फोटो – ट्विटर, आयसीसी

इंग्लंडसमोर नॉटिंघम टेस्टच्या शेवटच्या दिवशी 72 ओव्हर्समध्ये 299 रनचं आव्हान होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमसाठी हे अवघड आव्हान आहे. त्यातच गेली दोन वर्ष नियमितपणे इंग्लंडची बॅटींग सांभाळणारा जो रूट (Joe Root)  आऊट झाल्यानंतर इंग्लंड मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार असाच सर्वांचा अंदाज होता. त्यावेळी जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील एक अभूतपूर्व इनिंग खेळली. बेअरस्टोच्या वादळी शतकानं (Bairstow Fast Hundred) इंग्लंडनं फक्त 50 ओव्हर्समध्ये 299 रन पूर्ण केले. त्याचबरोबर तीन टेस्टच्या सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

बेअरस्टोनं काय केलं?

काही ओव्हर्समध्ये मॅचचं चित्र बदलण्याचे प्रसंग लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये नियमित घडतात. टेस्ट क्रिकेटमध्ये एखाद्या बॉलरचा स्पेल हे काम करतो. बेअरस्टोनं फक्त 3 ओव्हर्समध्ये बॅटच्या जोरावर टेस्टचं चित्र बदललं. पाचव्या दिवशी दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडची अवस्था 4 आऊट 93 अशी झाली होती. बेअरस्टो आणि कॅप्टन बेन स्टोक्स (Ben Stokes) ही स्पेशालिस्ट बॅटर्सची शेवटची जोडी मैदानात होती. त्यावेळी नॉटिंघम टेस्ट न्यूझीलंडच्या टप्प्यात होती.

बेअरस्टो- स्टोक्स जोडीनं टी टाईमपर्यंत अधिक पडझड होऊ न देता इंग्लंडला 139 पर्यंत नेले. बेअरस्टो तेव्हा 48 बॉलमध्ये 43 रनवर खेळत होता. टी टाईमनंतर मॅट हेन्रीला सलग दोन फोर आणि ट्रेन्ट बोल्टला सिक्स लगावत बेअरस्टोनं त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर पुढच्या 3 ओव्हर्समध्ये 4 सिक्स आणि 3 फोर लगावत तो थेट 90 वर पोहचला. नव्वदीमध्येही बेअरस्टोचा वेग मंदावला नाही. त्यानं टीम साऊदीच्या बॉलवर 3 रन करत 77 बॉलमध्ये टेस्ट करिअरमधील त्याची नववी सेंच्युरी (Bairstow Fast Hundred) पूर्ण केली.

बेअरस्टोनं 92 बॉलमध्ये 14 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीनं 136 रन केले. या खेळीत त्यानं 14 फोर आणि 7 सिक्स लगावले. स्टोक्ससोबत पाचव्या विकेट्ससाठी 179 रनची पार्टनरशिप करत त्यानं इंग्लंडचा विजय सोपा केला. ट्रेन्ट बोल्टनं त्याला आऊट केलं, त्यावेळी इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता बाकी होती.

स्टोक्सनं विकेट किपर बेन फोक्सच्या मदतीनं ही औपचारिकता पूर्ण केली. यावेळी स्टोक्सनं बेअरस्टोला साथ देत असतानाच काही चांगले फटकेही लगावले. त्यानंही 70 बॉलमध्ये नाबाद 75 रन केले.

120 वर्षांचा रेकॉर्ड वाचला

बेअरस्टोनं त्याच्या 92 बॉलच्या इनिंगच्या दरम्यान 77 बॉलमध्ये सेंच्युरी (Bairstow Fast Hundred) पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील इंग्लंडकडून ही दुसरी वेगवान सेंच्युरी आहे. यापूर्वी 1902 साली गिलबर्ट जेसोपनं इंग्लंडकडून 76 बॉलमध्ये सेंच्युरी केली. 120 वर्षांचा हा रेकॉर्ड फक्त 1 बॉलनं वाचला.

इंग्लंड क्रिकेटला नव्या युगात नेणारा मिस्टर 360!

व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading