फोटो – सोशल मीडिया

पाकिस्तानात मुस्लीम सोडून अन्य धर्माच्या व्यक्तींना होणारा त्रास ही काही नवी गोष्ट नाही. पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच या छळवणुकीची अखंड परंपरा सुरू आहे. गैरमुस्लीम व्यक्ती त्याच्या क्षेत्रात कितीही मोठा असला तरी त्याला त्रास दिला जातो. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला हिंदू स्पिनर दानिश कानेरिया (Danish Kaneria) हे याचे उदाहरण आहे. कानेरियानं गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं पाकिस्तान क्रिकेट टीममधील त्याला मिळालेली वागणूक जगासमोर मांडली आहे. कानेरियानं ‘आयएनएस’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं दिलेल्या वागणुकीबद्दल (Kaneria on Afridi) सांगितलं आहे.

खोटारडा, कारस्थानी आणि चारित्र्यहीन

मी हिंदू असल्यानंच पाकिस्तानच्या टीममध्ये माझ्यावर भेदभाव झाला हे जाहीरपणे सांगणारा शोएब अख्तर हा पहिला व्यक्ती होता. त्यासाठी मी त्याचा आभारी आहे. त्यानंतर त्याच्यावरही दबाव टाकण्यात आला. त्यामुळे अख्तर नंतर या विषयावर काहीही बोलला नाही.

मला शाहिद आफ्रिदीनं नेहमीच त्रास दिला. आम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये (लेग स्पिन) खेळत होतो. तो मला बेंचवर बसवून ठेवत असे. त्यानं मला वन-डे मॅचमध्ये खेळण्याची संधी दिली नाही.  

मी टीममध्ये राहावं असं त्याला वाटत नसे. तो एक खोटारडा, कारस्थानी आणि चारित्र्यहीन व्यक्ती होता. माझं लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यावर होतं. मी या गोष्टींवर लक्ष देत नव्हतो. शाहिद आफ्रिदी इतर खेळाडूंना माझ्या विरूद्ध चिथावणी देत असे. मी चांगली कामगिरी करत होतो, त्यामुळे तो माझा मत्सर (Kaneria on Afridi)  करत असे. मी पाकिस्तानकडून खेळलो याचा मला अभिमान आहे. मी त्यासाठी परमेश्वराचा आभारी आहे.’

पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?

आरोप खोटे!

दानिश कानेरियाला ‘स्पॉट फिक्सिंग’ च्या आरोपांमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) निलंबित केले आहे. त्यानं हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. आफ्रिदी नसता तर मी पाकिस्तानकडून अनेक आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच खेळलो असतो असं कानेरिया म्हणाला.  

माझ्या विरोधात खोटे आरोप रचण्यात आले. या केसमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीशी माझं नाव जोडण्यात आलं. तो अन्य पाकिस्तानी क्रिकेटर्सचाही मित्र होता. शाहिदी आफ्रिदीचाही मित्र (Kaneria on Afridi) होता. मला टार्गेट का केलं हे माहिती नाही.

माझ्यावरची बंदी उठवण्यात यावी, अशी पीसीबीला विनंती आहे. अनेक फिक्सर्सवरील बंदी उठवण्यात आली आहे. मलाच ही वागणूक का दिली जातेय? मी माझ्या देशासाठी खेळलो आहे. मलाही अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे संधी मिळाली पाहिजे. मी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. मला पीसीबीकडून कोणतं कामही नकोय. प्लीज माझ्यावरची बंदी काढून टाका. त्यामुळे मला शांततेमध्ये माझं काम करता येईल,’ अशी विनंती कानेरियानं केली आहे.

आफ्रिदी क्रिकेटनंतर देश चालवणार, हाफिजसह राजकीय मैदानात केलं पदार्पण

कानेरियाची कारकिर्द

दानिश कानेरियानं 2000 ते 2010 या कालावधीमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व केलं. या काळात त्यानं 61 टेस्टमध्ये 261 विकेट्स घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला 10 वर्षांमध्ये फक्त 18 वन-डे खेळण्याची संधी मिळाली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: