
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2021) कोरोनामुळे स्थगित झाल्यानंतर आता आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आलं आहे. या स्पर्धेतील मॅचच्या दरम्यान दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये दोन सट्टेबाज घुसले होते. त्याचबरोबर एक सट्टेबाज क्लिनर म्हणून त्या मैदानात शिरला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता आयपीएलवर बेटींगचे ढग (Fixing in IPL 2021?) जमा झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
दिल्लीमध्ये 2 मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) या मॅचच्या दरम्यान मैदानात घुसलेल्या दोन सट्टेबाज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही बनावट मान्यतापत्र (Accreditation) घेऊन मॅचदरम्यान घुसले होते. त्यांची आता पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
पिच साईडिंगचा प्रकार उघड
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील फिरोजशाहा कोटला स्टेडियममधील एक क्लिनर म्हणून काम करणारा व्यक्ती बेकायदेशीर पद्धतीनं पिच साइडिंग करताना (Fixing in IPL 2021?) आढळला होता.
पिच साइडिंग म्हणजे लाईव्ह कव्हरेज आणि प्रत्यक्ष मॅच यामध्ये जे अंतर असतं याचा फायदा घेऊन प्रत्येक बॉलची माहिती सट्टेबाजांना देणे. वास्तविक मैदानात टाकलेला बॉल टीव्हीवर दिसतो त्यावेळी त्यामध्ये काही सेकंदाचे अंतर असते. सट्टेबाज त्या काही सेकंदांचं लाईव्ह अपडेट घेऊन त्यांचा धंदा करतात. जगभरातील सट्टेबाज या पिच साईडिंगच्या माध्यमातून कमाई करत असतात.
IPL 2021 स्थगित झाल्यानं BCCI चं हजारो कोटींच नुकसान, टीमनाही मोठा आर्थिक फटका
खंडवावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टीममधील अधिकाऱ्यानं एका संशयित व्यक्तीला पकडले होते. ती व्यक्ती मोबाईलवरुन संभाषण करत होती. ‘आपण गर्लफ्रेंडशी बोलत होतो’ असा दावा त्या व्यक्तीनं सुरुवातीला केला. त्यानंतर आपण पकडले जाणार हे लक्षात येताच ती व्यक्ती तिथून पळून गेली. त्या व्यक्तीचे 2 मोबाईल भ्रष्टाचार विरोधी पथकाला सापडले आहेत. त्याची माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे. या फरार व्यक्तीचा शोध सध्या सुरु असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास खंडवावाला यांनी व्यक्त केला आहे.
या आयपीएल सिझनमध्ये फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये 5 मॅच झाल्या. यापैकी कोणत्या मॅचमध्ये पिच साईडिंगचा (Fixing in IPL 2021?) प्रकार झाला, याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र यामुळे बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो-बबलवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.