फोटो – ट्विटर/BCCI-IPL

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ( Syed Mushtaq Ali Trophy 2021)  भारतीय क्रिकेटपटू स्वत:ला सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. पुढच्या महिन्यात IPL 2021 साठी खेळाडूंचा लिलाव (Auction) होणार आहे. त्यापूर्वी 21 जानेवारीपर्यंत आयपीएल टीम काही खेळाडूंना करारमुक्त करतील. IPL 2020 मध्ये फ्लॉप गेलेल्या खेळाडूंसाठी मुश्ताक अली स्पर्धा अधिक महत्त्वाची आहे. या स्पर्धेत चांगला खेळ करुन सध्याच्या टीममध्ये जागा कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. करारमुक्त झाल्यास लिलावाच्या वेळी चांगली किंमत मिळण्यासाठी त्यांचा या स्पर्धेतील फॉर्म निर्णायक ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) केदार जाधवसाठी (Kedar Jadhav) IPL 2020 ही स्पर्धा अतिशय खराब गेली होती. त्यामुळे आगामी सिझनपूर्वी त्याची टीममधून हकालपट्टी होणार अशी चर्चा आहे. केदारला CSK नं 2018 साली 7.8 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. यंदा तो करारमुक्त झाला तर त्याला इतकी रक्कम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. केदारलाही याची नक्की जाणीव असेल.

( वाचा : IPL 2021 : न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूवर आहे, CSK ची नजर, KKR देखील शर्यतीत! )

केदारचा आक्रमक खेळ!

केदार जाधव सध्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) टीमकडून मुश्ताक अली स्पर्धेत खेळत आहे. त्यानं 12 जानेवारी रोजी छत्तीसगड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 45 बॉल्समध्ये 5 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीनं नाबाद 84 रन काढले होते. महाराष्ट्राच्या विजयात त्याच्या या खेळीचा मोठा वाटा होता. केदारच्या आक्रमक खेळीमुळेच महाराष्ट्रानं छत्तीसगडचं 193 रन्सचं आव्हान 8 विकेट्स राखून पार केलं होतं.

उत्तराखंडविरुद्धही हाफ सेंच्युरी

केदारनं त्यापाठोपाठ गुरुवारी (14 जानेवारी) उत्तराखंड विरुद्ध झालेल्या लढतीमध्येही हाफ सेंच्युरी झळकावली. या मॅचमध्ये महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. कॅप्टन राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) 2 रनवर आऊट झाला. त्यापाठोपाठ केदारचा CSK मधील सहकारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 19 रन काढून परतला. या दोन धक्क्यानंतर केदारनं महाराष्ट्राच्या इनिंगची सूत्रं हाती घेतली.

( वाचा : मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉल्समध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरसह केले अनेक रेकॉर्ड्स!)

केदारनं 47 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 61 रन काढले. त्याच्या हाफ सेंच्युरीमुळे महाराष्ट्रानं उत्तराखंडच्या विरुद्ध 142 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. उत्तराखंडनं हे आव्हान 6 विकेट्स राखत पूर्ण केलं. त्यांच्याकडून जय बिस्टानं सर्वात जास्त 69 रन काढले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: