फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियानं 2011 साली तब्बल 28 वर्षांच्या अंतरानं वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकला. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) नुवान कुलसेखराला सिक्स लगावत भारतीय फॅन्सची स्वप्नपूर्ती केली. एका खास भारतीयासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. तो भारतीय म्हणजे क्रिकेट विश्वातील सर्वात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. सचिनचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न 6 व्या प्रयत्नात पूर्ण झालं. त्या वर्ल्डकपमध्ये टीममधील प्रत्येक खेळाडूनं सचिसाठी सर्वस्व ओतून खेळ केला, अशी आठवण वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य सुरेश रैनानं (Suresh Raina on Sachin) सांगितली आहे.

सचिनचा सहावा प्रयत्न

सचिन तेंडुलकर 1992 साली पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळला. त्यानंतर 1996, 1999, 2003 आणि 2007 या पाच वर्ल्ड कप नंतर तो कारकिर्दीमधील शेवटचा वर्ल्ड कप 2011 साली खेळत होता. 1996 साली कोलकाताच्या टर्निंग पिचवर काही मिनिटांमध्ये मॅच बदलली. 2003 साली फायनलमध्ये रिकी पॉन्टिंगच्या वादळी खेळानं वर्ल्ड कप जिंकण्याची संधी हुकली. अन्य 3 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्येही जाता आले नव्हते.

त्यामुळे सचिनसाठी 2011 मधील वर्ल्ड कप ही सहावी आणि शेवटची संधी होती. 1983 साली कपिल देवच्या टीमनं जिंकलेला वर्ल्ड कप पाहून प्रेरणा घेणाऱ्या सचिनचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं. 2011 मधील वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान सचिन प्रत्येक टीम मीटिंगमध्ये सक्रीय सहभागी होत असे, अशी आठवण रैनानं (Suresh Raina on Sachin) सांगितली आहे. ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टमध्ये रैना बोलत होता.

सचिनसाठी सर्वस्व ओतलं!

रैना या पॉडकास्टमध्ये पुढे म्हणाला की, ‘2011 च्या वर्ल्ड कप टीममध्ये जबरस्त एकोपा होता. प्रत्येक जण एकमेकांची काळजी करत होता. सचिनसाठी वर्ल्ड कप जिंकणे हेच आमचे ध्येय होते. तो पाजी शेवटचा वर्ल्ड कप होता. प्रत्येकाला ही वेगळी टीम असल्याचं माहिती होते. 1983 मधील विजेतेपदानंतर मोठा गॅप पडला होता. सचिनसाठी खेळात सर्वस्व ओतण्याची आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खेळ करण्याचा सर्व खेळाडूंचा प्रयत्न होता. कारण, सचिनचा हा शेवटचा वर्ल्ड कप (Suresh Raina on Sachin)   होता, हे आम्हाला माहिती होतं.

कोच गॅरी कर्स्टन यांनी ड्रेसिंग रूममधील वातावरण सामान्य राहिल याची काळजी घेतली. धोनी भाई कॅप्टन होते. ते अतिशय शांत होते. टीम मीटिंगमध्ये सर्वजण उत्तर पद्धतीनं सहभागी होतील याची काळजी ते घेत,’ असे रैनानं सांगितले.

Cricket World Cup 2011: वर्ल्ड चॅम्पियन सध्या काय करतात?

सचिन ऑन टॉप

टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सचिनसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वस्व ओतून खेळत असताना सचिनही त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्यानं वर्ल्ड कपमध्ये 53.55 च्या सरासरीनं 482 रन केले. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरींचा समावेश होता. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॅटर होता. त्याचबरोबर सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन दुसऱ्या क्रमांकावर होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: