फोटो- ट्विटर

कोणत्याही खेळाडूची क्षमता ही तो मोठ्या मॅचमध्ये निर्णायक क्षणी खेळ कसा करतो यावर होत असते. वेस्ट इंडिजमध्ये सध्या अंडर-19 वर्ल्ड कप सुरू आहे. या वयोगटातील सर्व खेळाडूंसाठी ही सर्वोच्च स्पर्धा आहे. याच स्पर्धेतून उद्याचे सुपरस्टार क्रिकेट विश्वाला मिळणार आहेत. या परीक्षेतील एका खडतर पेपरमध्ये मराठवाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा राजवर्धन हंगरगेकर चांगल्या मार्कसह पास झाला आहे.  आयर्लंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (India U19 vs Ireland U19) प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये राजवर्धनला बॅटींगमध्ये प्रमोशन देण्यात आले होते. त्यामध्ये त्याने फक्त 6 बॉलमध्ये 34 रन करत (Rajvardhan 5 Six) मैदान गाजवले.

अचानक मोठी जबाबदारी

राजवर्धनननं पहिल्या मॅचमध्ये त्याच्या फास्ट बॉलिंगच्या स्पेलनं दक्षिण आफ्रिकन बॉलर्सची परीक्षा घेतली होती. आयर्लंड विरुद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियावर कोरोना हल्ला झाला. कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) आणि व्हाईस कॅप्टन एसके रशिदसह 6 प्रमुख खेळाडू कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे टीमला उपलब्ध सर्व 11 खेळाडूंसह मैदानात उतरावे लागले.

हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी टीम इंडियाला भक्कम सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 164 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतरही यश आणि रशिद यांच्या अनुपस्थितीचा परिणाम टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर होण्याची शक्यता होती. त्या परिस्थितीमध्ये एरवी 8 किंवा त्यापेक्षा खाली बॅटींगला येणाऱ्या राजवर्धनला 5 व्या क्रमांकावर प्रमोशन देण्यात आले.

कोरोनामुळे वडील गेले, पण जिद्द नाही… तुळजापूरच्या पोरावर जग जिंकण्याची जबाबदारी

6 बॉलमध्ये 34 रन!

राजवर्धन 46 व्या ओव्हरमध्ये बॅटींगसाठी आला. त्याच्यात फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, हे त्याने अंडर–19 आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये दाखवून दिले होते. आयर्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये वर्ल्ड कप या सर्वोच्च स्पर्धेत त्याने ही क्षमता पुन्हा एकदा दाखवली.

राजवर्धननं लेफ्ट आर्म स्पिनर नॅथनच्या 49 व्या ओव्हरमध्ये 2 सिक्स लगावले. त्यानंतर मुजमिल शेरजाद हा मध्यमगती फास्ट बॉलर शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला. त्यावेळी त्यानं त्याच्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स लगावत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

राजवर्धननं आयर्लंड विरुद्ध फक्त 17 बॉलमध्ये 229.41 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 39 रन केले. या खेळीत त्याने 1 फोर आणि तब्बल 5 सिक्स (Rajvardhan 5 Six) लगावले. याचाच अर्थ त्याने फक्त 6 बॉलमध्ये नाबाद 34 रन केले.

IPL मध्ये लॉटरी

राजवर्धनने शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियानं आयर्लंड विरुद्ध 300 रनचा टप्पा ओलांडला. त्यानंतर त्याने बॉलिंगमध्येही कमाल केली. त्याने 7 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देत 1 विकेट घेतली. टीम इंडियाच्या 174 रनच्या विजयात राजवर्धनचा मोठा वाटा आहे. राजवर्धन तुळजापूरचा आहे. वयाच्या 18 व्या वर्षीच त्याने महाराष्ट्राच्या T20 टीममध्ये पदार्पण केले आहे. फास्ट बॉलर आणि हिटर ही त्याची क्षमता (Rajvardhan 5 Six) T20 क्रिकेटसाठी मोठी उपयुक्त आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याला मोठी लॉटरी लागू शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

      

error: