फोटो – आयसीसी, ट्विटर

तो अंडर 19 क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. आक्रमक बॅटींग आणि चपळ विकेट किपिंग यामुळे अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि कुमार संगकारा या महान क्रिकेटपटूंचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले. वयाच्या 21 व्या वर्षीच त्याने वन-डे क्रिकेटमध्ये सलग 3 सेंच्युरी झळकावल्या. त्यानंतरच्या काळात टीममधील अस्थिर वातावरणातही त्याचा खेळ हा टीमसाठी आधार बनला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) त्याने बंडखोरी केली तेव्हा क्रिकेट विश्वाचा ठोका चुकला होता. पण हे वादळ फार काळ टिकलं नाही. अस्थिर दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा आधारस्तंभ असलेल्या क्विंटन डी कॉकचा आज वाढदिवस (Quinton de Kock Birthday) आहे. आजच्याच दिवशी (17 डीसेंबर 1992) रोजी त्याचा जन्म झाला.

अंडर 19 मधून एन्ट्री

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आणि डी कॉकची शाळा एकच आहे. पण, डी कॉकला सुरुवातीला बेसबॉलमध्ये अधिक रस होता. या खेळात पुढील करिअर करण्यासाठी त्याची अमेरिकेत जाण्याची तयारी होती. पण, वडीलांच्या आग्रहामुळे तो क्रिकेटकडे वळला.

डीकॉक अंडर 19 टीममधील एक यशस्वी खेळाडू आहे. त्याने या टीमची कॅप्टनसी देखील केली आहे. पण, 2012 मधील अंडर 19 वर्ल्ड कपपूर्वी (Under 19 World Cup 2012) त्याने बॅटींगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कॅप्टनसी सोडली. त्याचा हा निर्णय फायदेशीर ठरला. डी कॉकने त्या वर्ल्ड कपमधील 6 मॅचमध्ये 284 रन काढले.

ग्रॅमी स्मिथ ‘कॅप्टन्स नॉक’चा राजा!

चॅम्पियन्स लीग 2012 मध्ये भविष्यातील आयपीएल टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध केलेल्या खेळीमुळे डी कॉकची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. एबी डीव्हिलियर्सच्या (AB de Villiers) विकेटकिपिंगचा भार कमी करण्यासाठी तो टीममध्ये आला.

डी कॉकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण निराशाजनक ठरले. न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्धच्या सीरिजमध्ये तो कमाल करू शकला नाही. पाकिस्तान विरुद्धच्या वन-डेमध्ये त्याने पहिली सेंच्युरी झळकावली. त्यानंतरच्या भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये डी कॉकची आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं दखल (Quinton de Kock Birthday) घेतली.

टीम इंडिया विरुद्ध धमाका

क्विंटन डी कॉकने 2013 साली झालेल्या भारताविरुद्ध झालेल्या वन-डे सीरिजमध्ये (India vs South Africa) 135, 106 आणि 101 रन करत सलग तीन सेंच्युरी झळकावल्या. वयाच्या 21 व्या वर्षी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि आर. अश्विन या दिग्गज भारतीय बॉलर्सचा सामना करत त्याने या सेंच्युरी झळकावल्या.

वयाच्या 21 व्या वर्षी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक (6) सेंच्युरी झळकावण्याच्या श्रीलंकेच्या उपल थरंगाच्या रेकॉर्डची त्याने बरोबरी केली. अर्थात या दोघांमध्ये डी कॉकची सरासरी जास्त आहे. डी कॉकच्या या कामगिरीमुळे 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

दुखापतीचा फटका आणि कमबॅक

डी कॉकची कारकिर्द टेक ऑफ घेत होती. त्याचवेळी दुखापतीमुळे ती क्रॅश झाली. या दुखापतीमुळे तो 2015 साली होणारा वर्ल्ड कप खेळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, तो वर्ल्ड कपपूर्वी बरा झाला. त्या वर्ल्ड कपमध्ये डी कॉक फ्लॉप गेला. 8 इनिंगमध्ये केवळ 2 वेळा त्याला 20 रनचा टप्पा ओलांडता आला.

वर्ल्ड कपनंतरच्या बांगलादेश सीरिजमध्येही त्याचा फॉर्म निराशाजनक होता. त्यामुळे त्याला टीममधून वगळण्यात आले. दक्षिण आफ्रिका A टीमकडून खेळून त्यानं फॉर्म मिळवला. त्यानंतर झालेल्या भारताविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्यानं 2 सेंच्युरी झळकावत कमबॅक केले. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेला ती सीरिज 3-2 ने जिंकून (Quinton de Kock Birthday) दिली.

जागतिक क्रिकेटमधील पहिला फिल्डिंग सुपरस्टार!

गिलख्रिस्टची आठवण

वन-डे आणि T20 क्रिकेट गाजवूनही त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये सुरुवातीला फारशी संधी मिळाली नाही. 2016 साली ही परिस्थिती बदलली. त्याने त्या वर्षी सलग 5 टेस्ट इनिंगमध्ये 50 पेक्षा जास्त रन केले. त्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होबार्टमध्ये झालेल्या टेस्टमध्ये डी कॉकच्या खेळानं गिलख्रिस्टची आठवण झाली.

बॉलर्सना मदत करणाऱ्या त्या टेस्टमध्ये डी कॉकने सातव्या क्रमांकावर येत 104 रन काढले. त्याच्या सेंच्युरीमुळे दक्षिण आफ्रिकेनं ती टेस्ट 1 इनिंगच्या अंतराने जिंकली. होबार्ट टेस्टच्या दीड महिना आधी सेंच्युरिअनमध्ये झालेल्या वन-डेमध्ये डी कॉकने 113 बॉलमध्ये 178 रन चोपले होते. त्याच्या या फटकेबाजीतही गिलख्रिस्टचा (Quinton de Kock Birthday) भास जाणवला.

बंडखोर डी कॉक

डी कॉकसाठी 2019 साली झालेला वर्ल्ड कप साधारण ठरला. त्याने 9 मॅचमध्ये 3 हाफ सेंच्युरी झळकावल्या. दक्षिण आफ्रिकेचं आव्हान सेमी फायनलपूर्वी संपुष्टात आले. पण, या वर्ल्ड कपनंतर डी कॉक सातत्याने रन करत होता. त्यानं काही काळ दक्षिण आफ्रिकेची कॅप्टनसी देखील सांभाळली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल 2020 (IPL 2020) ही स्पर्धा देखील त्याने गाजवली.

यावर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत डी कॉकच्या खांद्यावर दक्षिण आफ्रिकेच्या खांद्यावर मोठी भिस्त होती. पण, त्याने या स्पर्धेच्या दरम्यान गुडघ्यावर वाकून गुडघ्यात वाकून ब्लॅक व्यक्तींवरील अन्यायाबद्दल संवेदनशीलता दाखवण्याच्या प्रकारात सहभागी होण्यास नकार (Quinton de Kock Birthday) दिला.

डी कॉकने त्यामुळे वर्ल्ड कपमधील एक मॅच खेळली नाही. त्याच्यावर मोठी टीका झाली. दक्षिण आफ्रिकेतील त्याचे करिअर संपले अशी तेव्हा चर्चा सुरू झाली होती. पण नंतर डी कॉकने माघार घेतली. त्याने या विषयावरील भूमिका स्पष्ट करत मूळ भूमिकेत बदल केला.

मोठी अपेक्षा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाविरुद्ध मायदेशात आजवर एकदाही टेस्ट सीरिज गमावलेली नाही. डी कॉक वैयक्तिक कारणामुळे या सीरिजमधील एकच टेस्ट खेळणार आहे. पण या टेस्टमध्ये दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला आघाडी मिळवून देण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका क्रिकेटला ‘अच्छे दिन’ यावे यासाठी देखील डी कॉकला आगामी काळात मोठी भूमिका (Quinton de Kock Birthday) पार पाडावी लागेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: