
तो ज्या गावात वाढला ते शहर गुन्हेगारी विश्वाचं मुख्य केंद्र होतं. घरात मोठी गरिबी. वडिल लहापणीच सोडून गेले. आईनं दोन बहिणींसह त्याला वाढवलं. ही सर्व परिस्थिती त्याला गुन्हेगारी विश्वात जाण्यासाठी प्रवृत्त करणारी होती. त्यानं क्रिकेट विश्वात प्रवेश केला. आज T20 क्रिकेटमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. तो बॅटींगला असला की कितीही मोठं टार्गेट सेफ नसतं. त्याची बॉलिंग कमचालाऊ असली तरी बॅट्समनला गंडवण्याची हुशारी त्याच्याकडं आहे. त्याची फिल्डिंग चपळ आहे, आणि कॅप्टन म्हणूनही तो कल्पक आणि आक्रमक आहे. वेस्ट इंडिजच्या (West Indies) मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा माजी कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य सदस्य असलेल्या कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस (Kieron Pollard Birthday) आहे. आजच्या दिवशी (12 मे 1987) पोलार्डचा जन्म झाला.
सुरुवातीचं करियर
कायरन पोलार्ड वेस्ट इंडिजच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago) या भागातील खेळाडू. त्याची शरीरयष्टी सुरुवातीपासूनच भक्कम होती. त्यामुळे सिक्स मारणे ही त्याची अगदी सहजप्रवृत्ती आहे. याच जोरावर पोलार्डनं लवकरच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचं लक्ष वेधून घेतलं. तो 2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा सदस्य होता.
त्यानंतर वर्षभरानी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2007) त्याला पदार्पणाची संधी संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या त्या वन-डे मॅचमध्ये पोलार्डनं 17 बॉलमध्ये 10 रन काढले आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन!
आयपीएलमध्ये एन्ट्री
पोलार्डची (Kieron Pollard Birthday) पहिल्या 15 वन-डेमध्ये 11.30 तर 10 वन-डे मध्ये 17.20 इतकी सरासरी होती. तरीही 2010 साली झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वात जास्त किंमत मिळालेल्या दोन खेळाडूंपैकी तो एक होता. चार आयपीएल टीमनं त्याच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अखेर, मुंबई इंडियन्सनं टायब्रेकवर बाजी मारली. 2010 पासून तो मुंबई इंडियन्सकडं आहे.
या आयपीएल लिलावाआधी झालेल्या चॅम्पियन लीगच्या सेमी फायनलमध्ये पोलार्डनं हैदराबादमध्ये एक वादळी खेळी केली होती. न्यू साऊथ वेल्स (New South Wales) या ऑस्ट्रेलियातील सर्वात बलाढ्य टीमविरुद्ध पोलार्डनं फक्त 18 बॉलमध्ये नाबाद 54 रन्स काढले. यामध्ये 5 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. पोलार्ड क्लीन हिट्ससाठी आज ओळखला जातो. ते हिट्स तेंव्हा वेस्ट इंडिजबाहेरच्या जगानं पहिल्यांदा पाहिले.
बंडखोर पोलार्ड
कायरन पोलार्डनं वयाच्या 23 व्या वर्षी 2010 साली एक मोठा निर्णय घेतला. त्यानं T20 क्रिकेटचा फ्री लान्सर होण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेटचं कॉन्ट्रॅक्ट फेटाळलं. त्याच्यावर मोठी टीका झाली. त्या काळात T20 क्रिकेट हे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होतं. त्याचं भविष्य काय असेल हे कुणालाही माहिती नव्हतं. पण, पोलार्डनं धोका पत्कारला. तो T20 क्रिकेटचा खऱ्या अर्थानं प्रणेता खेळाडू आहे. आज 12 वर्षांनंतर T20 क्रिकेटमध्ये 10 हजार रन्स आणि 250 विकेट्स घेणारा पोलार्ड हा एकमेव क्रिकेटपटू आहे.
मुंबई इंडियन्सशी घट्ट नातं
कायरन पोलार्ड आणि मुंबई इंडियन्स हे अगदी घट्ट समीकरण आहे. तो या टीमकडून 150 T20 खेळणारा खेळाडू आहे. त्याचा फॉर्म नव्हता त्यावेळी देखील पोलार्डला मुंबई इंडियन्सनं जपलं. त्याला वेळ दिला. खेळाचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळेच तो नेहमी मुंबई इंडियन्ससाठी 200 टक्के योगदान देतो.
मुंबई इंडियन्सला 2013 साली पहिलं विजेतेपद मिळवून देण्यात पोलार्डचा मोठा वाटा आहे. त्यावर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये 4 आऊट 52 अशी अवस्था झाल्यानंतरही पोलार्डच्या 32 बॉल 60 रनच्या खेळीमुळे मुंबईला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 148 पर्यंत मजल मारता आली.
पोलार्डच्या त्या बॅटींगमुळे धोनीनं त्याचा कम्फर्ट झोन बदलला. फिल्डर्सच्या जागेत बदल केला. पण पोलार्डचे आक्रमण थांबले नाही. त्यामुळेच मुंबईला पहिले आयपीएल विजेतेपद मिळाले. त्यानंतरच्या पुढील चार आयपीएल विजेतेपदाही पोलार्डचा मोलाचा वाटा आहे.
रोहित शर्मानं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या यशाचं ‘गुपित’
हुशार कॅप्टन
कायरन पोलार्ड (Kieron Pollard Birthday) कॅरिबन प्रीमियल लीगमधील (CPL) बार्बोडस टीमचा 2014 साली कॅप्टन झाला. ड्वेन स्मिथ आणि एडवर्डससारख्या स्थानिक खेळाडूंना वगळून बाहेरच्या पोलार्डला कॅप्टन करणे लोकांना आवडले नव्हते. त्यांनी पोलार्ड विरुद्ध निदर्शनं केली. पोलार्डनं त्याचवर्षी बार्बोडसला पहिलं विजेतेपद मिळवून देत सर्वांना आपलसं केलं.
पोलार्डची फिल्डिंग प्लेसमेंट ही नेहमी आऊट ऑफ बॉक्स असते. आज मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक असलेला महेला जयवर्धने CPL मध्ये पोलार्डच्या विरोधी टीममधील खेळाडू होता. जयवर्धनेला बॅटींगला आल्यानंतर सुरुवातीचे काही बॉल अगदी जवळ मारण्याची सवय होती. त्याची ही सवय हेरुन पोलार्ड एकदा स्वत: सिली पॉईंटला उभा राहिला. त्यानं जयवर्धनेचा जबरदस्त लो कॅच घेतला.
आज तो त्रिनिदाद नाईट रायडर्स (TKR) या शाहरुख खानच्या मालकीची असलेल्या CPL टीमचा कॅप्टन आहे. या टीमनं मागच्या सिझनमध्ये अक्षरश: वर्चस्व गाजवत विजेतेपद पटाकवलं आहे.
IPL 2021 Explained : रोहित शर्मानं सात वर्षांनंतर बॉलिंग का केली ?
पुन्हा वेस्ट इंडिजमध्ये
वयाच्या 23 व्या वर्षी बंडखोरी केलेला पोलार्ड पुन्हा वेस्ट इंडिजच्या टीममध्ये परतला. तो त्यांचा वन-डे आणि T20 टीमचा कॅप्टन देखील झाला. या कॅप्टनसीनंतरही त्याच्यातील आक्रमकता लोप पावलेली नाही. त्यामुळेच आधीच्या ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक घेतलेल्या अखिला धनंजयाला पुढच्या ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स मारण्याचा पराक्रम त्यानं केला.
2019 साली भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज टीमनं मालिका गमावली. पण त्या सीरिजमध्येही पोलार्डच्या कॅप्टनसीमधील चमक जगानं पाहिली होती. चेन्नईतील मॅचमध्ये विराट कोहलीची 4 रनवर मिळालेली विकेट हे हुशार कॅप्टनसीचं बक्षीस होतं.
वेस्ट इंडिजच्या ज्युनिअर खेळाडूंना योग्य प्रकारे हातळण्याचं कौशल्य पोलार्डकडं आहे. निकोलस पूरनचा (Nicholas Pooran) 2015 साली कार अपघात झाला होता. या अपघातात त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. व्हिलचेअरवरील पूरनला पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये उभं राहण्यास पोलार्डनं मदत केली. त्याच्यासोबत क्रिकेटचा सराव केला. त्याला T20 क्रिकेटचं कॉन्ट्रॅक्ट मिळावं यासाठी स्वत: प्रयत्न केले. त्याला चांगला एजंट मिळवून दिला.
159 रन करुनही विराट कोहलीच्या टीमनं जिंकला होता वर्ल्ड कप VIDEO
पोलार्डची परीक्षा!
पोलार्डसाठी (Kieron Pollard Birthday) मागील वर्ष चांगलं ठरलं नाही. त्याला दुखापतीनं सतावलं. त्याच्या कॅप्टनसीमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजची टीम फेल गेली. टीमला विजेतेपद राखता आले नाही. त्याचा फॉर्मही खालवला. त्यातूनच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
या आयपीएलमध्येही पोलार्ड अपयशी ठरतोय. ‘त्याला रिटेन करून मुंबई इंडियन्सनं चूक केली’, ‘तो पुढील वर्षी मुंबईच्या टीममध्ये राहणार नाही’, पोलार्ड आता संपला’ अशी टीका आता होत आहे. आयुष्यात अनेक वाईट गोष्टी बघितलेल्या पोलार्डसाठी मागच्या वर्षातील अपयश हा मोठा विषय नाही. या अपयशातून सावरण्याची आणि पुन्हा चॅम्पियन होण्याची क्षमता त्याच्यात नक्की आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.