
दक्षिण आफ्रिकेला (South Africa) फास्ट बॉलिंगची परंपरा लाभली आहे. डोनाल्ड, पोलॉक, स्टेन, मॉर्केल या दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सनी जगभर दरारा निर्माण केला. गेल्या काही वर्षांमध्ये या टीमच्या कामगिरीत उतार जास्त आहे. प्रमुख खेळाडूंची निवृत्ती, काहींनी धरलेली इंग्लंडची वाट, टीममधील कोटा पद्धती यामुळे आफ्रिकेचं नुकसान जास्त झाले आहे. या पडझडीमध्येही आफ्रिकेचे आशास्थान असलेल्या कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याचा आज वाढदिवस आहे. आजच्या दिवशी (25 मे 1995) रोजी रबाडाचा जन्म (Kagiso Rabada Birthday) झाला.
वर्ल्ड कप चॅम्पियन
रबाडाला रग्बी खेळाडू व्हायचं होतं. तो शाळेत असताना नियमित रग्बी खेळाडू होता. रग्बीच्या ऑफ सिझनमध्ये त्याने मजा म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यामध्ये लवकरच प्राविण्य मिळवले. त्यातच रग्बीच्या A लेव्हलच्या टीममध्ये त्याची निवड झाली नाही. त्यामुळे रबाडाने रग्बीला रामराम करत क्रिकेटमध्ये करियर करण्याचे ठरवले.
दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट विश्वात चोकर्स म्हणून ओळख आहे. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत त्यांची ही सवय हमखास दिसते. त्यामुळेच आयसीसी स्पर्धेत सीनियर गटामध्ये दक्षिण आफ्रिकेला आजवर एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अगदी या स्पर्धेच्या बाद फेरीतील मॅचमध्ये त्यांनी आजवर फक्त एकदाच 2015 साली विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेला आयसीसीचे एकच विजेतेपद मिळाले. त्यांच्या अंडर-19 टीमने 2014 साली वर्ल्ड कप जिंकला आहे. या विजेतेपदात रबाडाचे मोलाचे योगदान (Kagiso Rabada Birthday) होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये रबाडाने 25 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या. त्या स्पर्धेत सर्वात जास्त 14 विकेट्स देखील संयुक्तपणे रबाडाच्या नावावर आहेत.
6 वर्षांपूर्वीची धक्कादायक गोष्ट ठरली डीव्हिलियर्स परत न येण्याचं कारण
सनसनाटी पदार्पण
रबाडाला 2014 च्या अंडर 19 वर्ल्ड कपनंतर त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या मॅचमध्ये रबाडाने 3 ओव्हरमध्ये 27 रन दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. T20 ची कसर त्याने वन-डे क्रिकेटमधील पदार्पणात भरुन काढली.
बांगलादेश विरुद्ध ढाकामध्ये 2015 साली त्याने वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणात त्याने फक्त 16 रन देत 6 विकेट्स घेतल्या.वन-डे पदार्पणात कोणत्याही बॉलरनं आजवर केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पहिल्याच वन-डे मॅचमध्ये रबाडाने हॅट्ट्रिक देखील घेतली. वन-डे पदार्पणात हॅटट्रिक घेणारा तो क्रिकेट विश्वातील दुसरा बॉलर आहे.
धोनीविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये यश
कागिसो रबाडाच्या करियरला खऱ्या अर्थाने वळण 2015 साली कानपूरमध्ये झालेल्या वन-डे मॅचमध्ये मिळाले. त्या मॅचमध्ये भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 11 रन आवश्यक होते. समोर जगातील सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) होता. धोनीनं त्यापूर्वीच्या दोन ओव्हरमध्ये 20 रन काढले होते. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रन वाचवण्याची जबाबदारी कॅप्टन एबी डीव्हिलियर्सने (AB de Villiers) तेव्हा 20 वर्षांचा असलेल्या रबाडावर सोपवली.
धोनी सेट झाला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनी खेळत असताना टार्गेट कितीही असलं तरी धोनीपेक्षा बॉलरवर जास्त दबाव असण्याचा तो काळ होता. रबाडाला स्वत:च्या क्षमतेवर विश्वास होता. त्यामुळेच त्याच्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीममधून सीनियर टीममध्ये तो स्थिरावला होता. रबाडाने (Kagiso Rabada Birthday) डोकं शांत ठेवत धोनीला मोठे फटके मारु दिले नाहीत. अखेर धोनीला नीट पुल शॉट मारता आला नाही. त्यात तो आऊट झाला. रबाडाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ती मॅच 5 रननं जिंकली.
हाशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर डिपेंडेबल’!
आयपीएलमध्ये यशस्वी
रबाडा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा सदस्य आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या मागच्या दोन वर्षांच्या यशस्वी अभियानात रबाडाचे मोलाचे योगदान आहे. डेथ ओव्हर्समध्ये हमखास विकेट काढण्याची क्षमता रबाडाने दाखवली आहे. रबाडाने आयपीएल 2020 (IPL 2020) सर्वात जास्त 30 विकेट्स घेतल्या. यापैकी 28 विकेट्स या पॉवर प्ले नंतरच्या ओव्हर्समध्ये घेतल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत रबाडाने आजवर 63 मॅचमध्ये 8.26 च्या इकॉनॉमी रेटनं 99 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएस स्पर्धेत सर्वात कमी मॅचमध्ये 50 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील रबाडाच्या नावावर आहे. त्याने 27 मॅचमध्ये हा टप्पा पूर्ण केला आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये दबदबा
रबाडाने वन-डे आणि आयपीएल नाही तर टेस्ट क्रिकेटमध्येही दबदबा निर्माण केला आहे. त्याने 44 टेस्टमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. या कालावधीमध्ये रबाडाचा स्ट्राईक रेट (40.8) हा आजवर 200 टेस्ट विकेट्स घेणाऱ्या कोणत्याही बॉलरपेक्षा सर्वोत्तम आहे.
डेल स्टेन आणि एल्बी मॉर्केलनंतर दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलिंगची धुरा रबाडा (Kagiso Rabada Birthday) वाहत आहे. गेल्या 7 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणारा रबाडाकडून या दशकात देखील दक्षिण आफ्रिकेला मोठ्या अपेक्षा आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.