टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा सिक्स लगावण्यात हातखंडा आहे. रोहितनं आंतराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आजवर 127 सिक्स मारले आहेत. T20I मध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याच्यापेक्षा फक्त न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील (Martin Guptill) पुढे आहे. इंग्लंड विरुद्धच्या T20 क्रिकेटमध्ये मात्र रोहित शर्मा हा सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या (Most sixes vs England) भारतीय खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

कोण आहे नंबर 1?

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील T20 क्रिकेटचा विषय निघाला की युवराज सिंहची (Yuvraj Singh) आठवण हमखास येते. युवराजने 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याच्या युवराजच्या रेकॉर्डची वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने (Kieron Pollard) नुकतीच बरोबरी केली आहे.

( वाचा : सलग पाच सिक्सनंतर सहावा बॉल खेळताना काय विचार होता? पोलार्डनं सांगितली ‘मन की बात’ )

इंग्लंड विरुद्ध युवराज सिंह सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या भारतीय बॅट्समनच्या यादीत युवराज सिंह नंबर 1 वर आहे. युवराजने 8 मॅचमध्ये 15 सिक्स मारले आहेत. सुरेश रैनाने (Suresh Raina) देखील युवराज इतकेच 15 सिक्स मारले असले तरी त्यासाठी त्यानं युवराजपेक्षा 5 मॅच जास्त खेळल्या आहेत.

केएल राहुल (KL Rahul) हा यादीतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने 6 मॅचमध्ये 10 सिक्स मारले आहेत. त्यामुळे अहमदाबादमधील पहिल्या T20 मध्ये राहुलने 6 सिक्स मारले तर युवराजपेक्षा कमी मॅचमध्ये युवराजचा सिक्स मारण्याचा रेकॉर्ड (Most sixes vs England मोडू शकतो.

युवराज सिंहचा हा रेकॉर्ड तोडण्याची संधी फक्त केएल राहुलला आहे असे नाही. तर हिटमॅन रोहित आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हे देखील या शर्यतीमध्ये आहेत. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या 8 T20 मॅचमध्ये 8 सिक्स मारले आहेत. तर विराटने 12  मॅचमध्ये 7 सिक्स लगावले आहेत.

( वाचा : IPL 2020 च्या हिरो नंबर 1 ची आता T20 मध्ये एन्ट्री! )

इंग्लंड विरुद्धची पाच मॅचची T20 सीरिज ही 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये सुरु होत आहे. राहुल, रोहित आणि विराट हे टीम इंडियाचे तीन्ही प्रमुख बॅट्समन संपूर्ण सीरिज खेळले तिघांनाही युवराजचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. त्याचबरोबर या तिघांमध्येही नंबर 1 कोण पटकावणार यासाठी या सीरिजमध्ये स्पर्धा पाहयला मिळू शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: