फोटो – ICC

पाकिस्तान क्रिकेटनं (Pakistan Cricket) वेळोवेळी अनेक फास्ट बॉलर्स दिले ज्यांनी त्यांच्या फॅन्सना खूप मोठं स्वप्न दाखवलं. ज्यांचा स्पेल पाहून अनेकांचे डोळे दिपले. हेच भविष्यातले इम्रान, अक्रम असे त्यांचं वर्णन करण्यात आलं. पण, त्यानंतर त्यांच्यात सातत्य दिसले नाही. पाकिस्तानच्या अशा मोठ्या फास्ट बॉलर्सच्या यादीमधील एक असलेल्या वहाब रियाझचा आज वाढदिवस (Wahab Riaz Birthday) आहे. आजच्याच दिवशी (28 जून 1985) वहाबचा जन्म झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2015 वर्ल्ड कपमध्ये केलेल्या एका जबरदस्त स्पेलसाठी वहाब आजही ओळखला जातो.

स्पॉट फिक्सिंग सीरिजमध्ये पदार्पण

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात 2010 साली झालेली 5 टेस्ट मॅचची सीरिज स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) सीरिज म्हणून ओळखली जाते. मोहम्मद आमिर (Mohammad Amir),  मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) या दोन फास्ट बॉलर्ससह त्यांचा त्या दौऱ्यातील कॅप्टन सलमान बट (Salman Butt) हे तीन जण त्या सीरिजमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले. स्पॉट फिक्सिंगनं गाजलेल्या लॉर्ड्स टेस्टच्या (Lords Test 2010) आधीच्या टेस्टमध्ये ओव्हलवर वहाबने पदार्पण केले.

वहाबनं (Wahab Riaz Birthday) पहिल्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी स्वप्नवत सुरुवात केली. त्याने त्या दिवशी 18 ओव्हर्समध्ये अँण्ड्यू स्ट्रॉस, जोनाथन ट्रॉट, केव्हिन पीटरसन, इऑन मॉर्गन आणि स्टुअर्ट ब्रॉड या पाच जणांना आऊट केले. त्याच्या स्पेलमुळे पहिल्याच दिवशी इंग्लंडची टीम ऑल आऊट झाली. त्यानंतर पुढे पाकिस्ताननं ती टेस्ट 4 विकेट्सनं जिंकली.

भारताविरुद्ध 5 विकेट्स

इंग्लंड सीरिजनंतर मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफवर बंदी आली. त्यामुळे वहाबला टीममध्ये स्थिर होण्याची पूर्ण संधी होती. 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2011) वहाबचा टीममध्ये समावेश झाला. भारताविरुद्ध मोहालीमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये (India vs Pakistan Cricket World Cup 2011 Semi Final) अनुभवी शोएब अख्तरच्या जागी वहाबला खेळवण्यात आले.

वहाबने (Wahab Riaz Birthday) भारताविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. त्यामध्ये संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेल्या युवराज सिंगला (Yuvraj Singh) वहाबनं पहिलाच बॉलवर अप्रतिम स्विंगनं चकवलं. युवराजची दांडी उडाली. वहाबच्या या कामगिरीनंतरही पाकिस्तानचा त्या मॅचमध्ये पराभव झाला.

2011 सालीच पाकिस्ताननं न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये टेस्ट जिंकण्याची दुर्मिळ कामगिरी केली होती. हॅमिल्टनमध्ये झालेल्या त्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये वहाबने ब्रँडन मॅकलम, जेस्सी रायडर आणि केन विल्यमसन या तीन मुख्य बॅट्समनला आऊट करत विजयामध्ये योगदान दिले.

पाकिस्तान क्रिकेटमधील मिस्टर अनफिट!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध Wahabism

पाकिस्तानसाठी साधारण ठरलेल्या 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2015) वहाबनं एक भन्नाट स्पेल टाकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये वहाबनं 9 ओव्हर्समध्ये 54 रन देत 2 विकेट्स घेतल्या. फक्त या स्कोअरबोर्डकडे पाहिले तर वहाबची कामगिरी लक्षात येणार नाही.

वहाब बॉलिंग करत असताना शेन वॉटसननं (Shane Watson) त्याला उद्देशून स्लेजिंग केले होते. वहाबला वॉटसनची स्लेजिंग चांगलेच झोंबले. त्याने सातत्यानं फास्ट बॉलिंग करत वॉटसनची परीक्षा पाहिली. त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकवले. वहाबच्या (Wahab Riaz Birthday) त्या स्पेलमध्ये वॉटसनचा कॅच सुटला. पाकिस्ताननं मॅच तिथेच गमावली. पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले.

2019 वर्ल्ड कपमध्येही चमकला

2019 साली झालेल्या वर्ल्ड कप (Cricket World Cup 2010) स्पर्धेसाठी सुरुवातीला निवडलेल्या टीममध्ये वहाबचा समावेश नव्हता. वहाब अनफिट असल्याचं सांगत कोच मिकी ऑर्थर (Micky Artur) यांनी त्याला टीममध्ये घेण्यास नकार दिला होता. वहाबची पुन्हा टीममध्ये निवड झाली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या वन-डेमध्ये वहाबनं शेवटच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स घेत पाकिस्तानला आवश्यक असणारा विजय मिळवून दिला.

वहाब फार का खेळला नाही?

वहाब रियाझला आता काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 वर्ष होतील. या 11 वर्षांमध्ये तो पाकिस्तानकडून फक्त 27 टेस्ट, 91 वन-डे आणि 36 T20 खेळला आहे. मॅच विनिंग स्पेलसह तो लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅट्समन देखील आहे.

वहाबमध्ये हे सर्व वैशिष्ट्यं असलं तरी सातत्याचा अभाव हे त्याच्या कमी खेळण्याचं मुख्य कारण आहे. त्याची बॉलिंग अनेकदा महागडी ठरते. इंग्लंड विरुद्ध 2016 साली झालेल्या वन-डे मॅचमध्ये त्यानं 10 -0-110-0 (10 ओव्हर 0 मेडन 110 रन शून्य विकेट्स) अशी बायनरी नंबरमध्ये (Binary Number) बॉलिंग केली होती. वन-डे क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा महागडा स्पेल आहे. पाकिस्तानी क्रिकेटच्या लहरी कारभाराचा फटका वहाबलाही बसला. ज्या देशात प्रत्येक सीरिजनंतर एक सुपरस्टार बॉलर जन्माला येतो त्या देशात वहाबकडे दुर्लक्ष होणे हे स्वाभाविक आहे.

Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?

वहाब 2018 साली शेवटची टेस्ट खेळला. दोन वर्ष वाट पाहिल्यानंतर वहाबनं टेस्ट क्रिकेटमधून रिटारमेंट जाहीर केली. त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं करारबद्ध केलेल्या खेळाडूंमध्येही त्याचा समावेश नाही. आता वहाबनं T20 क्रिकेटवर फोकस केला आहे. यावर्षी झालेल्या पीएसएल (PSL 2021) स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या पेशावरच्या टीमचा वहाब (Wahab Riaz Birthday) कॅप्टन होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: