फोटो – ट्विटर, आयसीसी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) विकेट घेणे ही त्याच्याबरोबर खेळलेल्या प्रत्येक बॉलरची सर्वोच्च इच्छा होती. त्यात सचिनचा बचाव भेदत त्याला बोल्ड करणे ही तर बॉलरसाठी आयुष्यभराची आठवण आहे. त्याने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोणताही अनुभव नसताना ही कामगिरी केली. आयपीएलपूर्वीच्या क्रिकेटमध्ये या कामगिरीमुळे तो एका रात्रीत स्टार झाला. 2 वर्ल्ड कप आणि आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या टीमचा सदस्य आणि आता अनुभवी लेग स्पिनर असलेल्या पीयुष चावलाचा आज वाढदिवस (Piyush Chawala Birthday) आहे. आजच्याच दिवशी (24 डिसेंबर 1988) रोजी चावलाचा जन्म झाला.

कशी मिळाली सचिनची विकेट?

ते वर्ष होते, 2005. तो आयपीएल स्पर्धेच्या पूर्वीचा काळ होता. त्या काळात चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय क्रिकेटमधील सर्व दिग्गज खेळत असत. त्या स्पर्धेतील एका मॅचमध्ये चावलानं गुगलीवर सचिनची दांडी उडवली. 16 वर्षाच्या पोरानं क्रिकेट विश्वातील सर्वात महान बॅटरला चकवणे हा सर्वांसाठीच धक्का होता. चावलाला आजही अनेकदा त्या विकेटचे रहस्य विचारले जाते.

चावलानं एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतचे रहस्य सांगितले आहे. ‘सचिनला बॉलिंग करण्याचं माझ्यावर कोणतंही दडपण नव्हतं. मी पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत होतो. त्यावेळी सचिनपेक्षा दूर लेग स्पिन करण्याचा माझा प्लॅन होता. पण, अचानक शेवटच्या क्षणी माझ्या मनात काय आलं माहिती नाही आणि मी नॉर्मल लेग स्पिन न टाकता Wrong un  टाकला आणि मला सचिनची विकेट मिळाली.’  असं रहस्य चावलाने सांगितले.

गरिबी, अपयश, ट्रोलिंगवर मात करत तयार झाला टीम इंडियाचा योद्धा क्रिकेटर

लवकर सुरूवात

वयाच्या 16 व्या वर्षी सचिनची दांडी उडवणाऱ्या पीयुष चावलानं (Piyush Chawala Birthday)  त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला लवकर सुरूवात केली. तो वयाच्या 15 व्या वर्षीच उत्तर प्रदेशच्या अंडर 19 आणि अंडर 22 टीमचा सदस्य होता. वयाच्या 16 व्या वर्षी तो चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळला. तर 17 व्या वर्षी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच रणजी सिझनमध्ये 35 विकेट्स आणि 224 रन करत उत्तर प्रदेशच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy)  विजयात त्याने मोलाचे योगदान दिले.

चावलाने श्रीलंकेत 2006 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये (Under 19 World Cup Final 2016) फक्त 8 रन देत त्याने 4 विकेट्स घेतल्या. त्याच वर्षी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चावलाने पदार्पण केले. त्यावेळी तो भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर नंतरचा सर्वात तरूण क्रिकेटपटू बनला.

चावलाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

चावलानं टीम इंडियाकडून 3 टेस्ट, 25 वन-डे आणि 4 टी20 इंटरनॅशनल खेळल्या आहेत. त्यामध्ये त्याने अनुक्रमे 7, 32 आणि 4 विकेट्स घेतल्यात. त्याच्यात बॅटींग करण्याची क्षमता असूनही ती आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी दिसलीच नाही. 2007 साली इंग्लंड विरुद्ध झालेली वन-डे सीरिज त्याने बॉलिंगच्या जोरावर गाजवली होती.

T20 वर्ल्ड कप 2007 आणि वन-डे वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये असलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये चावलाचा समावेश (Piyush Chawala Birthday) आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही 2012 नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.

IPL स्टार

चावलाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फार बहरली नसली तर त्याने आयपीएल स्पर्धा चांगलीच गाजवली. सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दमदार खेळ करणाऱ्या चावलाला कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 2014 साली खरेदी केले. केकेआरच्या टीममध्ये अनेक दिग्गज स्पिनर्स होते. या दिग्गज स्पिनर्सच्या गर्दीत त्याने स्वत:चे स्थान मिळवले.

आयपीएल इतिहासातील चौथ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर असलेल्या चावलाने 2014 ची फायनल बॅटने देखील गाजवली आहे. त्याने शेवटच्या क्षणी 5 बॉलमध्ये नाबाद 13 रनची खेळी करत केकेआरच्या आयपीएल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

T20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर मेडन टाकणारा एकमेव बॉलर

कोलकाता नाईट रायडर्सनंतर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)  या आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीमचं चावलाने (Piyush Chawala Birthday) प्रतिनिधित्व केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: