
जोश हेजलवुड (Josh Hazelwood) हे नावं सध्याची क्रिकेट पाहणारी भारताची पिढी सहजासहजी विसरणार नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडमध्ये 2020 साली झालेल्या टेस्ट मॅचमध्ये हेजलवूडची दाहकता टीम इंडियानं (Team India) अनुभवली आहे. हेजलवुडनं अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी एक खतरनाक स्पेल टाकला. त्यानं 5 ओव्हरमध्ये फक्त 8 रन्स देत टीम इंडियाची निम्मी टीम आऊट केली. भारताचा टेस्ट क्रिकेटमधील आजवरचा निचांकी 36 रन्सचा विक्रम नोंदवण्यात हेजलवूडची मोठी भूमिका होती. हेजलवूडचा आज वाढदिवस (Josh Hazelwood Birthday) आहे. त्याचा जन्म आजच्याच दिवशी (8 जानेवारी 1991) झाला.
( वाचा : IND vs AUS : अॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’! )
300 लोकसंख्येचं गाव
सिडनीच्या उत्तरेला अवघी 300 लोकसंख्या असलेलं बेंडमीर हे त्याचं जन्मगाव. गावातील मर्यादीत लोकसंख्येमुळे त्याच्या शाळेतही खूप कमी मुलं होती. त्यामुळे जोश आणि त्याचा मोठा भाऊ एरॉन यांना शाळेचं संपूर्ण मैदान क्रिकेट खेळण्यासाठी मिळत असे. शाळेच्या मैदानावरच जोशनं सुरुवातीला कित्येक दिवस क्रिकेटचा सराव केला.
जोशनं अगदी कमी वयात शालेय स्तरावरील क्रिकेटमध्ये छाप पाडली. भक्कम शरीरयष्टी आणि अचूक बॉलिंग असलेल्या जोशचा ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) हा आदर्श आहे. हेजलवुडनं अगदी लहानपणापासूनच त्याच्या पेक्षा मोठ्या मुलासोबत क्रिकेटचा सराव केला आहे. हा सराव त्याच्या फायद्याचा ठरला. त्यामुळे त्याला मोठ्या आव्हानांचा लहाणपणीच सामना करण्याची संधी मिळाली. हेजलवुडची ऑस्ट्रेलियातील सर्वात बलाढ्य अशा न्यू साऊथ वेल्सच्या (New South Wales) टीममध्ये वयाच्या सतराव्या वर्षीच निवड झाली. त्यापाठोपाठ अंडर 19 (U19) गटातील राष्ट्रीय टीमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे झाले. ऑस्ट्रेलियाकडून अंडर 19 वर्ल्ड कप खेळणारा तो तेव्हा लहान वयाचा मुलगा (Josh Hazelwood Birthday) होता.
Ashes Series: ऑस्ट्रेलियन दिग्गज, शेन वॉर्नला पुन्हा खोटं ठरवणार का?
लहान वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण
हेजलवूडला 2010 साली वयाच्या 19 व्या वर्षी वन-डे टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. 19 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो तिसराच ऑस्ट्रेलियन आहे. त्याला त्याच वर्षी भारत दौऱ्यावर जाणाऱ्या टेस्ट टीममध्येही त्याची निवड झाली होती. मात्र त्या दौऱ्यातून त्यानं दुखापतीमुळं माघार घेतली. त्यानंतर त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी पाच वर्षांची वाट पाहावी लागली. 2014 साली भारताविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) त्यानं आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच इनिंगमध्ये 68 रन्स देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या.
टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन
हेजलवुडनं अगदी कमी कालावधीमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये बस्तान बसवलं. भारताविरुद्धच्या ऐतिहासिक स्पेलसाठी तर तो नेहमी लक्षात राहील. त्याचबरोबर 2015 साली झालेल्या अॅशेस सीरिजमध्ये त्यानं 16 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 2017-18 च्या अॅशेस सीरिजमध्ये 21 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या 4-0 अशा विजयात मोलाची भूमिका (Josh Hazelwood Birthday) बजावली.
2018 साली केपटाऊनमध्ये झालेल्या टेस्टनंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी लादण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन टीममध्ये अचानक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यावर्षी युएईमध्ये झालेल्या दौऱ्यात हेजलवूडची टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याच वर्षी झालेल्या भारत दौऱ्यातून त्यानं दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्यानं व्हाईस कॅप्टनशिप गमावली. त्यानंतर 2019 चा वर्ल्ड कपही त्याला दुखापतीमुळं खेळता आला नव्हता.
टिपिकल ऑस्ट्रेलियन वृत्तीच्या खडूस रिकी पॉन्टिंगच्या 5 बेस्ट इनिंग!
मोठं स्वप्न केले पूर्ण
हेजलवूड शालेय स्तरावर भालाफेक या खेळात पारंगत होता. त्यानं या 12 व्या वर्षीच राज्यस्तरीय रेकॉर्ड केला होता. त्यानं भालाफेकीत करियर केलं असतं तर ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं असतं असं त्याचे शालेय कोच सांगतात. क्रिकेटमध्ये फास्ट बॉलिंग करताना हेजलवूडचे पडणारे यॉर्कर्स हे भालाफेकीपेक्षा कमी नाहीत हेच त्याचा सामना करणाऱ्या बॅट्समनचं मत असेल.
क्रिकेट विश्वात सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमच्या कपाटात मागच्या वर्षीपर्यंत T20 वर्ल्ड कप ट्रॉफी नव्हती. यूएईमध्ये ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड कपमध्ये उतरली, तेव्हा त्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात नव्हते. अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फारशी मॅच प्रॅक्टीस देखील नव्हती. हेजलवूड याला अपवाद होता. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच आयपीएल स्पर्धा (IPL 2021) खेळली होती. सीएसकेच्या विजेतेपदामध्ये त्याचे योगदान होते.
हेजलवूडला आयपीएल स्पर्धेत मिळालेल्या अनुभवाचा ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपमध्ये झाला. त्याने स्पर्धेत 11 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये तर त्याने कमाल केली. 4 ओव्हर्समध्ये फक्त 16 रन देत 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने फायनल मॅच आणि विजेतेपद जिंकण्यात हेजलवूडच्या या स्पेलचा मोठा वाटा आहे. छोट्या गावातून आलेल्या हेजलवूडने (Josh Hazelwood Birthday) ऑस्ट्रेलियन्स नागरिकांनी पाहिलेले मोठे स्वप्न पूर्ण होण्यात योगदान दिले आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.