
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) होणा-या बाळाचे स्वागत करण्यासाठी आता भारतामध्ये परतला होता. कोहीलीच्या या निर्णयावर तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया उमटली होती. काही जणांनी त्याला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्याच्या बाळाच्या जन्मावेळी दौरा सोडून आला नव्हता…याची आठवण करुन दिली होती. बाळाच्या जन्माच्या वेळी महेंद्रसिंह धोनी जवळ नव्हता, त्यावेळी आपल्याला काय वाटलं याबाबत धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) पहिल्यांदाच ‘मन की बात’ (Sakshi On Mahi) सांगितली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या अधिकृत ट्विटर हँडलवर साक्षीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यावेळी साक्षीने मुलीच्या जन्मावेळी धोनी जवळ नव्हता तेंव्हा काय वाटलं होतं ते सर्वांशी शेअर केले.
‘महेंद्रसिंह धोनीच्या टेम्परामेन्टचा ICC फायनलमध्ये फायदा झाला’
“बाळाच्या जन्माचे आम्ही नियोजन केले होते. आमचे बाळ वर्ल्ड कपच्या काळात (ICC Cricket World Cup 2015) जन्माला येणार होते. त्यामुळे त्या काळात फक्त बाळाला बघण्यासाठी त्याने (महेंद्रसिंह धोनी) यावे असे आम्हाला वाटले नाही. तुझा नवरा आला नाही असे हॉस्पिटलमधले सर्व जण मला विचारत होते. मी म्हणाले, ठीक आहे. त्याच्या काही प्राधान्याच्या गोष्टी आहेत. क्रिकेट हे त्याचे प्राधान्य आहे आणि तो माझे प्राधान्य आहे. त्यामुळे त्याच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी या माझ्यासाठीही महत्वाच्या आहेत. प्रेमात कोणतेही बलिदान नसते. प्रेम असेल तर तुम्ही त्या गोष्टी आनंदाने करता”, या शब्दात साक्षीने (Sakshi On Mahi) तेंव्हाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनी आता 40 वर्षांचा झाला आहे. धोनी मागच्या वर्षी (15 ऑगस्ट 2020) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला. अनेक क्रिकेटपटू रिटायरनंतर चर्चेत राहण्यासाठी काही तरी प्रयत्न करत असतात. धोनीनं तसा प्रयत्न कधीही केलेला नाही. मुलीच्या जन्माच्या वेळी ऑस्ट्रेलियात त्याला काय वाटलं? हे धोनीनं आजवर शेअर केलेलं नाही, पण साक्षी धोनीच्या या व्हिडीओमुळे तिच्या या विषयावरच्या भावना (Sakshi On Mahi) सर्वांना समजण्यास मदत झाली आहे.
धोनीनं तरूणांना If he can, then I also can ही प्रेरणा दिली !
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.