फोटो – सोशल मीडिया

भरपूर गुणवत्ता, दमदार सुरुवात, दमदार सुरुवातीमधून मिळालेले अवास्तव मोठेपण आणि त्यानंतर स्पॉट फिक्सिंग, खराब फिल्डिंग, टीममध्ये दादागिरी यासारख्या क्रिकेटला काळीमा फासणाऱ्या घटनांमुळे चर्चेत राहणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची संख्या मोठी आहे. या पाकिस्तानी कल्चरचा ‘अस्सल चेहरा’ म्हणजे कमरान अकमल (Kamran Akmal). कमरानचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (13 जानेवारी 1982) रोजी कमरानचा जन्म (Kamran Akmal Birthday) झाला.

पाकिस्तानमध्ये अनेक खेळाडूंना लवकर संधी मिळते. कमरानलाही खूप लवकर संधी मिळाली. तो पंधराव्या वर्षीच पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय टीमकडून खेळला. 1997 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये तो पाकिस्तानच्या टीमचा भाग होता. हसन रझा आणि नंतर दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळणारा इम्रान ताहिर हे त्या टीमचे अन्य प्रमख सदस्य.

अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा!

ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टनं आक्रमक विकेट किपर – बॅट्समन हा प्रकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रुजवला. भारतीय उपखंडात या ट्रेंडची सुरुवात कमरानने केली. मोईन खान, रशिद लतीफ या दिग्गज विकेट किपरला बाजूला करुन तो टीममध्ये दाखल झाला. थोड्याच वेळात त्याने टीममध्ये स्थान घट्ट केले. 2005-06 या वर्षातील सहा महिन्यात त्याने चार टेस्ट आणि तीन वन-डे अशा सात सेंच्युरी (Kamran Akmal Birthday) झळकावल्या. टेस्टमधील चारपैकी तीन सेंच्युरी या भारताविरुद्ध होत्या.

कमरान अकमलची टेस्टमधील कामगिरी ( * ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते)

मॅच53
रन्स2648
सरासरी30.79
सर्वोच्च158*
100/506/12
कॅच/स्टंपिंग184/22

कमरानचा त्या काळात भारताविरुद्ध खेळ नेहमीच चांगला होत असे. मोहालीमध्ये 2005 साली झालेल्या टेस्टमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये कमरानने सेंच्युरी झळकावत पाकिस्तानचा पराभव टाळला. टेस्ट ड्रॉ केली. कराचीमध्ये 2006 साली झालेल्या टेस्टमध्ये 6 आऊट 39 अशी नाजूक अवस्था असताना कमरानने सेंच्युरी झळकावत टीमला संकटातून बाहेर काढलं होते. पाकिस्तानने पुढे ती टेस्ट जिंकली. कोलकातामध्ये 2007 साली झालेल्या टेस्टमध्ये भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 616 रन्सचा डोंगर उभारला होता. त्यावेळी कमरानने पुन्हा एकदा सेंच्युरी झळकावली. कमरानच्या त्या सेंच्युरीमुळे पाकिस्तानने आधी फॉलो ऑन आणि नंतर मॅच वाचवली.

इंग्लंडच्या टीमने 2005 साली शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्या दौऱ्यात कमरानने सलग दोन वन-डेमध्ये सेंच्युरी झळकावल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध 2008 साली अबूधाबीमध्ये झालेल्या वन-डे मध्ये कमरानने कमाल केली. त्याने 9 बॉलमध्ये 3 सिक्सर्ससह 24 रन्स काढून पाकिस्तानला अवघड वाटणारा विजय (Kamran Akmal Birthday) मिळवून दिला.

कमरान अकमलची वन-डे मधील कामगिरी

मॅच157
रन्स3236
सरासरी26.09
सर्वोच्च124
100/505/10
कॅच/स्टंपिंग157/31

इतकी सारी गुणवत्ता असूनही कमरान जगातील सोडा पाकिस्तानचाही महान खेळाडू बनला नाही. आज त्याचे नाव आदराने घेतले जात नाही. याचे कारण त्याच्या अस्सल पाकिस्तानी स्वभावात आहे. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा एक कॅच सुटला म्हणून गिलख्रिस्ट तात्काळ निवृत्त झाला. पाकिस्तान ज्याला गिलख्रिस्टपेक्षा भारी समजत असे त्या अकमलने तर खराब विकेट किपिंगचे अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2010 साली झालेल्या सिडनी टेस्टमध्ये अकमलचे चार कॅच सोडल्या. त्याने माईक हसीला तीनदा जीवदान दिले. त्याचा फायदा उठवत हसीने पुढे सेंच्युरी झळकावली आणि पाकिस्तानने चांगल्या स्थितीमधून ती मॅच हरली. त्याचवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या सीरिजमध्ये तर त्याने आणखी टोक गाठले. केव्हिन पीटरसनचा एक अफलातून कॅच पकडला आणि पुढच्याच बॉलला कॉलिंगवूडचा एक सोपा कॅच सोडला. त्याने इऑन मॉर्गनलाही एक जीवदान दिले. त्याचा फायदा घेत मॉर्गननं सेंच्युरी केली. इंग्लंड विरुद्धची ती सीरिज अकमलने खराब किपींगनेच (Kamran Akmal Birthday) गाजवली.

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये कमरानने रॉस टेलरला बर्थ डे गिफ्ट देत 0 आणि 4 वर जीवदान दिले. त्याचा फायदा घेत टेलरने पुढे सेंच्युरी झळकावली. त्या मॅचमध्ये पाकिस्तान पराभूत झाले. त्या मॅचमधील खराब कामगिरी करणारा अकमलचा सहकलाकार शोएब अख्तर पुढे पाकिस्तानकडून एकही वन-डे खेळला नाही. मुख्य कलाकार अकमल मात्र 2017 पर्यंत वन-डे खेळला आहे.

कमरान अकमलची आंतरराष्ट्रीय T20 मधील कामगिरी

मॅच58
रन्स987
सरासरी21.00
सर्वोच्च73
100/500/5
कॅच/स्टंपिंग28/32

कमरान अकमलचं कुटुंब हे पाकिस्तानच्या क्रिकेटमधील एक शक्तीशाली कुटुंब आहे. उमर अकमल (Umar Akmal) आणि अदनान अकमल हे कमरानचे भाऊ पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. पाकिस्तानचे लेगस्पिनर अब्दुल कादीर हे उमर अकमलचे सासरे होते. तर आणखी एक पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद इलियास हे कमरानचे सासरे आहेत. पाकिस्तानच्या टीमचा सध्याचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) हा कमरानचा भाऊ (कझिन) आहे.

सिडनी टेस्टमध्ये कॅच सोडल्याप्रकरणी कमरानवर फिक्सिंगचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे त्याला पाकिस्तानच्या टीममधून वगळण्यात आले होते. पीसीबीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उमर अकमलने खोट्या दुखापतीचा बहाणा करत टीममधून माघार घेतली होती.

खेळला की नियम मोडतो, बोलला की ट्रोल होतो!

कमरान 2017 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये तो खेळतो. पेशावरच्या टीमकडून त्याने एक सेंच्युरी झळकावली आहे. एका सीझनमध्ये सर्वात जास्त रन्सही काढले होते. तो राष्ट्रीय टीममध्ये परत येण्याची शक्यता कमी असली तरी ती संपूर्णपणे संपलेली नाही. कारण पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि कमरान अकमल तर (Kamran Akmal Birthday) अस्सल पाकिस्तानी आहे!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: