1975 आणि 1979 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 1983) वेस्ट इंडिजची (West Indies) टीम फायनलमध्ये जाणार हे सर्वांनाच माहिती होतं. फायनलमध्ये वेस्ट इंडिजसमोर भारताची टीम येईल हे वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी भारतीय टीमच्या कट्टर फॅन्सनाही वाटलं नसावं. 24 वर्षीय कपिल देवच्या (Kapil Dev) त्या टीममध्ये अनेक नव्या दमाचे झुंजार खेळाडू होते. त्या टीमनं सर्वांचे अंदाज चुकवत फायनलमध्ये (1983 World Cup Final) प्रवेश केला.

लॉर्ड्सवर झालेल्या त्या फायनलपूर्वी भारतीय टीमला कुणी विजेतेपदाचं दावेदार मानत नव्हते. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताची इनिंग 183 वर संपुष्टात आल्यानंतर तर वेस्ट इंडिजचे विजेतेपद ही फक्त औपचारिकताच उरली होती.

भारतीय बॉलर्सनी ग्रिनीच आणि हेन्सला आऊट केले. व्हिव्ह रिचर्ड्स (Viv Richards) मैदानात सहज खेळत होता. तो मैदानात असेपर्यंत मॅच वेस्ट इंडिजच्या ताब्यात होती. वेस्ट इंडिजच्या ताब्यातील मॅच भारताकडे खेचण्यासाठी काही तरी अफाट घडणे आवश्यक होतं. मदनलालने ती संधी भारताला मिळवून दिली.

मदनलालच्या एका शॉर्ट बॉलवर रिचर्ड्स फसला. त्याला व्यवस्थित हूक मारता आला नाही. रिचर्ड्सने मारलेला बॉल उंच आणि लांब उडाला. कपिल देव तेंव्हा ‘मिड ऑन’ ला फिल्डिंग करत होता. रिचर्ड्सचा कॅच पकडण्यासाठी तो डीप मिड-विकेटच्या दिशेने पळत सुटला. कपिल देव उत्तम अ‍ॅथलिट होता. त्याचे हे कौशल्य बॉलचा पाठलाग करताना उपयोगी पडले.

‘कपिल देव का जबाब नही’ – पेन किलर घेत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला केले होते पराभूत!

वेस्ट इंडिजच्या टीमचा दरारा, रिचर्ड्सचा धाक, कॅप्टन्सची ओझं, कमी धावसंख्या वाचवण्याची जबाबदारी यापैकी कोणत्याही कारणामुळे कपिलचे खांदे दबले नाहीत. त्याने एकाग्रपणे बॉलचा पाठलाग केला. बंदूकीतून गोळी सुटावी तसा रिचर्ड्सच्या बॅटला लागून उडालेला तो बॉल कपिलने पकडला. रिचर्ड्स आऊट झाला. त्यावेळी काही क्षणासाठी संपूर्ण क्रिकेट विश्व स्तब्ध झाले होते!

वेस्ट इंडिजची टीम त्या धक्क्यातून सावरलीच नाही. भारताने 1983 चा वर्ल्ड कप (1983 World Cup Final) जिंकला. वन-डे क्रिकेटचा केंद्रबिंदू वेस्ट इंडिजमधून भारतीय उपखंडात सरकला.  

कपिल देवने 1983 वर्ल्ड कप फायनलमध्ये घेतलेला अजरामर कॅच

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: