फोटो – क्रिकेट ऑस्ट्रेलिया

क्रिकेट कारकीर्द लांबावी म्हणून निवृत्तीचा निर्णय घेणं टाळणारे अनेक क्रिकेटपटू आहेत. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) तर निवृत्त होणे आणि निवृत्तीचा निर्णय मागे घेणे यासाठी जगप्रसिद्ध होता. निवृत्ती लांबवण्याच्या परंपरेला तडा देणारे देखील काही क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. अशा क्रिकेटपटूंमधील एक आघाडीचे नाव आहे ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist). महान विकेट कपर बॅटर असलेल्या गिलख्रिस्टचा आज वाढदिवस (Adam Gilchrist Birthday)आहे. आजच्या दिवशी (14 नोव्हेंबर 1971) रोजी त्याचा जन्म झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा दबदबा वाढवण्यात गिलख्रिस्टचे मोठे योगदान होते. वन-डेमध्ये त्याने मॅथ्यू हेडनसह ओपनिंगला येऊन अनेकदा टीमच्या विजयाचा पाया रचला होता. तर टेस्टमध्ये सातव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन गिलख्रिस्टनं आक्रमक खेळाच्या जोरावर मॅचचं चित्र अनेकदा बदललं होतं.

ॲडलेड : ऑस्ट्रेलियाच्या भक्कम किल्ल्याचा ‘किंग’ कोहली!

गिलख्रिस्ट स्टंपच्या मागे देखील निष्णात होता. त्याने स्टंपच्या मागे 905 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. हा एक ऑस्ट्रेलियन रेकॉर्ड आहे. आक्रमक आणि चपळ गिलख्रिस्टनं 2008 साली भारताविरुद्ध डलेड टेस्ट सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करुन खळबळ उडवली होती.

ॲडलेड टेस्टमध्ये गिलख्रिस्टनं व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा कॅच सोडला. त्याचवेळी गिलख्रिस्टला आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिवस संपल्याचं लक्षात आलं. ‘’लक्ष्मणचा कॅच सोडला त्याचवेळी मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणसारख्या खेळाडूला तुम्ही फार संधी देऊ शकत नाही’’ असं स्पष्टीकरण गिलख्रिस्टनं (Adam Gilchrist Birthday) दिलं होतं.

गिलख्रिस्टनं एकूण 96 टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये 47.60 च्या सरासरीनं 5570 रन काढले. यामध्ये 17 सेंच्युरी आणि 26 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 379 कॅच घेतले आणि 37 स्टंपिंग केले. वन-डे क्रिकेटमध्येही गिलख्रिस्टचा दबदबा होता. त्यानं 287 वन-डेमध्ये 35.89 च्या सरासरीनं 9619 रन केले. यामध्ये त्यानं 16 सेंच्युरी आणि 55 हाफ सेंच्युरी झळकावल्या. गिलख्रिस्टनं वन-डे क्रिकेटमध्ये 417 कॅच घेतले आणि 55 स्टंपिंग केले.

चेतेश्वर पुजाराचा ‘भक्कम’ खेळ आहे टीम इंडियाचा आधार!

गिलख्रिस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर काही वर्ष इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळला. डेक्कन चार्जर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन टीमची त्याने कॅप्टन्सी केली. गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखालीच (Adam Gilchrist Birthday) डेक्कन चार्जर्सनं 2009 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: