फोटो – विस्डेन, ट्विटर

भारतीय क्रिकेटची वॉल राहुल द्रविडची (Rahul Dravid) कारकिर्द उतरणीला लागल्यानंतर टेस्ट क्रिकेट टीममधील त्याच्या जागेवर कोण येणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने रन करणाऱ्या सौराष्ट्राच्या तंत्रशुद्ध बॅटरनं त्याचं उत्तर दिलं होतं. तो बॅटर म्हणजे चेतेश्वर पुजारा. पुजारा गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याची टेस्ट टीममधील जागा धोक्यात आली आहे. त्यानंतरही पुजाराचे गेल्या दशकभरातील टेस्ट टीममधील योगदान कधीही विसरता येणार नाही. त्याने गेल्या दशकात द्रविडचा वारसा भक्कमपणे सांभाळला आहे. ऑस्ट्रेलियातील दोन टेस्ट सीरिज विजयाचा शिल्पकार असलेल्या चेतेश्वर पुजाराचा आज वाढदिवस (Cheteshwar Pujara Birthday) आहे. आजच्याच दिवशी (25 जानेवारी 1988) रोजी पुजाराचा जन्म झाला.

टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीमधील 5 बेस्ट इनिंग कोणत्या आहेत ते पाहूया

5) 92 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, 2017

चेतेश्वर पुजाराच्या 18 सेंच्युरीमध्ये या इनिंगचा समावेश होत नाही. पण तरीही याचे शंभर नंबरी महत्त्व आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमधील पुण्यात झालेली पहिली टेस्ट टीम इंडियानं मोठ्या फरकानं गमावली होती. बंगळुरूत सीरिजमधील दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया 87 रनने पिछाडीवर होती.

टीम इंडियाला सीरिजमध्ये परत येण्यासाठी एका झुंजार खेळीची गरज होती. पुजारा दुसऱ्या इनिंगमध्ये ती खेळी (Cheteshwar Pujara Birthday) खेळला. त्याने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सोबत पार्टनरशिप करत टीम इंडियाला संकटात बाहेर काढले. पुजाराने ऑस्ट्रेलियन अटॅकला दमवत 221 बॉलमध्ये 92 रन काढले. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 274 रन काढले. त्यानंतर आर. अश्विनच्या (R. Ashwin) बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने ती टेस्ट जिंकली.

चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचा घाव सोसणारा पाया!

4) 77 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2021

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियामधील खेळाचा इतिहास लिहिताना पुजाराची ही खेळी कधीही टाळता येणार नाही. टीम इंडियाला चौथ्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी 407 रनचे टार्गेट होते. ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड हे तीन फास्ट बॉलर अक्षरश: आग ओकत होते.

पुजाराने त्यांची सर्व बॉलिंग शांतपणे खेळली. त्यांचे वार प्रसंगी अंगावर सहन केले. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) 97 रनच्या आक्रमक खेळीला भक्कम साथ दिली. अखेर तो 205 बॉलमध्ये 77 काढून आऊट झाला. त्यानं आऊट होण्यापूर्वी सिडनीतील पिचवर उभं राहता येते हे दाखवून दिले. पुजाराच्या या खेळीमुळेच हनुमा विहारी आणि आर. अश्विन जोडीला प्रेरणा मिळाली. त्यांनी संयमी खेळी करत सिडनी टेस्ट वाचवली.

3) 145* विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2015

पुजारा खराब फॉर्ममुळे टेस्ट टीममधून काही काळ बाहेर होता. श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या दोन टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली नाही. कोलंबोतील तिसऱ्या टेस्टमध्ये मुरली विजय जखमी झाल्यानं अखेर प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. विजयच्या जागी खेळत असल्याने पुजाराला ओपन करावे लागले.

टेस्टच्या पहिल्या दिवशी एका बाजूने विकेट पडत असताना पुजारा भक्कम उभा होता. टीम इंडियाची अवस्था 7 आऊट 180 अशी झाली होती. त्यावेळी त्याने अमित मिश्रा सोबत आठव्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप केली. ओपनिंगला आलेला पुजारा टीम इंडिया ऑल आऊट झाली, पण पुजारा नॉट आऊट (कॅरी द बॅट) राहिला. पुजाराच्या खेळीमुळे (Cheteshwar Pujara Birthday) टीम इंडियाने त्या इनिंगमध्ये 312 रन केले. सीरिजमधील ती शेवटची टेस्ट जिंकत टीम इंडियाने श्रीलंकेतील सीरिज 2-1 या फरकाने जिंकली.

‘आता तरी ‘या’ तिघांचं महत्व समजेल,’ सिडनी टेस्टनंतर गांगुलीनं टिकाकारांना सुनावलं!

2) 153 विरूद्ध दक्षिण आफ्रिका, 2013

दक्षिण आफ्रिकेतील पिचवर रन करणे हे किती आव्हानात्मक आहे, हे सर्वांनी नुकतेच पाहिले आहे. टीम इंडिया 2013 साली आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी यजमान टीममध्ये डेल स्टेन, मोर्ने मॉर्केल, फिनलँडर, जॅक कॅलिस आणि इम्रान ताहीर असे दिग्गज बॉलर होते. पुजाराने त्यांना जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दमदार पद्धतीने खेळून काढले.

विराट कोहलीनं (Virat Kohli) त्या टेस्टमध्ये 119 आणि 96 रन काढले. एबी डीव्हिलियर्स आणि ड्यूप्लेसीनं दुसऱ्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली. त्या सर्वांमध्ये टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पुजाराने 270 बॉल खेळत 21 फोरच्या मदतीने 153 रन काढले. भारतीय बॅटरनं दक्षिण आफ्रिकेत झळकावलेली ही एक अविस्मरणीय सेंच्युरी (Cheteshwar Pujara Birthday) आहे.

टीम इंडियाकडे आहे पुजाराचा पर्याय, राहुल द्रविड करणार का आग्रह?

1) 123 विरूद्ध ऑस्ट्रेलिया, अ‍ॅडलेड, 2018

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली टेस्ट अपवाद वगळता टीम इंडियाला नेहमीच जड गेली आहे. 2018 साली भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, त्यावेळी देखील परिस्थिती वेगळी नव्हती. या टेस्टच्या पहिल्या दिवशी केएल राहुल, मुरली विजय, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे चार अव्वल बॅटर झटपट आऊट झाल्याने टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 41 अशी झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा देखील चांगल्या सुरूवातीनंतर आऊट झाल्याने 5 आऊट 86 अशी नाजूक स्थिती झाली.

या सर्व पडझडीतही पुजारा पाय रोवून उभा होता. त्याने ऋषभ पंत (25) आणि आर. अश्विन (25) यांच्यासोबत काही महत्त्वाच्या पार्टनरशिप केल्या. स्टार्क, कमिन्स, हेजलवूड आणि लायन या ऑस्ट्रेलियन अटॅकचा हल्ला सहजपणे परतवला. पुजाराच्या 123 रनच्या इनिंगमध्ये सकरात्मक खेळीचा इंटेट होता. त्याने टीमला लढण्याचा स्कोर उभा करून दिला.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा टोन त्यामुळे सेट झाला. भारतीय टीमनं ती टेस्ट आणि पुढे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे पुजाराच्या टेस्ट करिअरमधील ही सर्वात खास इनिंग (Cheteshwar Pujara Birthday) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: