
विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये विराटनं सातत्यानं रन केले आहेत. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेच्या (IPL) इतिहासात देखील तो सर्वात जास्त रन काढणारा बॅट्समन आहे. विराट कोहलीला आऊट करणे हे आयपीएलमधील प्रत्येक टीमचं पहिले लक्ष्य असते. विराटची आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा विकेट घेण्याचा विक्रम असलेल्या संदीप शर्माच्या आज वाढदिवस (Sandeep Sharma Birthday) आहे. आजच्याच दिवशी (18 मे 1993) रोजी संदीपचा जन्म झाला.
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये कमाल
संदीपला शाळेत असताना बॅट्समन व्हायचं होतं. तो कोचच्या सल्ल्यानंतर फास्ट बॉलर बनला. संदीप 2010 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप टीमचा सदस्य होता. त्यानंतर दोन वर्षांनी 2012 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये देखील तो पुन्हा खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये संदीपनं 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त 12 विकेट्स घेऊन संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होता.
आयपीएलमध्ये एन्ट्री
संदीपला 2013 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं करारबद्ध केलं. संदीप शर्माच्या बॉलिंगमध्ये वेग नसला तरी मैदानाच्या दोन्ही दिशेला स्विंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आयपीएलच्या पॉवर प्लेमध्ये त्यानं सातत्यानं चांगली बॉलिंग केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पहिल्या सिझनमध्ये संदीपनं 4 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 2014 आणि 15 मध्ये अनुक्रमे 18 आणि 13 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर संदीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे 2015 साली झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची टीम इंडियात निवड झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
संदीपला झिम्बाब्वे विरुद्ध 2 T20 मॅचमध्ये संधी मिळाली. त्याचा फायदा उठवण्यात त्याला अपयश आलं. त्या 2 मॅचमध्ये त्याला फक्त 1 विकेट मिळाली. त्या दौऱ्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियात आजवर कधीही संधी मिळालेली नाही. T20 क्रिकेटसाठी त्याची बॉलिंग उपयुक्त आहे, तरीही निवड समितीनं त्याचा कधी विचार केला नाही. निवड समितीनं दुर्लक्ष करुनही संदीप त्याचं काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद ‘ते शेवटपर्यंत लढले’
विराट कोहली विरुद्ध यश
संदीप शर्माला (Sandeep Sharma Birthday) टीम इंडियासाठी डावलण्यात आलं. पण टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली विरुद्ध तो सर्वात जास्त यशस्वी ठरला आहे. संदीपनं आजवर विराटला 13 मॅचमध्ये 7 वेळा आऊट केलं. विराट कोहली कोणत्याही बॉलरला सहज विकेट देत नाही. त्याला बॉलरनं एकदा चकवलं तर तो दुसऱ्यांदा अधिक अभ्यास करुन त्याच्या विरुद्ध खेळ करतो. पण संदीपची मिस्ट्री सोडवण्यात त्याला अपयश आलंय.
‘पॉवर प्ले’ चा बुमराह
आयपीएलपर्यंतचा विचार केला तर संदीप शर्मा (Sandeep Sharma Birthday) आणि जसप्रीत बुमराहचा (Jaspreet Bumrah) रेकॉर्ड हा जवळपास सारखा आहे. याबाबत पटकन कुणाला विश्वास बसणार नाही. संदीपला 2021 च्या आयपीएलमध्ये फारशी संधी मिळाली नाही. संदीप शर्मानं आजवर 95 आयपीएल मॅचमध्ये 110 विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहनं 99 आयपीएल मॅचमध्ये 115 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहाचा आयपीएलमधील आजवरचा इकॉनॉमी रेट हा 7.39 आहे. तर संदीपचा 7.79 आहे. संदीपचा स्ट्राईक रेट हा 19. 27 तर बुमराहाच स्ट्राईक रेट हा 19.60 आहे.
मॅच | विकेट्स | इकोनॉमी रेट | स्ट्राईक रेट | |
संदीप शर्मा | 95 | 110 | 7.79 | 19.27 |
जसप्रीत बुमराह | 99 | 115 | 7.39 | 19.60 |
जसप्रीत बुमराहाचा आयपीएलमधील सर्वोत्तम खेळ हा डेथ ओव्हर्समध्ये असतो. डेथ ओव्हर्समध्ये विकेट्स घेऊन प्रतिस्पर्धी टीमला रोखण्याचं काम बुमराह करतो. तर संदीप पॉवर प्ले मध्ये प्रतिस्पर्धी टीमला हादरे देतो. आयपीएल इतिहासात पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त विकेट्स त्यानं घेतल्या आहेत. संदीपच्या 109 आयपीएल विकेट्सपैकी 63 विकेट्स या ओपनिंग किंवा नंबर 3 च्या बॅट्समनच्या आहेत.
‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’
विराट कोहलीला 7 वेळा, रोहित शर्मा आणि ख्रिस गेलला संदीपनं प्रत्येकी 4 वेळा आऊट केलं आहे. T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ग्रेट बॅट्समन असलेल्या गेलची संदीप विरुद्धची सरासरी फक्त 10.25 आहे. त्यामुळे हमखास विकेट घेण्याचं जे काम बुमराह डेथ ओव्हरमध्ये करतो, तेच काम संदीप ‘पॉवर प्ले’ मध्ये करत आला आहे. संदीप शर्मा (Sandeep Sharma Birthday) हा एक प्रकारे ‘पॉवर प्ले’मधील बुमराह आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.