
भारताचा विकेटकिपर बॅट्समन पार्थिव पटेल (Parthiv Patel) आता रिटायर झाला आहे. पार्थिव वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) खेळला. त्यानंतर 18 वर्षांनी तो वयाच्या 35 व्या वर्षी क्रिकेटमधील सर्व प्रकारातून रिटायर झाला. दीड दशकांच्या कारकीर्दीत पार्थिव फक्त 25 टेस्ट, 38 वन-डे आणि 2 T20 मॅच खेळला.
महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) उदय हे पार्थिव पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी खेळण्याचं कमी कारण. धोनी हा भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी विकेटकिपर-बॅट्समन आहे. तसंच तो बराच काळ टीमचा कॅप्टनही होता. धोनी तीन जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळात असल्यानं अन्य विकेटकिपर्सना टीम इंडियामध्ये फार संधी मिळाली नाही. धोनीला विश्रांती हवी असेल, धोनी दुखापतग्रस्त असेल तरच अन्य विकेटकिपर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. टीम इंडियातील कोणकोणत्या विकेट किपर्सना भारतीय क्रिकेटमधील ‘धोनी पर्वा’चा फटका बसला ते पाहूया.
( वाचा – पार्थिव पटेल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी आणि गुजरातचा गौरव!)

दिशेन कार्तिक (Dinesh Karthik)
‘धोनी पर्वा’तील निर्विवाद नंबर 2 विकेटकिपर. तो कायम नंबर 2 वर राहिला. कार्तिकनं 2004 साली धोनीच्या आधी टीम इंडियात जागा मिळवली होती. धोनीच्या धडाक्यापुढे तो मागे पडला. अर्थात त्यानंतर अगदी 2019 च्या वर्ल्ड कपपर्यंत कार्तिकची प्रत्येक निवड समितीनं निवड केली.
दिनेश कार्तिकला एक तर सातत्यानं संधी मिळाली नाही. संधी मिळाली तर त्याची टीममध्ये खेळण्याची जागा सतत बदलण्यात आली. कधी तो भारतीय टीममध्ये असताना नीट खेळला नाही. तर कधी तो फॉर्ममध्ये असूनही अन्य खेळाडू देखील उत्तम खेळत असल्याने अंतिम अकरामध्ये आणि एकूण टीममध्ये फार संधी मिळाली नाही. त्यामुळे तो सतत आत-बाहेर आहे.
कार्तिक आयपीएलमध्ये सातत्यानं खेळला आहे. त्याने आजवर एकूण 6 आयपीएल टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन होता. तामिळनाडूच्या रणजी टीमचा कॅप्टन आहे. दोन्ही ठिकाणी त्यानं नव्या खेळाडूंना भरपूर संधी दिली आहे. कार्तिक अजूनही क्रिकेटमध्ये सक्रीय असला तरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी आता फारशी नाही.
( वाचा – दिनेश कार्तिकच्या करियरमधील चढ-उताराची गोष्ट! )

ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha)
महेंद्रसिंह धोनी जखमी झाल्यानं 2010 साली साहाला अगदी शेवटच्या क्षणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पुढची चार वर्षे धोनीमुळे त्याला फार संधी मिळाली नाही. धोनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर निवड समिती त्याच्याकडं पुन्हा एकदा वळली आहे. सध्या तो भारतीय टेस्ट टीमचा पहिल्या पसंतीचा विकेट किपर आहे.

नमन ओझा (Naman Ojha)
मध्य प्रदेशचा उत्तम टॉप ऑर्डर बॅट्समन आणि विकेट किपर. ओझानं 2000-01 सीझनमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजस्थान रॉयल्सकडून त्याने 2009 च्या आयपीएलमध्ये चांगला खेळ केला. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या खेळामुळे राष्ट्रीय निवड समितीचं त्याच्याकडं लक्ष गेलं.
झिम्बाब्वेमध्ये 2010 साली गेलेल्या दौऱ्याच्या वेळी धोनीनं विश्रांती घेतली होती. त्यावेळी त्याला 1 वन-डे आणि 2 T20 खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ओझाला फार काही करता आलं नाही, तो टीमच्या बाहेर गेला. त्यानंतर तो पाच वर्षांनी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये एक टेस्ट खेळला आणि पुन्हा टीमच्या बाहेर फेकला गेला. आता अनेक नव्या विकेट किपरचा उदय झाल्यानं ओझाला राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.