SA vs AUS) वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आफ्रिकेच्या या ‘न भूतो’ अशा पराक्रमात गिब्जनं 175 रन्स काढत मोलाचे योगदान दिले होते. विशेष म्हणजे गिब्जने हे योगदान दारुच्या नशेत दिले होते. गिब्जनेच त्याच्या आत्मचरित्रात हा गौप्यस्फोट केला आहे.

कुणीही कधीही विसरणार नाही अशी मॅच!

क्रिकेटचा कोणताही फॅन 12 मार्च 2006 या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग ( Johannesburg) शहरातील वाँडर्स मैदानात झालेली वन-डे विसरु शकणार नाही. त्या काळात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिया टीमचा क्रिकेट विश्वात प्रचंड दबदबा होता. ग्रॅमी स्मिथच्या (Graeme Smith) नेतृत्वाखाली खेळणारी दक्षिण आफ्रिकाची टीमही सातत्याने चांगला खेळ करत होती. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच वन-डे ची सीरिज 2-2 ने बरोबरीत होती. आता पाचव्या आणि निर्णायक वन-डे साठी दोन्ही टीम आमने-सामने होत्या.

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमने पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांच्या लौकीकाला साजेसा खेळ केला. गिलख्रिस्टनं 55 तर कॅटिचनं 79 रन्स काढले. रिकी पॉन्टिगनं 105 बॉल्समध्ये 164 रन्सची खेळी केली. त्याला हसीनं 81 रन्स काढत उत्तम साथ दिली. या सर्वांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 50 ओव्हर्समध्ये 4 आऊट 434 रन्स काढले.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : ग्रॅमी स्मिथ ‘कॅप्टन्स नॉक’ चा राजा! )

आता पाचवी वन-डे आणि सीरिज जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 435 रन्स काढायचे होते. त्यापूर्वी कोणत्याही टीमने इतके मोठे टार्गेट यशस्वीपणे पूर्ण केले नव्हते. पण तो खास दिवस होता. हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) आणि कॅप्टन ग्रॅहम स्मिथच्या मनात वेगळचं होतं. स्मिथनं 55 बॉल्समध्ये 90 रन्स काढले. तर गिब्जने 111 बॉल्समध्ये 175 रन्स ठोकले. या खेळीत गिब्जनं 21 फोर आणि 7 सिक्सर लगावले. गिब्जच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेनं 435 रन्सचं विशाल आव्हान एक बॉल राखत पार केले.

‘दारुच्या हँगओव्हरमध्ये होतो’

ही ऐतिहासिक खेळी करताना आपण दारुच्या हँगओव्हरमध्ये होतो असा गौप्यस्फोट हर्षल गिब्जनेच (Herschelle Gibbs) त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. ‘To the point: The no holds-barred’ या आत्मचरित्रात त्याने ही कबुली दिलीय.

‘मी मॅचच्या पूर्वी रात्रभर पार्टी केली होती. मी रात्रभर दारु प्यायलो होतो. मॅच खेळतानाही त्याचा हँगओव्हर कायम होता’ असं गिब्जने त्याच्या आत्मचरित्रात म्हंटले आहे. ‘इतिहास घडवण्यासाठी नवं काही तरी करण्याची झिंग मनावर असावी लागते’ असं म्हणतात गिब्जनं तर शब्दश: झिंगून वन-डे क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवण्यासाठी सर्वात मोठं योगदान दिले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: