फोटो – ट्विटर, ख्रिस गेल/इम्रान ताहीर

2022 हे वर्ष क्रिकेटपटूंसाठी आव्हानात्मक असणार आहे. द्विपक्षीय सीरिज, आयपीएल, T20 वर्ल्डकपमुळे वर्षभर प्लेअर्स व्यस्त असतील. त्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागल्याने काही स्पर्धाही स्थगित केल्या जावू शकतात. त्यामुळे अनेक खेळाडू क्रिकेटला अलविदा (Cricketers retired from 2022) करत आहेत. क्विंटन डीकॉक (Quinton de Kock) याने नुकतेच कौटुंबीक कारण देत टेस्ट क्रिकेटला रामराम केला.

2021 मध्येही काही स्टार खेळाडूंनी क्रिकेटमधून संन्यास घेतला. श्रीलंकेचा उपूल थरंगा, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हीलिअर्स, भारताचा हरभजन सिंग, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि वेस्ट इंडिजचा ड्वॅन ब्रावो यांनी इंटरनॅशनल क्रिकेट कारकिर्दीला फुल स्टॉप लावला. आगामी वर्षभरात (Cricketers retired from 2022) आणखी काही क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा करू शकतात.

ख्रिस गेल (Chris Gayle)

बॉलर्सचा कर्दनकाळ समजला जाणारा आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ ही उपाधी मिरवणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅटर ख्रिस गेल निवृत्तीच्या वाटेवर आहे. गेल सध्या 42 वर्षांचा आहे. गेल्या काही काळापासून त्याचा फॉर्मही हरपला आहे. असे असतानाही त्याला ऑस्ट्रेलियात होणारा 2022 चा T20 वर्ल्डकप (T20 World Cup 2022) खेळायचा आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील दुष्टचक्र कधी सुटणार?

क्रिस गेल याने होम ग्राउंडवर निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या T20 सीरिजसाठी वेस्ट इंडिजच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे T20 वर्ल्डकपमध्ये निवड झाल्यास त्यानंतर लगेचच तो संन्यासाची (Cricketers retired from 2022) घोषणा करू शकतो.

इम्रान ताहीर (Imran Tahir)

दक्षिण आफ्रिकेचा स्पिन बॉलर इम्रान ताहीर जगभरातील लीग खेळतो. त्याची कामगिरीही समाधानकारक असली तरी 2021 च्या T20 वर्ल्डकप (T20 World Cup 2021) टीममध्ये त्याची निवड झाली नाही. ताहीरने यावर नाराजी व्यक्त करत आगामी वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

डीव्हिलियर्सच्या वाढदिवशीच त्याच्या जिवलग मित्राची अचानक निवृत्ती!

इम्रान ताहीर याने आपली शेवटची इंटरनॅशनल मॅच 2019 ला खेळली होती. तेव्हापासून त्याला टीममध्ये जागा मिळालेली नाही. तबरेज शम्सी हा पर्याय दक्षिण आफ्रिकेकडे असल्याने 42 वर्षीय ताहीरचे कमबॅक अशक्य मानले जात आहे.

मॅथ्यू वेड (Matthew Wade)

दुबईत झालेला T20 वर्ल्डकप 2021 ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात विकेटकिपर बॅटर मॅथ्यू वेड याने मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमध्ये त्याने 17 चेंडूत नाबाद 41 रन चोपत टीमला फायनल (T20 WC 2021 Final) गाठून दिली होती.

अ‍ॅशेस सीरिजमध्ये त्याला ऑस्ट्रेलियाने संधी दिली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणारा आगामी T20 वर्ल्डकप आपली शेवटची इंटरनॅशनल सीरिज (Cricketers retired from 2022) असेल अशी घोषणा मॅथ्यू वेड याने केली आहे.

जेम्स अँडरसन (James Anderson)

इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगचा आधारस्तंभ असलेला जेम्स अँडरसन 39 वर्षांचा आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये अँडरसनच्या नावावर 600 हून अधिक विकेट्स आहेत. या वयातही त्याचा फिटनेस आणि स्विंग बॉलिंग वाखाणण्याजोगी आहे.

अँडरसन सध्या ऑस्ट्रेलियात अ‍ॅशेस सीरिज खेळत आहे. ही सीरिज संपल्यावर किंवा होम ग्राउंडवर टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या टेस्टनंतर अँडरसन निवृत्तीची घोषणा (Cricketers retired from 2022) करू शकतो.

टीम पेन (Tim Paine)

अ‍ॅशेस 2021 पूर्वी सेक्सटिंग प्रकरणात नाव अडकल्याने टीम पेन याने कॅप्टनपद सोडले होते. या सीरिजसाठी त्याची टीममध्येही निवड करण्यात आली नाही. त्याच्या जागी अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey) याला टीममध्ये स्थान देण्यात आले.

‘धोनीला BCCI ने नेहमी पाठीशी घातले,’ हरभजन सिंगचा गौप्यस्फोट

बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळ्यानंतर स्टीव्ह स्मिथवर (Steve Smith) एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये 2019 ला झालेली अ‍ॅशेस सीरिज 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. मात्र त्यानंतर भारताविरुद्ध मागच्या वर्षी झालेल्या सीरिजमध्ये टीम पेनच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: