अब्राहम बेंजामीन डीव्हिलियर्स म्हणजेच एबी डीव्हिलियर्सचा (AB de Villiers) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी 1984 रोजी त्याचा जन्म झाला. त्या निमित्तानं डीव्हिलियर्सचे काही अनोखे रेकॉर्ड्स (ABD Special) ‘Cricket मराठी’ तुम्हाला सांगणार आहे.

सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये 2015 साली झालेल्या वन-डे मध्ये फक्त 16 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याचा (Sanath jayasuriya) 19 वर्ष जुना रेकॉर्ड डीव्हिलियर्सने त्यादिवशी एक बॉल कमी खेळत मोडला.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : ग्रॅमी स्मिथ ‘कॅप्टन्स नॉक’चा राजा! )

सर्वात वेगवान सेंच्युरी

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्डही डीव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये 2015 साली झालेल्या वन-डे मध्ये अवघ्या 31 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्यापूर्वी हा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या कोरे अँडरसनच्या नावावर होता.

सर्वात वेगवान 150

डीव्हिलियर्सचा तडाखा बॅट वेस्ट इंडिजला अनेकदा बसला. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये डीव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये वेगवान 150 रन्सचाही रेकॉर्ड केला. त्यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनच्या (Shane Watson) नावावर होता. वॉटसनने बांगलादेशविरुद्ध 83 बॉल्समध्ये हा पराक्रम केला होता. डीव्हिलियर्सने वॉटसनपेक्षा एक नाही दोन नाही तर तब्बल 19 बॉल्स कमी खेळले. त्याने फक्त 64 बॉल्समध्ये 150 रन्स पूर्ण केले होते.

( वाचा : Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे!, तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही? )

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात जास्त रन्स करण्याचा रेकॉर्डही डीव्हिलियर्सच्या (ABD Special) नावावर आहे. डीव्हिलियर्स तीन वर्ल्ड कपमध्ये खेळला. त्यामधील 23 मॅचमध्ये 63.52 च्या सरासरीने त्याने 1207 रन्स काढले आहेत. यामध्ये चार सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समन्सच्या यादीत डीव्हिलियर्स पाचव्या नंबरला आहे.

आयपीएलमधील सर्वात मोठी पार्टरनरशिप

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतही डीव्हिलियर्सची बॅट नेहमीच तळपली आहे. त्याने विराट कोहलीसोबत आयपीएल इतिहासातील आजवरची सर्वात मोठी पार्टरनरशिप केलीय. कोहली-डीव्हिलियर्स जोडीने 2016 साली गुजरात लॉयन्स विरुद्ध 229 रन्सची पार्टरनरशिप करत तो रेकॉर्ड केला होता.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: