
वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे त्यांच्या बॉलिंगमधील वेगासाठी आणि क्रिकेटच्या मैदानातील धमाल मस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. वॉल्श आणि अॅम्ब्रोज या जोडीच्या अस्तानंतर वेस्ट इंडिज टीममधील फास्ट बॉलर्सचा वेग कमी झाला. वेस्ट इंडिजच्या पिचचं स्वरुप देखील बदललं. या नंतर ताशी 150 किलोमीटरच्या वेगानं बॉलिंग करत त्यानं वेस्ट इंडिज टीममध्ये जागा मिळवली. त्यानंतर तो क्रिकेट विश्वात त्याच्या खास सॅल्यूट सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटचा स्पीडस्टार असलेल्या शेल्डन कॉट्रेलचा आज वाढदिवस (Sheldon Cottrell Birthday) आहे. आजच्याच दिवशी (19 ऑगस्ट 1989) त्याचा जन्म झाला.
कॉट्रेलची सुरुवात
जमेकाचा 6 फूट 5 इंच उंचीचा कॉट्रेल क्रिकेटच्या मैदानात स्थिरावण्यापूर्वी सुरक्षा दलामध्ये काम करत होते. भारतीय टीम 2011 साली जमेकामध्ये वन-डे मॅच खेळण्यासाठी आली होती, त्यावेळी त्याच्याकडं स्टेडियमच्या परिसरातील सुरक्षेची जबाबदारी होती.
2012-13 च्या वेस्ट इंडिज क्रिकेटमधील सिझनमध्ये 17 विकेट्स घेत कॉट्रेल पहिल्यांदा प्रकाशात आला. त्यानंतर कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेचा पहिला सिझनही त्यानं गाजवला. बार्बोडस विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं त्याच्या वेगावर ड्वेन स्मिथ, जोनाथन कार्टर आणि शाकीब अल हसन यांना आऊट केले. त्या मॅचमध्ये त्यानं 20 रन देत 4 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे 2013 साली भारत दौऱ्यावर जाणाऱ्या वेस्ट इंडिज A टीममध्ये त्याची निवड झाली. पण कॉट्रेलनं दुखापतीमुळे या दौऱ्यातून माघार घेतली. पण, त्याच वर्षी कोलकातामध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये त्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या पदार्पणातील टेस्टमध्येही कॉट्रेलला फार कमाल करता आली नाही.
T20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर मेडन टाकणारा एकमेव बॉलर
वर्ल्ड कप टीममध्ये निवड
कॉट्रेलनं वन-डे आणि टी20 क्रिकेटमध्ये त्यानंतरच्या काळात प्रभावी कामगिरी केली. 2014 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज टीमचा तो सदस्य होता. पण, त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. 2015 च्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये एकही वन-डे न खेळता तो टीममध्ये होता. तिथंही त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर दुखापतींमुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागला.
दुखापतीनंतर कमबॅक
शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell Birthday) हे नाव गाजण्यास 2019 साली पुन्हा एकदा सुरुवात झाली. इंग्लंड विरुद्धच्या वन-डेमध्ये त्यानं 46 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. त्या मॅचमध्ये कॉट्रेल सात महिन्यानंतर वन-डे टीममध्ये कमबॅक करत होता. त्यानं जेसन रॉय, जॉने बेयरस्टो, इयन मॉर्गन आणि मोईन अली या इंग्लंडच्या आक्रमक बॅट्समन्सना आऊट करत वेस्ट इंडिजच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
2019 च्या वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup 2019) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलला झटपट आऊट केले. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथचा बाऊंड्री लाईनवर अफलातून कॅच घेतला. त्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धही कॉट्रेलनं प्रभावी बॉलिंग करत 4 विकेट्स घेतल्या. कॉट्रेलनं (Sheldon Cottrell Birthday) 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वात जास्त 12 विकेट्स घेतल्या.
सॅल्यूटचा अर्थ काय?
वेस्ट इंडिज क्रिकेट त्यांचा आनंद नेहमीच अगदी जोशात सेलिब्रेट करतात. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो यांच्या सेलिब्रेशनची स्टाईल प्रसिद्ध आहे. पण त्यांच्या या सेलिब्रेशनपेक्षा विकेट घेतल्यावर काही पावलं पुढे येत शेल्डन कॉट्रेल करत असलेल्या कडक सॅल्यूटची अनेकांना भुरळ पडली आहे. त्याच्या या सॅल्यूटचा अर्थही तितकाच खास आहे.
कॉट्रेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यापूर्वी जमेकाच्या सुरक्षा दलात नोकरी करत होता. त्याच्या बटालीयनच्या सहकाऱ्यांसाठी तो हे सॅल्यूट करतो. आपण क्रिकेट खेळण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी या सहकाऱ्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी कॉट्रेल विकेट घेतल्यानंतर कडक सॅल्यूट करत आनंद साजरा करतो.
आयपीएल प्रवास
आयपीएल 2020 च्या (IPL 2020) पूर्वी भारताविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये शेल्डन कॉट्रेलनं विराट कोहलीसह (Virat Kohli) प्रमुख भारतीय बॅट्समना त्रस्त केलं होतं. त्याचा फायदा त्याला आयपीएल लिलावात (IPL 2020 Auction) झाला. त्या लिलावात कॉट्रेलला खरेदी करण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगली होती. अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KIXP) त्याला साडे आठ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
यूएईमध्ये झालेली आयपीएल स्पर्धा कॉट्रेलसाठी त्रासदायक ठरली. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये (Rajasthan Royals vs Kings XI Punjab) राहुल तेवातियानं (Rahul Tewatia) कॉट्रेलला एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावले. तेवातियाच्या या धुलाईनंतर कॉट्रेलची लय बिघडली. त्या आयपीएल सिझननंतर कॉट्रेलला पंजाबच्या टीमनं वगळलं. मागील आयपीएल लिलावात (IPL 2021 Auction) त्याला कुणीही खरेदी केलं नाही.
फक्त 5 बॉलमध्ये झिरो नंबर 1 बनला हिरो नंबर 1
आयपीएलमधील अपयशानंतर कॉट्रेलनं पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या टीममध्ये कमबॅक केलं आहे. आता ज्या यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये तो अपयशी ठरला. त्याच यूएईमध्ये वेस्ट इंडिजच्या विजेतेपदाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कॉट्रेलला (Sheldon Cottrell Birthday) आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पार पाडावी लागणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.