फोटो, ट्विटर, आयसीसी

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. तो अपयशाच्या पाच पायऱ्या (एक अंपायरच्या चुकीनं वाचली) चढला. सुरूवातीला मिळालेल्या शून्यातून विश्व निर्माण करणारी अनेक उदाहरण आहेत. त्यानं सुरूवातीला पाच शून्य पचवली. 0, 0, (दोन वर्ष बाहेर) 0, 1, (हा अंपायरनं लेग बाय दिला नाही म्हणून मिळाला आणि पुन्हा दोन वर्ष बाहेर), 0, 0 (पुन्हा तीन वर्ष बाहेर) अशी त्याची आंतरराष्ट्रीय टेस्ट कारकिर्दीची सुरूवात झाली. त्यातूनही तो परतला. त्यानं 6 डबल सेंच्युरी झळकावल्या. वन-डे क्रिकेटमध्ये स्थिरावला. तिथंही रन केले. टीमचा कॅप्टन बनला. निवृत्तीनंतर कोचही झाला. इच्छाशक्ती असली की कितीही अवघड परिस्थितीमध्येही कमबॅक करता येतं हे सिद्ध करणाऱ्या श्रीलंकेच्या मार्वन अट्टापट्टूचा आज वाढदिवस (Marvan Atapattu Birthday) आहे. आजच्याच दिवशी (22 नोव्हेंबर 1970) रोजी त्याचा जन्म झाला.

दुसरा रन काढण्यासाठी 7 वर्ष

अट्टापट्टूनं 1990 साली टीम इंडियाविरुद्ध चंदीगडमध्ये झालेल्या एकमेव टेस्टच्या सीरिजमध्ये पदार्पण केले. त्यामधील दोन्ही इनिंगमध्ये  ग्रॅहम गूच आणि सईद अन्वरचीही पहिल्या टेस्टमध्ये अशीच सुरूवात झाली होती. अट्टापट्नं तेवढ्यावरच थांबला नाही. पदार्पणातील अपयशानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं. तो दोन वर्ष स्थानिक क्रिकेट खेळून परतला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1992 साली कोलंबो टेस्टमध्ये तो खेळला. त्यानं त्या टेस्टमध्ये सुरुवात पुव्हा शून्यापासून केली. दुसऱ्या इनिंगमध्ये अंपायरनं नजरचुकीनं लेगबाय दिला नाही म्हणून त्याला एक रन मिळाला. या अपयशानंतर पुन्हा दोन वर्षे बाहेर. 1994 साली भारताविरुद्ध अहमदाबाद टेस्टमध्ये तीच गोष्ट. 0 आणि 0. त्यानंतर तीन वर्ष बाहेर. दुसरा कुणी असता तर त्यानं हार मानली असती. तो दुसरा कुणी नव्हता तर अट्टापटू होता. त्यामुळे तो टीममधून बाहेर गेल्यानंतरही स्थानिक क्रिकेटमध्ये परतला. तिथं जिद्दीनं खेळला. तीन वर्षांनी म्हणजे 1997 साली त्याला न्यूझीलंड विरुद्ध पुन्हा संधी मिळाली. त्यानं त्या टेस्टमध्ये 25 आणि 22 रन काढत शून्यचं चक्र तोडलं. 1990 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अट्टापट्टूला टेस्ट करिअरमधील दुसरा रन काढण्यासाठी तब्बल 7 वर्ष वाट पाहावी (Marvan Atapattu Birthday) लागली.

वटवृक्षाची सावली आधारवड होते तेंव्हा…

त्याच गावात पहिली सेंच्युरी

अट्टापट्टून ज्या चंदीगडमध्ये पदार्पण केले. पहिल्यांदा दोन शून्य मिळवली. त्याच चंदीगडमधील मोहालीच्या ग्राऊंडवर त्यानं भारताविरुद्ध पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. त्या सेंच्युरीनंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही. तो टीममध्ये स्थिरावला. 1998 च्या अखेरीस त्याच्या नावावर दोन डबल सेंच्युरी होत्या. पण त्या दोन्ही झिम्बाब्वे विरुद्ध असल्यानं तो फक्त कमकुवत टीम विरुद्ध खेळतो, अशी टीका त्याच्यावर झाली.

मोठ्या टीमना प्रसाद

अट्टापट्टूनं हा आरोप पाकिस्तान विरुद्ध 2000 साली झालेल्या कँडी टेस्टमध्ये खोडला. पावसाचा अडथळा आलेल्या त्या मॅचमध्ये अट्टापट्नं पाचही दिवस बॅटींग केली. वासिम अक्रम, वकार युनूस आणि मुश्ताक अहमद यांचा सामना करत त्यानं नाबाद 207 रन केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी इंग्लंड विरुद्ध गॉलमध्ये डबल सेंच्युरी झळकावत (Marvan Atapattu Birthday) अट्टापट्टूनं श्रीलंकेला टेस्ट जिंकून दिली.

अट्टापट्टूनं इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर 2002 साली झालेल्या टेस्टमध्ये 185 रनची खेळी करत श्रीलंकेला मोठा स्कोअर करून दिला. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध 2005 साली नेपियरमध्येही त्यानं सेंच्युरी झळकावत श्रीलंकेला टेस्ट ड्रॉ राखण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

जयसूर्याचा सहकारी

श्रीलंकेचा आक्रमक बॅटर सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि अट्टापटू हे दोघेही एकाच भागातले. अट्टापट्टू 13 वर्षांचा असल्यापासून तो जयसूर्याला ओळखत असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं अनेक वर्ष जयसूर्यासोबत श्रीलंकेची इनिंग ओपन केली. जयसूर्या कॅप्टन होता तेव्हा तो तीन वर्ष श्रीलंका टीमचा व्हाईस कॅप्टन होता.

जयसूर्या काही ओव्हर्समध्ये मॅचचं चित्र बदलत असे. त्यामुळे विरोधी टीमचा सर्व फोकस असे. त्याचा फायदा झाल्याचं अट्टापट्टू मान्य करतो. जयसूर्याच्या सावलीतही त्यानं स्वत:ची वाढ खूंटू दिली नाही.त्याची जागा तयार केली. वन-डे क्रिकेटमधील 11 सेंच्युरी आणि 59 हाफ सेंच्युरी हा त्याचा पुरावा (Marvan Atapattu Birthday) आहे.

इंग्लंड विरुद्ध 1998 साली लॉर्ड्सवर झालेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये त्यानं एक बाजू लावून धरत नाबाद 132 रन काढले आणि टीमला विजय मिळवून दिला. 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या. पण, त्यामध्ये तो फार फॉर्मात नव्हता. 2003  च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2003) अट्टापटू यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली. 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला वादग्रस्त पद्धतीनं टीमच्या बाहेर बसवलं.

फिक्सिंगचा आरोप, निवड समितीवर टीका

अट्टापट्टूच्या करिअरमध्ये 2003 मध्ये एक नाजूक वळण आलं होतं, इंग्लंड दौऱ्यात त्याच्या हॉटेलमधील रूममध्ये मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले. ICC नं या प्रकरणाची चौकशी करत अट्टापट्टूची (Marvan Atapattu Birthday) निर्दोष मुक्तता केली.

श्रीलंकेच्या निवड समितीशी त्याचे कधीच पटले नाही. तीन वर्ष व्हाईस कॅप्टनची जबाबदारी सांभाळल्यानंतर 2003 साली जयसूर्यानंतर तो कॅप्टन होईल असा सर्वांचा अंदाज होता. पण निवड समितीनं अनुभवी हसन तिलकरत्नेला कॅप्टन केलं. त्यानंतर वर्षभरात टीमची कामगिरी घसरली. त्यामुळे अट्टापटूकडं टीमची कॅप्टनसी दिली.

अट्टापट्टूनं कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. त्याच्या कॅप्टनसीमध्ये श्रीलंकेनं आशिया कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज मोठ्या फरकानं जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी झाली. पण, त्यानंतर लगेच पाकिस्तान विरुद्ध चांगली कामगिरी केली. सर्व घडी बसली आहे, असं वाटत असतानाच श्रीलंका सरकारनं नेमलेल्या निवड समितीच्या संचालकांनी टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका केली. टीम मॅनेजमेंट नव्या रक्ताला संधी देत नसल्याचा त्यांनी आरोप केला. या वादानंतर अट्टापट्टूला कॅप्टनसीवरुन जावं लागलं.

सर्वशक्तीमान व्यक्तीला आव्हान देणारा धाडसी क्रिकेटपटू

अट्टापट्टू त्यानंतर दुखापतीमुळे काही काळ टीमपासून दूर होता. पण 2006 साली तो पुन्हा परतला. त्यानंतर 2007 साली झालेल्या वर्ल्ड कपपूर्वी त्याला चामरा सिल्वाला संधी मिळावी म्हणून नेहमीच्या 5 व्या क्रमांकावर न खेळता ओपनिंगला खेळण्यास सांगण्यात आले. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या प्रॅक्टीस गेममध्येही तो ओपनिंगला खेळला. पण, त्याला वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आले नाही. त्यानंतर 2007 साली झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची टीममध्ये निवड झाली.

त्या दौऱ्यात त्यानं होबार्ट टेस्टमध्ये चांगली खेळी केल्यानंतर निवड समितीच्या सदस्यांवर ते जोकर असल्याची टीका केली. अट्टापटू (Marvan Atapattu Birthday) त्या सीरिजनंतर लगेच रिटायर झाला.

वर्ल्ड कप विजयाचा पाया रचणारा दशकातील सर्वात आक्रमक बॅट्समन

रिटायमेंटनंतरचे करिअर

अट्टापटू इंडियन क्रिकेट लीगमध्ये (ICL) खेळला. ICL मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवरील बंदी उठल्यानंतर त्यानं कोचिंगमध्ये करिअर सुरू केले. तो सिंगापूर आणि कॅनडा टीमचा कोच होता. 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर श्रीलंका क्रिकेट टीमचा बॅटींग कोच बनला. 2014 ते 2015 पर्यंत तो श्रीलंका टीमचा हेड कोच होता. 2015 साली टीम इंडिया विरुद्ध झालेल्या पराभवानंतर त्यानं ते पद सोडलं.

एखादं काम सुरू केल्यानंतर त्यात अपयश येणं स्वाभाविक आहे. एकदा नाही तर अनेकदा अपय़श येऊ शकतं. अट्टापटूनं तर 7 वर्ष अपयश सहन केलं. त्या अपयशानंतरही तो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी झाला. त्यानं 1500 हजार पेक्षा जास्त रन काढले. 27 सेंच्युरी त्यामध्ये 6 डबल सेंच्युरी झळकाल्या. 76 हाफ सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. टीमचा कॅप्टन, हेड कोच बनला. अपयशानं खचून न जाता आपल्या पॅशनचा पाठलाग करणाऱ्या आणि प्रचंड कष्टानं त्यामध्ये यशस्वी होणाऱ्या अट्टापटूची गोष्ट (Marvan Atapattu Birthday) म्हणूनच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: