इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 13 वा सीझन (IPL 2020) राहुल नावाच्या खेळाडूंनी गाजवला. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कॅप्टन के.एल. राहुलनं (KL Rahul) स्पर्धेत सर्वाधिक रन्स काढत ऑरेंज कॅप पटकावली. त्याने आयपीएल स्पर्धेतील एका इनिंगमध्ये सर्वाधिक वैयक्तिक रन्स करणारा भारतीय बॅट्समन होण्याचा विक्रम केला. राजस्थान रॉयल्सचा राहुल तेवातियाने (Rahul Tewatia) प्रचंड दबावाखाली एका ओव्हरमध्ये पाच सिक्सर मारण्याची अचाट कामगिरी केली. यापुढे आयपीएलच्या तेराव्या सीझनचा इतिहास राहुल तेवातियाच्या इनिंगला वगळून लिहिणे शक्य नाही. या दोन राहुल नंतर आणखी एका राहुलने त्याला मिळालेल्या मर्यादीत संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. तो राहुल आहे, कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) राहुल त्रिपाठी राहुल त्रिपाठीचा आज वाढदिवस (Rahul Tripathi Birthday) आहे. आजच्याच दिवशी (2 मार्च 1991) राहुलचा जन्म झाला.

धोनीच्या टीमविरुद्ध धमाल!

चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये राहुलने 51 बॉल्समध्ये 158.82 च्या स्ट्राईक रेटने 81 रन्स काढले. राहुल या मॅचमध्ये ओपनिंगला आला होता. सुनील नरीन ऐवजी पाठवलं म्हणून राहुलने नरीनसारखी आलं की गडबड केली नाही. प्रत्येक बॉलचा आदरही केला नाही. शुभमन गिल आणि नितेश राणा बॉलपेक्षा कमी रन काढून आऊट झाले. त्या परिस्थितीतही राहुलने एका बाजूने धावगती कमी होणार नाही याची खबरदारी घेतली.

सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि कोच स्टिफन फ्लेमिंग यांचा राहुल माजी सहकारी. या दोघांचा समावेश असलेल्या रायझिंग पुणे सुपर जायंट (Rising Pune Supergiant) या टीममधून 2017 साली सर्वप्रथम नावारूपाला आला. राहुलचे वडिल उत्तर प्रदेशचे. ते विद्यापीठ स्तरापर्यंत क्रिकेट खेळले. पुढे लष्करात गेल्यानंतर त्यांचे क्रिकेट सुटले. राहुलला क्रिकेट वारसा वडिलांकडून मिळाला. लहानपणी वडिलांच्या नोकरीमुळे अनेक ठिकाणी भ्रमंती करणारा राहुल क्रिकेटसाठी पुण्यात स्थिरावला. पुण्यातल्या प्रसिद्ध डेक्कन जिमाखान्यात त्याने क्रिकेटचे कौशल्य विकसित केले.

19 वर्षाच्या मुलानं रचला इतिहास, पदार्पणातील दोन्ही इनिंगमध्ये झळकावली सेंच्युरी

युवराजसारखी दोनदा कामगिरी

राहुलची स्थानिक पातळीवर आक्रमक खेळाडू म्हणून ओळख होती. स्थानिक स्पर्धेत एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारण्याचा त्याने दोनदा विक्रम केलाय. रायझिंग पुणेच्या टीमने त्याला 10 लाखांमध्ये करारबद्ध केले. त्याचा आक्रमक खेळ पाहून ओपनर बनवले. राहुलने तो संपूर्ण सिझन गाजवला.

राहुलने 2017 साली पॉवर प्लेमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन्स केले‌‌. केकेआरविरूद्ध 52 बॉल्समध्ये 93 रन्स हा त्याचा आयपीएलमधील आजवरचा सर्वोच्च स्कोअर. 156 रन्सचा पाठलाग करताना एकट्या राहुलने 93 रन्स केले होते. त्या मॅचमध्ये राहुलच्या टीममधला दुसरा वैयक्तिक स्कोअर होता 14.

राहुल नंतर राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये गेला. त्या टीममध्ये त्याला फिनिशर्सची जबाबदारी देण्यात आली. त्या रोलमध्ये त्याला फार संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याची टीममधील जागा अनिश्चित बनली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला एकदा ओपनिंगला संधी मिळाली होती. त्या मॅचमध्ये 58 बॉल्समध्ये नाबाद 80 रन्स काढत राजस्थानला विजय मिळवून दिला.

IPL 2020 पूर्वी केकेआरने ख्रिस लीनला मुक्त केले. सुनील नरीनचा बॅकअप ओपनर म्हणून त्यांनी राहुलची निवड केली. केकेआरचा कोच ब्रँडन मॅकलम (Brendon Mccullum) हा राहुलचा आदर्श. मॅकलमचे व्हिडिओ पाहून बरंच काही शिकलो असल्याचं राहुल सांगतो. मॅकलम कोच असलेल्या टीममध्ये खेळणं ही राहुलसाठी विशेष बाब आहे.

राहुलला सुरुवातीला संधी मिळाली (Rahul Tripathi Birthday) नाही. शारजातल्या छोट्या मैदानात बॅटिंग मजबूत करण्यासाठी त्याला पहिल्यांदा खेळवण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राहुल पॅट कमिन्सच्या नंतर आठव्या क्रमांकावर मैदानात उतरला. अवघड परिस्थितीमध्ये मैदानात उतरलेल्या राहुलने सेट व्हायला वेळ घेतला नाही. इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनसोबत त्याने आक्रमक भागिदारी केली. टीमच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या.

दिल्ली विरुद्ध केकेआरचा पराभव झाला मात्र संकटकाळी आक्रमक खेळ केलेल्या राहुलची टीममधली जागा पक्की झाली. राहुलला सीएसकेविरुद्ध त्याच्या नेहमीच्या ओपनिंग पोझिशनवर प्रमोशन देण्यात आलं. राहुलने या नव्या संधीचं सोनं केलं.

महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’ टीम इंडियाचा सुपरस्टार होण्यासाठी सज्ज!

राहुलला ओपनिंगला पाठवण्याचा रायझिंग पुणेचा निर्णय 2017 साली मास्टर स्ट्रोक ठरला होता. त्या वर्षी रायझिंग पुणेची टीम उपविजेती होती. केकेआरकडून ओपनिंगला संधी मिळताच पहिल्याच मॅचमध्ये राहुलने हाफ सेंच्युरी झळकावत टीमला विजय मिळवून दिला. या विजयी खेळीनंतरही राहुलच्या बॅटिंगचा क्रमांक सतत बदलण्यात आला. तो पुढील स्पर्धेत 1,3 आणि 7 क्रमांकावर खेळला. सततच्या बदलाचा फटका राहुलच्या बॅटिंगला तर बसलाच शिवाय केकेरला देखील बाद फेरी गाठण्यात अपयश आलं.

मेहनतीला फळ

कोलकाता नाईट रायडर्सनं या आयपीएलसाठी राहुलला रिटेन केले. त्याला संपूर्ण स्पर्धेत टॉप ऑर्डरमध्ये खेळवले. त्याचा फायदा केकेआरला झाला. राहुलनं त्यांना उत्तम रिटर्न दिले. राहुलनं 17 मॅचमध्ये 140. 28 च्या स्ट्राईक रेटनं 397 रन केले. यामध्ये 2 हाफ सेंच्युरीचा समावेश होता. केकेआरच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात राहुलचा महत्त्वाचा वाटा होता. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या क्वालिफायर दोनमध्ये राहुलनंच शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत केकेआरला फायनलमध्ये पोहचवले होते.

राहुलला मागील आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी केल्याचं फळ मिळालं आहे. त्याला खरेदी करण्यासाठी मेगा ऑक्शमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. यंदा त्याला सनरायझर्स हैदराबादनं (SRH) साडेआठ कोटींना खरेदी केले आहे. सनरायझर्स हैदराबादची टीम मागील आयपीएल सिझनमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. यंदा त्यांनी टीममध्ये संपूर्ण बदल केला आहे. या नव्या टीममध्ये राहुलवर मोठी जबाबदारी असणार आहे. ओपनिंग आणि मिडल ऑर्डरला सहजपणे खेळू शकणाऱ्या T20 प्लेयर्समध्ये राहुलचा समावेश होतो. टीम सांगेल त्या नंबरवर खेळण्यासाठी राहुल (Rahul Tripathi Birthday) पुन्हा एकदा सज्ज आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: