फोटो – ट्विटर

कर्नाटकचा (Karanatka) 20 वर्षांचा मुलगा देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal)  सध्या जबरदस्त फॉर्मात (Padikkal in form) आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळणाऱ्या पडिक्कलनं रेल्वे विरुद्ध नाबाद सेंच्युरी झळकावली. त्याची विजय हजारे ट्रॉफीतील (Vijay Hazare Trophy) ही सलग तिसरी सेंच्युरी आहे. कर्नाटकचा दुसरा ओपनर आणि कॅप्टन रवीकुमार समर्थनंही नाबाद सेंच्युरी झळकावली. या दोघांच्या सेंच्युरीच्या जोरावर कर्नाटकनं रेल्वेचा 10 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला आहे.

रेल्वे विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रेल्वेनं पहिल्यांदा बॅटींग करत कर्नाटकसमोर 285 रनचं आव्हान ठेवलं. रेल्वेकडून प्रथम सिंगनं सेंच्युरी झळकावली. त्यानं 129 रन काढले. कर्नाटकनं हे आव्हान फक्त 40.3 ओव्हरमध्ये आणि एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. पडिक्कलनं 125 बॉलमध्ये नाबाद 145 रन काढले. त्याला कॅप्टन समर्थनं 118 बॉलमध्ये नाबाद 130 रन काढत चांगली साथ दिली.

पडिक्कलचा जबरदस्त फॉर्म

देवदत्त पडिक्कल सलग दुसऱ्या सिझनमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत फॉर्मात (Padikkal in form) आहे. मागच्या सिझनमध्ये त्यानं 11 मॅचमध्ये 609 रन काढले होते. या सिझनमधील पाच मॅचमध्ये त्यानं पाचव्या मॅचमध्येच तीन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरीच्या जोरावर 572 रन काढले आहेत. यामध्ये त्याची सरासरी ही तब्बल 190.66 इतकी प्रचंड आहे.

( वाचा : कर्नाटकचा युवा बॅट्समन बनला आयपीएलचा हिरो!

पडिक्कलची या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध 52 रन काढले होते. त्यानंतर बिहार विरुद्ध त्याची सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. त्याला या स्पर्धेतील सेंच्युरीसाठी फार काळ वाट पाहावी लागली नाही. पुढच्याच मॅचमध्ये ओडिशा विरुद्ध त्यानं 152 रनची मोठी खेळी केली. हा त्याचा A श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे. ओडिशापाठोपाठ केरळ विरुद्ध नाबाद 126 आणि रेल्वेविरुद्ध नाबाद 145 रनची खेळी पडिक्कलनं केली आहे.

पडिक्कलचा विजय हजारे ट्रॉफीतील जबरदस्त फॉर्म

प्रतिस्पर्धी टीमरन
उत्तर प्रदेश52
बिहार97
ओडिशा152
केरळ126*
रेल्वे145*

आयपीएलमध्येही होता फॉर्मात

आयपीएल 2020 (IPL 2020)  या स्पर्धेतून पडिक्कलचे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले. पडिक्कलनं मागील आयपीएलमधील 15 मॅचमध्ये 473 रन्स काढले होते. यामध्ये पाच हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्यानं 6 मॅचमध्ये 134.56 च्या सरासरीनं 218 रन काढले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) त्याला या सिझनसाठी रिटेन केलं आहे. फॉर्मातली पडिक्कलकडून (Padikkal in form) त्यांना यंदाही मोठ्या अपेक्षा असतील. टी-20 , वन-डे आणि टेस्ट या तिन्ही प्रकारात खेळण्याची क्षमता पडिक्कलनं दाखवून दिली आहे. त्याचबरोबर विजय हजारे स्पर्धेत सातत्यानं रन करत त्यानं टीम इंडियाचा दरवाजा देखील ठोठावला आहे.   

टीप – * ही खूण नाबाद असल्याचे दर्शविते

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: