फोटो – ट्विटर

भारतानं श्रीलंकेचा पराभव करुन 2011 साली झालेला क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) जिंकला होता. या ऐतिहासिक घटनेला आता 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईतील वर्ल्ड फायनलमधील अंतिम 11 जण पुन्हा एकदाही एकत्र वन-डे मॅच खेळले नाहीत.फायनलमधील 11 आणि अन्य 4  असे 15 जण सध्या काय करतात ते पाहूया

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)

2011 च्या वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन. धोनीनं फायनलमध्ये नाबाद 91 रन काढले होते. वर्ल्ड  कप फायनलचाही तोच ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. धोनीच्याच कॅप्टनसीखाली भारतानं 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकली. तो 2019 च्या वर्ल्ड कप (Cricket World Cup 2019) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होता.

धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती स्विकारली. त्यानंतरची दोन आयपीएल सिझन चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन होता. यापैकी एकदा (IPL 2021) सीएसकेनं आयपीएल विजेतेपदही पटकावलं. आयपीएल 2022 पूर्वी त्यानं सीएसकेच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला. सध्या तो खेळाडू म्हणून सीएसकेकडून खेळत आहे.

IPL 2022: धोनीनं कॅप्टनसी का सोडली? वाचा CSK कॅम्पमधील Inside Story

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

वर्ल्ड कप विजेतेपद हा सचिन तेंडुलकरच्या वैभवशाली क्रिकेट करियरमधील सर्वोच्च क्षण. सचिन वर्ल्ड कप फायनलनंतर (Cricket World Cup 2011) नंतर फक्त 10 वन-डे मॅच खेळला. 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होण्यापूर्वी 100 सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम सचिननं केला होता.

सचिनला ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आले. तो काही काळ राज्यसभा खासदार देखील होता. सध्या तो मुंबई इंडियन्सचा आयकॉन आहे.

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

भारताचा आक्रमक ओपनर असलेल्या सेहवागनं 2011 च्या शेवटी वन-डे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी झळकावली. पण वर्ल्ड कपनंतर त्याचं करियर फार बहरलं नाही. दुखापती आणि नव्या खेळाडूंचा उदय यामुळे त्याची टीममधील जागा अनिश्चित बनली.

सेहवागनं अखेर 2015 साली रिटायर झाला. सेहवागनं काही काळ टीव्ही कॉमेंट्री देखील केली. सध्या तो सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे.

गौतम गंभीर (Gautam Gambhir)

गौतम गंभीर हा वर्ल्ड कप फायनलचा (Cricket World Cup 2011) खऱ्या अर्थानं हिरो होता. त्याच्या 97 रनमुळेच विजेतेपदाची पायाभरणी झाली. दुर्दैवानं गंभीरचं करियर देखील सेहवाग प्रमाणे 2011 वर्ल्ड कप नंतर उतरणीला लागलं. गंभीरचा फॉर्म हरपला.

तो 2016 पर्यंत टीम इंडियाच्या आत – बाहेर होता. याच काळात गंभीरच्या कॅप्टनसीखाली कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. गंभीर 2018 साली रिटायर झाला. सध्या तो लोकसभा खासदार आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या आयपीएल टीमचा मेंटॉर आहे.

विराट कोहली (Virat Kohli)

विराट कोहलीच्या क्षमतेचा प्रत्यय 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वांना आला होता. वर्ल्ड कप नंतर त्याचा करियर ग्राफ हा उंचावलेला आहे. तो आज जगातील नंबर वन क्रिकेटर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये रन मशिन अशी त्याची ओळख बनली.

धोनीनं टेस्ट क्रिकेटमध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर तो 2015 साली टेस्ट टीमचा कॅप्टन बनला. तर 2017 साली तो मर्यादीत ओव्हरर्सच्या टीमचाही कॅप्टन झाला. तो भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचाही तो दीर्घकाळ कॅप्टन होता. विराट आता कोणत्याही टीमचा कॅप्टन नाही. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लोकप्रिय आणि महत्त्वाचा असा खेळाडू आहे.

युवराज सिंह (Yuvraj Singh)

युवराज सिंह हा 2011 वर्ल्ड कप (Cricket World Cup 2011) स्पर्धेचा ‘मॅन ऑफ द सीरिज’ होता. वर्ल्ड कपनंतर त्याला कॅन्सरची लागण झाली. फायटर युवराजनं कॅन्सरवर मात केली. तो पुन्हा टीम इंडियात परतला.

युवराज 2014 आणि 2016 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळला. 2017 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्याची शेवटची मोठी स्पर्धा. युवराज 2019 साली रिटायर झाला.

सुरेश रैना (Suresh Raina)

ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्वार्टर फायनल आणि पाकिस्तान विरुद्धची सेमी फायनल जिंकण्यात रैनाच्या बॅटींगचं मोलाचं योगदान होतं. रैना 2017-18 पर्यंत भारताच्या मर्यादीत ओव्हर टीमचा सदस्य होता. त्यानंतर खराब फॉर्ममुळे त्याची टीममधील जागा केली.

रैनानं धोनीसोबतच 15 ऑगस्ट 2020 रोजी क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) या आयपीएल टीमचा सदस्य होती. आयपीएल 2022 मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) रैनाला कोणत्याही टीमनं खरेदी केले नाही. तो आता टीव्हीवर कॉमेंट्री करतो.

युसूफ पठाण (Yusuf Pathan)

भारताचा आक्रमक ऑल राऊंडर असलेला युसूफ पठाण 2011 वर्ल्ड कप नंतर फक्त 6 वन-डे मॅच खेळला. पण तो आयपीएल स्पर्धेतील नियमीत खेळाडू होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा पठाण सदस्य होता. पठाण मार्च 2021 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर झाला.

युसूफ पठाणची निवृत्ती, वाचा धडाकेबाज ऑल राऊंडरच्या अविस्मरणीय खेळी

हरभजन सिंग (Harbhajan Singh)

हरभजन सिंग हा 2011 वर्ल्ड कप स्पर्धेतील (Cricket World cup 2011) भारताचा मुख्य स्पिनर होता. वर्ल्ड कपनंतरच्या 4 वर्षात तो फक्त 10 वन-डे च खेळला. 2016 नंतर तो आंतरराष्ट्रीय टीममधून मागे पडला. त्यानंतर 2021 पर्यंत तो आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून सक्रीय होता. हरभजननं डिसेंबर 2021 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याची आता राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली आहे.

रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

अश्विन 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये मोजक्याच मॅच खेळला. त्यावेळी टीममधील नवोदीत सदस्य असलेल्या अश्विनचं करियर वर्ल्ड कपनंतर बहरलं. तो 2017 पर्यंत सर्व फॉरमॅटमधील नियमित सदस्य होता.

आता तो टेस्ट क्रिकेटमधील भारताचा नंबर वन स्पिनर आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये कपिल देव यांना मागे टाकले असून तो आता भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर आहे. अश्विन सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या आयपीएल टीमचा सदस्य आहे.

Explained : रवीचंद्रन अश्विन का आहे स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड?

झहीर खान (Zaheer Khan)

टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यातील मुख्य शिल्पकार. झहीरला वर्ल्ड कपनंतर दुखापतींचं ग्रहण लागलं. तो वर्ल्ड कपनंतर फक्त 6 वन-डे खेळला. झहीर 2015 साली रिटायर झाला. सध्या तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा क्रिकेट डायरेक्टर आहे.

आशिष नेहरा (Ashish Nehra)

आशिष नेहराला दुखापतीमुळे वर्ल्ड कप फायनल खेळता आली नव्हती. नेहरा वर्ल्ड कपनंतरही अनेकदा दुखापतग्रस्त झाला. सर्व दुखापतींवर मात करत तो 2018 पर्यंत क्रिकेट खेळत होता. 2018 साली झालेल्या T20 सीरिजमध्ये घरच्या मैदानात नेहरा रिटायर झाला. रिटायरमेंटनंतर तो काही काळ आरसीबी टीमचा बॉलिंग कोच होता. सध्या नेहरा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या आयपीएल टीमचा हेड कोच आहे.

मुनाफ पटेल (Munaf Patel)

मुनाफनं संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली बॉलिंग केली होती. तो वर्ल्ड कपनंतर फक्त 6 मॅच खेळला. आयपीएल स्पर्धेतही तो फार दिसला नाही. मुनाफ 2018 साली रिटायर झाला. त्यानंतर रोड सेफ्टी सीरिजमध्ये मुनाफ पटेल खेळला होता.

पियूष चावला (Piyush Chawala)

पियूष चावला संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्धची एकमेव मॅच खेळला. वर्ल्ड कपनंतर तो काही T20 मॅच भारताकडून खेळला. पण 2012 नंतर तो एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाही. चावला दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा सदस्य होता. त्याला आयपीएल 2022 साठी कोणत्याही टीमनं खरेदी केले नाही. चावला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजूनही सक्रीय आहे.

एस. श्रीशांत (S. Sreesanth)

श्रीशांत वर्ल्ड कपनंतर (Cricket World Cup 2011) भारताकडून एकही वन-डे मॅच खेळला नाही. त्याचं करिअर उतरणीला लागलं. तो 2013 मधील आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडला. त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर श्रीशांतने यावर्षी केरळकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तो काही रणजी सामनेही खेळला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: