वाढदिवस विशेष!

वाढदिवस स्पेशल : मुक्तछंदात बॅटींग करणारा क्रिकेटचा आनंदयात्री!

भारतातच नाही तर ऑस्ट्रेलिया ते पाकिस्तान आणि न्यूझीलंड ते दक्षिण आफ्रिका या क्रिकेटच्या वेगवेगळ्या पिचवर सेहवागनं त्याच्या स्टाईलनं बॅटींग करत मॅचची दिशा आणि दिवसाचा अजेंडा सेट केला.

वाढदिवस स्पेशल: टीम इंडियाला सर्वाधिक गरज असताना खेळलेला जिगरबाज!

गौतम या शब्दाचा एक अर्थ अंधार दूर करणारा असा आहे. गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटसाठी तेच केलं. अंधाऱ्या प्रवासात हातामध्ये टॉर्च घेऊन त्यानं भारतीय क्रिकेटला नेहमी प्रकाशात ठेवलं.

वाढदिवस स्पेशल : टीम इंडियाच्या Next Generation चा सुपरस्टार, भविष्यातील कॅप्टन

त्यानं रन काढले की ते फ्लूक आहेत किंवा बॉलर्स खराब होते. फिल्डिंग नीट लावली नाही, अशी लंगडी कारणं काहींनी दिली. आज ते सर्व आवाज बंद झाले आहेत.

वाढदिवस स्पेशल: दोन्ही पाय जायबंदी झाल्यानंतरही जिद्दीनं परत येऊन मैदान गाजवणारा क्रिकेटपटू!

वयाच्या 20 वर्षी क्रिकेटचं मैदान गाजवण्याच्या ऐवजी तो व्हिलचेअरवर होता. त्याचे दोन्ही पाय जायबंदी झाले होते. डॉक्टरांनाही तो क्रिकेट खेळेल याची खात्री नव्हती.

वाढदिवस स्पेशल : आक्रमक, सकारात्मक आणि खेळाला पुढे नेणारा क्रिकेटपटू!

फक्त आयपीएल स्पर्धाच नाही तर T20 क्रिकेट त्यानं एका रात्रीत पुढे नेलं. तो खेळाला पुढच्या लेव्हलला नेणारा खेळाडू होता.

वाढदिवस स्पेशल : टीम इंडियाचा न झालेला सुपरस्टार!

टीम इंडियाच्या एका अनलकी सुपरस्टारचा आज वाढदिवस आहे. त्याच्या करिअरमध्ये त्याचा तापट स्वभाव आणि राजकारण हे दोन मोठे अडथळे ठरले.

वाढदिवस स्पेशल : भारताचा बेस्ट आणि जगातील ‘ऑल टाईम ग्रेट’!

गेल्या 10 वर्षात टीम इंडियानं जगाला तीन मोठे क्रिकेटपटू दिले. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin).

वाढदिवस स्पेशल : आक्रमक, कल्पक आणि इंग्रजांना हवं ते देणारा कॅप्टन!

आयपीएलमुळे खेळाडूंचा फायदा होतो हे लक्षात येताच बोर्डाला धोरण बदलण्यास लावलं. जगभरातील खेळाडू गोळा करत इंग्लंड टीम तयार केली.

वाढदिवस स्पेशल : इंग्लंड क्रिकेटला नव्या युगात नेणारा मिस्टर 360!

सहजपणे गॅप शोधणे आणि मैदानाच्या सर्व बाजूला कल्पक फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला बटलर इंग्लंड क्रिकेटमध्ये मिस्टर 360 नावानंही ओळखला जातो.

वाढदिवस स्पेशल : टीम इंडियाचा पहिला अस्सल ‘फास्ट’ बॉलर!

आजही तो वन-डे क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा यशस्वी बॉलर असून 300 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव भारतीय फास्ट बॉलर आहे.

वाढदिवस स्पेशल : विकेट घेताच कडक सॅल्यूट ठोकणारा सोल्जर!

ताशी 150 किलोमीटरच्या वेगानं बॉलिंग करत त्यानं वेस्ट इंडिज टीममध्ये जागा मिळवली. त्यानंतर तो क्रिकेट विश्वात त्याच्या खास सॅल्यूट सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे.

वाढदिवस स्पेशल : टेस्ट क्रिकेटच्या काळातील T20 स्टार! एका खराब फटक्याची मोजली किंमत

एका ओव्हरमध्ये 6 फोर, वर्ल्ड कप विजयातील हिरो, चांगले कोच आणि खमके प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. टेस्ट क्रिकेटच्या काळातील ते T20 स्टार होते.

वाढदिवस स्पेशल: वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अंधारयुगातील दीपस्तंभ!

वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पडझडीत, लारा रिटायर झाल्यानंतर, खेळाडू आणि बोर्डाशी कराराचे वाद सुरू असताना प्रत्येक वेळी तो त्यांच्या टीमचा दीपस्तंभ होता

वाढदिवस स्पेशल : वादात अडकल्यानं करिअर भरकटलं, अन्यथा त्याच्यासारखा कुणीच नव्हता!

तो 21 व्या शतकातील वादग्रस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. वादामध्ये त्याची कारकिर्द भरकटली. भारताविरुद्ध केलेल्या झुंजार इनिंगसाठी तो नेहमी लक्षात राहील.

वाढदिवस स्पेशल : पाकिस्तानला 0 रनमध्ये 5 विकेट्सचा ‘प्रसाद’ देणारा बॉलर!

भारतीय बॉलर्सच्याअविस्मरणीय कामगिरीची यादी करायची असेल तर ती यादी उद्दाम आमिर सोहेलला (Aamir Sohail) बोल्ड करणाऱ्या व्यंकटेश प्रसादच्या (Venkatesh Prasad) बॉलशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

वाढदिवस स्पेशल: जागतिक क्रिकेटमधील पहिला फिल्डिंग सुपरस्टार!

जॉन्टी ऱ्होडसपूर्वी (Jonty Rhodes) देखील अनेक चांगले फिल्डर होते. पण ते फक्त फिल्डिंगसाठी कधीही लक्षात राहिले नाहीत.

वाढदिवस स्पेशल : खचलेल्या ऑस्ट्रेलियाला विजयाची बाराखडी शिकवणारा AB

ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा आणि चॅम्पियन क्रिकेटपटूंची पिढी घडवणारा क्रिकेटपटू म्हणून अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border Birthday) नेहमी सर्वांच्या लक्षात राहणार आहे.  

वाढदिवस स्पेशल: चोकर्स टीमला चॅम्पियन बनवणारा बॉलर!

मोठ्या स्पर्धेतील बाद फेरीत न्यूझीलंडचा चोकर्सचा रेकॉर्ड न्यूझीलंडला चॅम्पियन बनवणाऱ्या ट्रेंट बोल्टचा आज वाढदिवस (Trent Boult Birthday) आहे.

Fan Corner : सुनील गावसकरने नेहमी स्वत:ची आवड नाही तर टीमचे हित जपले – जयंत विद्वांस

माझ्यावर जबादारी आहे हे मनात असणं आणि तसं वागणं यात यात अंतर असतं. गावसकरांनी कायम स्वत:ची आवड नाही तर टीमचे हित जपले.

वाढदिवस स्पेशल: भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा आपला दादा!

आजच्याच दिवशी (8 जुलै 1972) सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) जन्म झाला. भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या इतका टोकाचा प्रवास खूप कमी क्रिकेटपटूंनी अनुभवला असेल.

VIDEO :’बाळाच्या जन्मावेळी माही सोबत नव्हता तेंव्हा काय वाटलं?’; साक्षीने सांगितली ‘मन की बात’

बाळाच्या जन्माच्या वेळी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) जवळ नव्हता, त्यावेळी आपल्याला काय वाटलं याबाबत धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) पहिल्यांदाच ‘मन की बात’ सांगितली आहे.

Fan Corner : धोनीच्या टेम्परामेन्टचा ICC फायनलमध्ये फायदा झाला – वैभव धर्माधिकारी

धोनीकडं (MS Dhoni) स्वत:चं तंत्र होतं, ते तंत्र त्याने कधी लपवलं नाही. त्याचबरोबर नवं तंत्र आत्मसात करण्याचा लवचिकपणा देखील त्याने दाखवला.

वाढदिवस स्पेशल : सर्वशक्तीमान व्यक्तीला आव्हान देणारा धाडसी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात दिग्गज व्यक्तीला आव्हान देणाऱ्या ओलोंगानं (Henry Olonga) नंतर त्याच्या देशाच्या महाबलाढ्य अध्यक्षांना आव्हान दिले.

वाढदिवस स्पेशल: वर्ल्ड कप विजयाचा पाया रचणारा दशकातील सर्वात आक्रमक बॅट्समन

जयसूर्या इतकी सातत्यपूर्ण आणि बॉलर्सचं खच्चीकरण करणारी फटकेबाजी कुणीही केली नाही. श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा पाया रचणाऱ्या जयसूर्याचा आज वाढदिवस (Sanath Jaysuriya Birthday) आहे.

वाढदिवस स्पेशल : ऑस्ट्रेलियाला Wahabism चा चटका देणारा फास्ट बॉलर

वहाब रियाझला (Wahab Riaz) उद्देशून शेन वॉटसनने स्लेजिंग केले होते. वहाबला वॉटसनची स्लेजिंग चांगलेच झोंबले. त्याने त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकवले

वाढदिवस स्पेशल: ‘साहेबी’ क्रिकेट संस्कृती बदलणारा ‘परदेसी बाबू’

साहेबी पोशाखात, साहेबी थाटात आणि स्वत:च्या धुंदीत रमणाऱ्या देशात केव्हिन पीटरसन (Kevin Pietesen) सर्वार्थाने ‘परदेसी बाबू’ होता.

वाढदिवस स्पेशल : हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला, मॅकग्राला भिडला आणि बोर्डाशी भांडला!

हॉस्पिटलमधून थेट मैदानात येऊन केलेली टोलेबाजी, किंवा टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टार्गेटचा पाठलाग तो कधी आव्हानाला घाबरला नाही.

वाढदिवस स्पेशल : क्रिकेट विश्वाने दुर्लक्ष केलेला बेस्ट ऑल राऊंडर!

तो त्या टीमचा मॅचविनर खेळाडू होता. इतकंच नाही तर त्याच्या टीमला एकमेव आयसीसी विजेतपद याच ऑल राऊंडरच्या सेंच्युरीमुळे मिळालं आहे.

वाढदिवस स्पेशल : भारतविरोधी विखार भरलेला क्रिकेटपटू कमी, गुंड जास्त

भारताचा द्वेष हेच ज्याच्या आयुष्याचे मुख्य भांडवल आहे, असा पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादचा आज वाढदिवस आहे (Javed Miandad Birhday) आहे.

वाढदिवस स्पेशल : T20 क्रिकेटमधील फास्ट सेंच्युरी, शून्यावर आऊट न होण्याचा रेकॉर्ड

“If it’s in the V, it’s in the tree and if it’s in the arc, it’s out of the park,” हा ज्याच्या बॅटींगचा मंत्र आहे, असा दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन डेव्हिड मिलरचा आज वाढदिवस (David Miller Birthday) आहे.

वाढदिवस स्पेशल : प्रचंड क्षमतेचा पण वादग्रस्त ऑल राऊंडर!

वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणामुळे त्याचं करियर भरकटलं. त्याच वादात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले. त्यामुळे त्याच्या करियरचे आणि क्रिकेटचेही मोठे नुकसान झाले.

वाढदिवस स्पेशल : क्रिकेटच्या मैदानातील बॉन्डला दुखापतींचा वेढा

तो 18 टेस्ट आणि 82 वन-डे अशा 100 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. पण या कालावधीमध्ये तो शंभर नंबरी सोनं असल्याचं सर्वांचं एकमत होतं.

वाढदिवस स्पेशल : दुर्लक्षित नायक ते ऑस्ट्रेलियातील अद्भुत विजयाचा हिरो

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. या अद्भुत विजयाचा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane Birthday) हाच खरा हिरो होता.

वाढदिवस स्पेशल : जिद्द, संघर्ष, गुणवत्तेची कमाल, वर्ल्ड कप व्हिलन बनला देशाचा हिरो!

बोथम आणि फ्लिंटॉफ यांनाही जे जमलं नाही ते इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्याचे काम बेन स्टोक्सने (Ben Stokes) केले.

वाढदिवस स्पेशल : स्विंगचा सुलतान ते फिक्सिंगचा संशयित!

फास्ट बॉलर्सच्या विश्वात वासिम अक्रम (Wasim Akram) हे नाव नेहमी आदराने घेतले जाते. अगदी साध्या वाटणाऱ्या बॉलिंग अ‍ॅक्शनच्या जोरावर वेगाने आणि वैविध्यपूर्ण बॉलिंग टाकण्याची त्याच्यात क्षमता होती.

वाढदिवस स्पेशल : शेवटपर्यंत लढणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा नेता

टीमला सर्वात गरज असताना खेळणारा आणि प्रतिस्पर्धी टीमला मॅच जिंकण्यापासून रोखणारा खेळाडू म्हणजे स्टीव्ह वॉ (Steve Waugh).

वाढदिवस स्पेशल : लेग स्पिनर म्हणून आला आणि रन मशीन बनला!

गेल्या 5 वर्षांपासून नियमित क्रिकेट पाहणाऱ्यांना स्मिथनं (Steve Smith) लेग स्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केलं होतं, हे सांगितल्यावर आश्चर्य वाटेल. पु

वाढदिवस स्पेशल : In-Out, In- Out! दिनेश कार्तिकच्या करियरची गोलाकार गोष्ट

श्रीलंकेत 2018 साली निदहास ट्रॉफीची फायनलमध्ये (Nidahas Trophy Final) फायनलमध्ये बांगलादेशच्या अक्षरश: तोंडात विजेतेपदाचा घास गेला होता.

वाढदिवस स्पेशल : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची धुलाई, धोनीचा खास मित्र आणि मिस्टर क्रिकेट!

वयाच्या तिशीमध्ये पदार्पण करुनही सातत्यपूर्ण खेळाचा ठसा उमटवलेला ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन माईक हसीचा आज वाढदिवस (Mike Hussey Birthday) आहे.

वाढदिवस स्पेशल : खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’

खेळाडू आणि कोच म्हणून अनेकदा टीका सहन करणाऱ्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नावावर काही अद्भुत रेकॉर्ड आहेत.

वाढदिवस स्पेशल: T20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर मेडन टाकणारा एकमेव बॉलर

सुपर ओव्हर मेडन टाकावी हे प्रत्येक बॉलरचे स्वप्न असते. आजवरच्या T20 च्या इतिहासात ही कामगिरी करणे फक्त एका बॉलरला जमले आहे. त्या बॉलरचा म्हणजेच सुनील नरीनचा आज वाढदिवस (Sunile Narine Birthday) आहे.

वाढदिवस स्पेशल : खेळला की नियम मोडतो, बोलला की ट्रोल होतो!

गेल्या 11 वर्षात त्याच्या नावावर 11 प्रमुख वाद आहेत. तो खेळला की वाद होतो आणि इंग्रजी बोलला की ट्रोल होतो, असा त्याचा क्रिकेट विश्वात लौकिक आहे,

वाढदिवस स्पेशल : पहिल्या मॅचमध्ये हॅटट्रिक, शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीची विकेट आणि वर्ल्ड कप विजेतेपद

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पूर्ण भरात असताना त्याने धोनीला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रन काढू दिले नव्हते.

वाढदिवस स्पेशल : तीन्ही फॉरमॅटमध्ये मैदानावर जांभई देणारा क्रिकेटपटू

तीन्ही फॉरमॅटच्या क्रिकेटमध्ये मॅच सुरु असताना मैदानात जांभई देणारा क्रिकेटपटू म्हणून तो ओळखला जातो.

वाढदिवस स्पेशल: सर्वात तरुण कॅप्टनच्या करियरचा गेला राजकारणामुळे बळी!

तैबूला (Tatenda Taibu) त्याच्या करियरमध्ये स्थिर होण्याची संधी फार कमी मिळाली. त्यानं वयाच्या 17 व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

वाढदिवस स्पेशल : गुन्हेगारी दलदलीतून तयार झाला चॅम्पियन पोलार्ड

वेस्ट इंडिजच्या (West Indies) मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य सदस्य असलेल्या कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस

वाढदिवस स्पेशल : फिनिशर शब्दाची क्रिकेटला ओळख करुन देणारा मायकल बेव्हन

वन-डे क्रिकेटला फिनिशर या शब्दाची खऱ्या अर्थानं ओळख करुन देणारा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मायकल बेव्हन (Michael Bevan).

Fan Corner : रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं, आपण जास्त मॅच जिंकू – अक्षय देशमुख

‘रोहित शर्माकडं (Rohit Sharma) कोणताही बॉल खेळण्यासाठी एक सेकंद जास्त असतो,’ असं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

वाढदिवस स्पेशल : एकाच वर्षी 5 T20 विजेतेपद पटकावणारा चॅम्पियन!

वेस्ट इंडिजचा (West Indies) ऑल राऊंडर आणि कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) लाईफलाईन असलेल्या आंद्रे रसेलचा आज वाढदिवस (Andre Russell Birthday) आहे.

Fan Corner: सचिनच्या सगळ्या खेळ्या म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचे टप्पे – हेरंब ओक

24 एप्रिल या तारखेचं महत्त्व क्रिकेट फॅन्सना सांगण्याची गरज नाही. त्या दिवशी सर्वच क्रिकेट फॅन ( विशेषत: भारतीय) देवाचे आभार मानतात.

वाढदिवस स्पेशल: वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय

वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी त्याला दोन वर्ष थांबावं लागलं. पण पहिल्याच वन-डेमध्ये त्यानं सेंच्युरी झळकवत या फॉरमॅटसाठी देखील योग्य असल्याचं दाखवून दिलं.

वाढदिवस स्पेशल : ब्रॅडमन, गावसकर आणि सचिनला जमलं नाही ते वेंगसरकरांनी केलं!

डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर या ‘ऑल टाईम ग्रेटेस्ट’ बॅट्समन्सना जे जमलं नाही ते वेंगसरकर यांनी केलं आहे.

वाढदिवस स्पेशल : पहिल्या बॉलपासून जिंकण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन!

ऑस्ट्रेलियानं भारतामध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली त्याचा हिरोत्या सीरिजचा हिरो होता मायकल क्लार्क (Michael Clarke)

वाढदिवस स्पेशल : गावसकर, सेहवाग नंतरचा यशस्वी भारतीय ओपनर!

सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर ओपनर म्हणून भारताकडून सर्वात जास्त सेंच्युरी झळकावणाऱ्या मुरली विजय याचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (1 एप्रिल 1984) रोजी विजयचा जन्म झाला.

वाढदिवस स्पेशल : साहेबांना वर्ल्ड कप जिंकून देणारा कामगार!

क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडनं अखेर 2019 साली अनेक वळणांचा प्रवास पार केल्यानंतर पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2019) जिंकला

वाढदिवस स्पेशल : ICC ट्रॉफी जिंकणारा न्यूझीलंडचा एकमेव कॅप्टन!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिकेची (South Africa) टीम ही चोकर्स म्हणून ओळखली जाते. दक्षिण आफ्रिकेसारखीच चोकर्सची मोठी परंपरा ही न्यूझीलंडला देखील आहे.

वाढदिवस स्पेशल : हाशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर डिपेंडेबल’!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि भरवशाचा बॅट्समन हाशिम अमलाचा (Hashim Amla) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (31 मार्च 1983) रोजी अमलाचा जन्म झाला.

वाढदिवस स्पेशल : इम्रान ताहीरने पाकिस्तान का सोडले?

पाकिस्तानात वाढलेला, पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा सदस्य असलेला इम्रान दक्षिण आफ्रिकन कसा झाला याची गोष्ट मोठी मनोरंजक आहे.

वाढदिवस स्पेशल : वटवृक्षाची सावली आधारवड होते तेंव्हा…

11 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आणि तेंव्हा 32 वर्षांच्या असलेल्या त्या स्पिनरकडून फार कुणालाही अपेक्षा नव्हत्या. त्यानंतरच्या आठ वर्षातील 70 टेस्टमध्ये 359 विकेट्स त्याने घेतल्या.

वाढदिवस स्पेशल : व्हिव रिचर्ड्सना मैदानात खुन्नस देणारा क्रिकेटपटू

वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हीव रिचर्ड्स (Viv Richards) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदराने घेतलं जातं. रिचर्ड्स यांना भर मैदानात खुन्नस देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस.

वाढदिवस स्पेशल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी ते गुजरातचा गौरव!

सतराव्या वर्षी पदार्पण केलेल्या पार्थिवने (Parthiv Patel) गुजरातला (Gujrat) ऐतिहासिक रणजी विजेतपद जिंकून देण्यात मोठी कामगिरी बजावली.

वाढदिवस स्पेशल : शोएब अख्तरचे करियर संपवणारा बॅट्समन!

पाकिस्तानच्या फास्ट बॉलरपैकी एक असलेल्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) क्रिकेट कारकीर्द ज्यानं संपवली त्या बॅट्समनचा आज वाढदिवस आहे.

वाढदिवस विशेष : जेंव्हा शेन वॉर्न त्याला म्हणाला, ‘मी तुझी दहा महिने वाट पाहत होतो’

शेन वॉर्न त्यावेळी त्याला ‘मी तुला बॉलिंग करण्यासाठी दहा महिन्यापासून वाट पाहत आहे,’ असा टोमणा मारला.

वाढदिवस विशेष : पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमचं कट्टर इस्लामीकरण करण्यासाठी इंझमान उल हक (Inzamam-ul-Haq) याला जबाबदार मानलं जातं.

वाढदिवस स्पेशल : युवराज सिंहसारखी कामगिरी दोनदा करणारा पुणेरी पोरगा!

युवराज सिंहनं एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला होता. युवराजसारखी कामगिरी दोनदा करणाऱ्या पुणेरी पोराचा आज वाढदिवस आहे.

वाढदिवस स्पेशल: रिटायरमेंट का किंग कौन?- शाहिद आफ्रिदी!

जॉर्ज बुश, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प या तीन अमेरिकन अध्यक्षांशी शाहिद आफ्रिदीचं (Shahid Afridi) खास नातं आहे. या तीन्ही अध्यक्षांच्या काळात शाहिद आफ्रिदीनं रिटायरमेंट जाहीर केली आहे.

वाढदिवस स्पेशल : दारुच्या नशेत झिंगला आणि ऑस्ट्रेलियाला तिंबला!

इतिहास घडवण्यासाठी नवं काही तरी करण्याची झिंग मनावर असावी लागते’ असं म्हणतात त्यानं शब्दश: झिंगून नवा इतिहास घडवला.

वाढदिवस स्पेशल : फक्त 44 बॉलमध्ये 149 रन! डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन?

डीव्हिलियर्सचे सर्व रेकॉर्ड, सिक्स, फोर विसरा… फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तो त्या दिवशी 39 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला होता. त्यामुळेच त्याची ती खेळी पाहून डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन? (Human or Alien) असा अनेकांना प्रश्न पडला होता.

वाढदिवस स्पेशल : राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा!

अंडर 13 पासून सातत्यानं रन बनवणाऱ्या मुलाला सेलिब्रेशन हे फक्त क्रिकेटच्या मैदानावर करायचं असतं इतकंच माहिती होतं.

वाढदिवस स्पेशल : गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दलच्या ‘या’ 7 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक स्टायलिश बॅट्समनपैकी एक असलेले गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांचा आज वाढदिवस.

वाढदिवस स्पेशल : अचूकतेचं दुसरं नाव, ग्लेन मॅकग्रा!

मॅकग्राच्या निवृत्तीला एक तप उलटले असले तरी त्याच्या बॉलिंगचा प्रभाव आजही कायम आहे. बॉलिंगची अचूकता मोजण्याची तो फुटपट्टी आहे.

वाढदिवस स्पेशल : भुवनेश्वर कुमार, स्विंगच्या राजाला दुखापतींचा शह!

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट करणारा पहिला बॉलर बनण्याचा विक्रमही भुवनेश्वरच्या नावावर आहे.

वाढदिवस स्पेशल : जेंव्हा जडेजानं केली होती पाकिस्तानची धुलाई! VIDEO

1990 च्या दशकातील टीम इंडियामध्ये उपयुक्त बॅटिंग आणि चपळ फिल्डिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अजय जडेजाचा (Ajay Jadeja) आज वाढदिवस.

वाढदिवस स्पेशल : चार दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ‘एकलकोंडा आणि अलिप्त’

गेल्या 21 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असूनही शोएब मलिकच्या (Shoaib Malik) खात्यात जमेच्या बाजू खूप कमी आहेत.

वाढदिवस स्पेशल :ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’

क्रिकेटचे बेसिक घट्ट असेल तरी उत्तम स्ट्राईक रेटनं रन्स काढता येतात आणि टीमला मॅच जिंकून देता येते हे दाखवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) आज वाढदिवस.

वाढदिवस स्पेशल : मॅकग्राची उंची, ब्रेट ली चा वेग आणि अक्रमचा स्विंग!

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सच्या मांदियाळीत एका डावखुऱ्या बॉलरचं नाव गेल्या दहा वर्षाँपासून सतत गाजतंय.

वाढदिवस स्पेशल : विजय शंकर, ‘ऑलराऊंडर इन वेटिंग’

टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकरचा (Vijay Shankar) आज वाढदिवस. 26 जानेवारी 1991 रोजी विजयचा जन्म झाला. विजयच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण आहे.

वाढदिवस स्पेशल : चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचे घाव सोसणारा पाया!

T20 क्रिकेटच्या फास्ट फुड युगात टेस्ट क्रिकेटचं सात्विकता जपणारा बॅट्समन म्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara). पुजाराचा आज वाढदिवस.

error: